अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-जागतिक महिला दिनानिमित्त चंदूकाका सराफ आणि कंपनी (दौंड,केडगाव,श्रीगोंदा) यांनी विविध स्तरातील कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
याच्यामध्ये प्राध्यापिका सौ अरुणा मोरे,साने बाई, सुषमा इंगळे मधुबाला टाटिया सौ माधुरीताई वासुदेव काळे एडवोकेट डहाळे मॅडम मा. नगराध्यक्ष सुनीता कटारिया मा. उपनगराध्यक्ष हेमा परदेशी जुडी मिस सविता भोर मनीषा सोनटक्के सुनिता नाईक सीमा शहा अस्मिता मंचा अध्यक्ष बलदोडा मॅडम तसेच अनेक विविध स्तरावर कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. आणि आलेल्या प्रत्येक महिलांचा विशिष्ट वेगळ्या स्वरूपात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन चंदूकाका सराफ आणि कंपनी मधील सर्व मालक व कर्मचारी वर्गानी यांनी मिळून केला. कार्यक्रर्माची मूळ संकल्पना शौनक शहा यांची होती सूत्रसंचालन मनीषा शहा मनाली शहा यांनी केले व उपस्तितांचा सत्कार सौ जयश्री शहा चित्रा शहा सुमित्रा शहा पूजा शहा पल्लवी शहा यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला अतिशय वेगळ्या व आंनदी स्वरूपात संपन्न झाला सर्व दुकानातील स्टाफ यांनी मिळून कार्यक्रम यशस्वी करण्यात फार मोठा मोलाचा वाटा उचलला.