अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-६ एप्रिल २०२३ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीला (११ एप्रिल )शासकीय सुट्टी जाहीर करण्याबाबत दौंड तहसीलदारांना आपल्या निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
महात्मा फुलेंचे गुरु,शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांना गुरु मानणारे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी शासकीय सुट्टया मंजूर असून,महात्मा फुलेंच्या जयंतीला शासकीय सुट्टी नाही, हा महात्मा फुले यांचा अपमान नाही का? असा प्रश्न,दौंड तालुका अध्यक्ष- मंगेश राजाराम रायकर यांनी केला. सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महात्मा फुले यांच्या जयंतीला ( ११ एप्रिल) शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा शासकीय आदेश, काढण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती आपल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी दौंड तालुका कार्याध्यक्ष- मंगेश राजाराम रायकर, डॉ-दत्तात्रेय जगताप,निलेश बनकर, निलेश शेंडे, नवनाथ माने, रामचंद्र भागवत, प्रमोद भागवत, दत्ता माने, अमोल भागवत, जयश्री भागवत, विजय गिरमे, सचिन शिंदे, सचिन टेंबाळकर आदी उपस्थित होते.