अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
सीमावाद उकरून काढून मराठी बांधवांच्या गाड्या तोडफोड केल्याच्या निषेध
चाळीसगाव(प्रतिनिधी) – महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षक वेदीकांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत नुकसान केले ट्रकच्या काचेवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या गाडीचा काच फोडल्याने शिवरायांचा अवमान करण्यात आला. कन्नड रक्षक वेदीकांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मराठी बांधवांवर दगडफेक केली या हल्लेखोरांना मुख्यमंत्री बोम्मई ची फुस असल्याने त्यांचा निषेध करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने दि ८ रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री बोम्मई च्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याचे विधान कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांनी काही दिवसापूर्वी केल्यानंतर सिमा प्रश्नावरून पुन्हा वाद उकरून कुरापती केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे, भारत देश अखंड आहे एक राज्य या देशाचे तुकडे करू पाहत आहे या चुकीच्या धोरणांमुळे राज्याचे तुकडे होणार असल्याने हे मराठी माणूस सहन करणार नाही सीमावाद भागातील हिंसाचाराच्या घटना देशाच्या ऐक्याला धोका आणणाऱ्या आहेत जर त्यातून काही अघटीत घडल्यास त्याला कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई जबाबदार असतील आम्ही सयम राखतो मात्र मराठी बांधवांचा सयम सुटू शकतो मराठी बांधवांवर होणारा अन्नाय महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्राच्या मराठी बांधवांवर सातत्याने अन्याय करत असल्याने त्यांचा निषेध करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने दि ८ रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री बोम्मई च्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.आंदोलनात गणेश पवार ,अरुण पाटील, खुशाल बिडे,प्रतिभा पवार, खुशाल मराठे, प्रमोद वाघ, संजय कापसे.स्वप्निल गायकवाड, अरुण अजबे ,विकास पवार, राकेश राखुंडे, विलास मराठे, छोटू अहिरे ,संतोष पाटील, प्रमोद पाटील ,आकाश धुमाळ,राज वाबळे, मनोहर पाटील ,दीपक देशमुख, किरण आढाव, चेतन आढाव ,दिनेश गायकवाड, जितेंद्र पाटील, शिवाजी गवळी, भूषण पाटील, सागर पाटील ,रवींद्र पवार, किरण शिंदे, संजय बिडे,सागर शेलार ,शिवा मराठे, मनोज भोसले कुणाल पाटील, सिद्धांत पाटील, सागर जाधव, गणेश देशमुख सुदाम शेलार आदी सहभागी झाले होते