संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) – राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू झाले असून आज दि.१७ जुलै रोजी पहिल्याच दिवशी मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. मतदारसंघाच्या विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत.
मंजूर झालेल्या कामांमध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे.
१) नवीन प्रांत कार्यालय व प्रांताधिकारी – तहसीलदार निवासस्थाने – 6 कोटी
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथे स्वतंत्र महसुली उपविभाग आहे, सद्यस्थितीत चाळीसगाव प्रांताधिकारी कार्यालय हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत भाड्याच्या जागेत सुरु आहे. तसेच ते वर्दळीच्या ठिकाणी व अंतरावर असल्याने नागरिकांना गैरसोयीचे देखील होत होते. त्यामुळे चाळीसगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी नवीन प्रांत कार्यालय व्हावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तसेच प्रांताधिकारी व तहसीलदार यांना व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने देखील नसल्याने सुसज्ज अश्या प्रांत कार्यालयासाठी तसेच निवासस्थाने बांधकामासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठपुरावा करून यासाठी 6 कोटी निधी मंजूर केला आहे,
२) ग्रामीण रुग्णालयाजवळच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने बांधकाम – 13 कोटी 22 लाख
चाळीसगाव शहरातील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालय कार्यरत असून ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय देखील प्रस्तावित आहे. मात्र तेथे कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना शासकीय निवासस्थान नसल्याने त्यांच्यासह रुग्णांची देखील गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेत या अर्थसंकल्पात आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी ग्रामीण रुग्णालयाजवळच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थान बांधकामासाठी 13 कोटी 22 लाख रुपये मंजूर केले आहेत.
३) नवीन व्हीआयपी विश्रामगृह बांधकाम – 9 कोटी 38 लाख
छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील चाळीसगाव तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे अनेक केंद्रीय व राज्यमंत्री, शासकीय अधिकारी, उद्योजक, महत्वाचे पदाधिकारी यांची ये जा सुरू असते. सद्यस्थितीत जुन्या शासकीय विश्रामगृहाची अवस्था मोडकळीस आल्यामुळे त्याच्याच बाजूला व्हीआयपी विश्रामगृह बांधकामासाठी 9 कोटी 38 लाख निधी या अधिवेशनात मंजूर करण्यात आमदार मंगेश चव्हाण यांना यश मिळाले आहे. या नवीन विश्रामगृहामुळे चाळीसगावच्या लौकिकात भर पडणार आहे.
४) १२ ग्रामीण रस्ते सुधारणा कामे – २६ कोटी १० लाख
ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी यापूर्वी देखील मोठा निधी आमदार मंगेश चव्हाण यांनी खेचून आणला आहे, या अधिवेशनात देखील मतदारसंघातील 12 रस्त्यांच्या कामांसाठी 26 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने दळणवळणाची साधने अधिक मजबूत होणार आहेत.
मंजूर झालेल्या रस्ते व पुलांची कामे पुढीलप्रमाणे –
१ – हातगाव व रोहिणी गावातील लांबीत सिमेंट कॉंक्रीट करणे – २ कोटी ५० लक्ष
२ – शामवाडी ते निमखेडी रस्ता – ८० लक्ष
३ – दस्केबर्डी ते जामदा रस्ता – २ कोटी ६० लक्ष
४ – तरवाडे गावाजवळ सिमेंट काँक्रीट रस्ता करणे – १ कोटी ८० लक्ष
५ – धामणगांव ते शिदवाडी रस्ता – १ कोटी ४० लक्ष
६ – पिंपरखेड ते राम-211 हायवे – २ कोटी ५० लक्ष
७ – पिंप्री प्रदे चौफुली ते काकडणे फाटा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष
८ – काकडने फाटा ते तमगव्हाण रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष
९ – देशमुखवाडी ते सायगाव रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे. – २ कोटी ५० लक्ष
१० – सायगाव ते तळोदे फाटा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष
११ – माळशेवगे ते हिरापूर रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष
१२ – उंबरखेड येथे गटारीसह सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे – २ कोटी
आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव तालुक्याची सर्वांगीण विकासाकडे घोडदौड सुरु…
नवीन सरकार स्थापन आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी गेल्या वर्षभरात चाळीसगाव मतदारसंघाच्या विकासासाठी शेकडो कोटींचा निधी मंजूर झाला असून अनेक कामे पूर्णत्वास देखील येत आहेत. सामाजिक कार्यासोबतच विकासात्मक कामांमध्ये देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तालुक्यातील जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन मतदारसंघाचा चौफेर विकास होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.