अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
शहर प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष मराठवाडा व विदर्भ दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत यांनी दिली .आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना विठ्ठल सावंत म्हणाले की, कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे हे मराठवाडा व विदर्भ दौऱ्यावर जाणार आहे .या दौऱ्यात कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे ४ जिल्ह्यात जिल्हा शिक्षक मेळावे होणार आहेत .
दिनांक ६ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता औरंगाबाद जिल्ह्याचा शिक्षक मेळावा औरंगाबाद येथे होणार आहे .दिनांक ७ मे २०२३रोजी राज्याध्यक्ष गौतम कांबळे एका लग्न समारंभास उपस्थित राहणार असून त्यानंतर दुपारी १ वाजता वाशिम जिल्ह्याचा शिक्षक मेळावा कारंजा लाड येथे होणार आहे .त्याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता यवतमाळ जिल्ह्याचा शिक्षक मेळावा पुसद येथे होणार आहे .दिनांक ८ मे २०२३ रोजी अमरावती जिल्ह्याचा शिक्षक मेळावा अमरावती येथे होणार आहे .दौऱ्यात त्या त्या जिल्ह्यातील नुतन जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे .तसेच शिक्षकांच्या त्या भागातील अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती राज्यसल्लागार दिगंबर काळे यांनी दिली .या दौऱ्यात राज्य व जिल्हा पदाधिकारी सहभागी होणार आहेत .