अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
येत्या आठ दिवसात दुध संघाच्या आजच्या स्थितीचा आढावा घेऊन त्याचा लेखाजोखा सर्वांपुढे मांडण्यात येईल व निश्चितपणे येत्या ५ वर्षात ना.गिरीष महाजन व ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने दुध संघाची अनेक पटींनी प्रगती झालेली आपल्याला दिसेल हा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो-आमदार मंगेश रमेश चव्हाण
जळगाव(प्रतिनिधी)-आज जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या चेअरमन पदी आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, यावेळी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था असणाऱ्या दुध संघाची जबाबदारी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला दिल्याबद्दल मी आमचे नेते नामदार गिरीषभाऊ महाजन व पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानतो. सोबतच मला अनुमोदन देणारे सर्व जेष्ठ – श्रेष्ठ संचालक मंडळ यांचे देखील मनापासून आभार मानतो.दुध संघात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्या दुध उत्पादक सभासद मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ अहोरात्र परिश्रम घेऊ. जळगाव दुध संघाचा “विकास” ब्रँड राज्यातील अग्रगण्य करण्यासाठी सर्वाना हेवा वाटेल असा पारदर्शक कारभार आम्ही काम करू.