संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात दि 19 ऑगस्ट 2023 रोजी घाटरोडवरील फकीराव रामराव कंपनी खते व बियाण्याच्या दुकानात दुपारी 12 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाच्या गल्ल्यातून 35 हजार रुपयांची चोरी केली होती मिळालेल्या सी सी टीव्ही फुटेज वरून तपास करत आरोपीला धुळे येथून चाळीसगाव शहर पोलिसांनी केली अटक.
चाळीसगांव शहरातील घाटरोड वरील “फकीराव रामराव कंपनी खते व बियाण्याच्या दुकानात ” कोणी नसल्याचा गैरफायदा घेवुन अज्ञात चोरट्याने दुकानाच्या ड्रावर मधुन 35 हजार रुपये चोरी केल्याबाबत फिर्यादी सतीष बाबुराव भालारे रा. चाळीसगाव यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 415/2023 भा.द.वी कलम 380 अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदर चोरी बाजारात गर्दीच्या ठिकाणी झाल्यामुळे व्यापाऱ्यामध्ये असुरक्षेततेची भावना निर्माण झाल्यामुळे पोलीसांपुढे सदर चोरट्याचा शोध घेणे एक आव्हानाचे काम होते चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन गुन्हे शोध पथकातील पोलील उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पोलीस अंमलदार पोहेकॉ योगेश बेलदार, पोना/दिपक पाटील, पोकॉ/निलेश पाटील, अमोल भोसले, गणेश कुवर, नंदकिशोर महाजन, प्रविण जाधव, शरद पाटील, मोहन सुर्यवंशी, विनोद खेरणार अशांना आरोपी शोधाबाबत मार्गदर्शनपर सूचना देण्यात आल्या होत्या. सदर पथकाने घटनास्थळी जाऊन दुकानातील सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याची पाहणी करता एक संशयीत इसम हा चोरी करतांना दिसुन आला. सदर संशयीत इसमाबाबत गोपनीयी माहीती काढता तो राहणार ७ वी गल्ली क्रांतीवीर चौक पारोळा रोड धुळे येथे राहत असल्याबाबत माहीती मिळाल्याने सदर आरोपी हा निष्णात चोऱ्या करणारा सराईत गुन्हेगार नामे आनंदा राजु सरोदे असल्याने त्याचा शोध घेणेकामी गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांनी दोन दिवस त्याच्या राहत्या घराच्या बाजुला साध्या वेशात पाळत ठेवून त्यास दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी तो घरी आला असता त्यास लागलीस ताब्यात घेतले सदर आरोपीतास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देवुन त्याव्यतीरिक्त चाळीसगाव शहरातील एका भांडे विक्री करणाऱ्या दुकानातुन एक मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली आहे ..सदर आरोपीतास वरील गुन्ह्यात अटक करुन त्यास मा. न्यायालयासमोर हजर करून त्याची दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे. सदर आरोपीतास अटक केल्यामुळे मार्केट परिसरातील सर्व व्यापारी तसेच दुकान मालक श्री प्रदीपदादा देशमुख यांनी समाधान व्यक्त करुन पोलीसांना चांगल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मा. श्री. एम. राजकुमार सो. पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे शोध पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सदर पथक स्थापन झाल्यापासुन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसला असुन गुन्हे उघकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी सदर गुन्हे होऊ नये म्हणुन व्यापाऱ्यानी दुकांनात येण्याच्या सर्व संशयीतांवर लक्ष ठेवुन दुकांच्या सुरक्षेकामी सीसीटीव्ही कॅमेरा लावून पोलीसांना ” एक कॅमेरा पोलीसांसाठी “या उपक्रमास साथ द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/योगेश बेलदार, पोकॉ/निलेश पाटील हे करीत आहेत.