
धुळे (देवपूर): देवपूर विद्यानगर येथे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे. दोन दिवसांपूर्वी काही नागरिक धुळे येथील आमदार फारुख शाह यांच्याकडे मंदिर व परिसरातील समस्यांची तक्रार घेऊन आले होते.समस्या जाणून घेण्यासाठी आमदार फारुख शाह हे मंदिरात गेले व मंदिराची व परिसरतील समस्या जाणून घेतल्या व सदर समस्या त्यांनी तातडीने देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप साहेब यांना बोलवून दूर करून घेतली. यावेळी ट्रस्ट च्या पदाधिकारी यांनी सत्कार करत आमदार शाह यांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. यावेळी श्री स्वामी समर्थ मंदिर देवपूर ट्रस्ट चे अध्यक्ष जी टी पवार सर, सुरेश चौधरी, प्रकाश थोरात, ए एस पाटील सर, नाना पाटील, वसंत भावसार, पी एस पाटील, हमीद शेख, युसूफ पिंजारी, निलेश काटे आदी नागरिक उपस्थित होते.