रानभाज्या खा… अन रोगप्रतिकार शक्ती वाढवा मान्यवरांचे आवाहन; रानभाजी महोत्सवाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Read Time4 Minute, 52 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी बसवराज जमखंडी सोलापूर

सोलापूर, दि.9: माहिती असलेल्या पालेभाज्या.. फळभाज्या आपण खातो…पण बांबूच्या कोवळ्या पानांची…सराटा…केनपाट, इचका, पिंपळ पान, भुई आवळी या रानभाज्यांचीही भाजी होते, हे माहिती नसते. रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. रक्ताभिसरण व्यवस्थित होते तर काही भाज्या मधुमेह, हृदयविकारावरही उपयुक्त आहेत. याचा रोजच्या आहारात वापर करण्याचे आवाहन रानभाजी महोत्सवात मान्यवरांनी केले.

निमित्त होते नेहरूनगर शासकीय मैदानात राज्य शासनाच्या कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मातर्फे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे. यावेळी आमदार सुभाष देशमुख, उपमहापौर राजेश काळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राचे ज्येष्ठ संशोधक डॉ. अमृत सागर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

नवीन पिढीला रानभाज्या समजाव्यात, त्यांचे आरोग्यातील महत्व समजावे यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार आजच्या ऑगस्ट क्रांती आणि जागतिक आदिवासी दिनी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

श्री. बिराजदार यांनी कोरोनाच्या काळात रानभाज्यांचे महत्व पटवून दिले. महोत्सव आयोजनाबाबत माहिती दिली. लॉकडाऊनमध्ये सोलापूर शहरात नागरिकांना भाजीपाला कमी पडू दिला नाही. रानभाजीला आयुर्वेदिक महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. देशमुख यांनी रानभाज्या महोत्सव आयोजित केल्याबद्दल कृषी विभागाचे कौतुक केले. हा स्तुत्य उपक्रम असून कोरोना संकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. रानभाज्यासाठी सोलापूर ब्रँड व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री. शंभरकर म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. रानभाज्या आयुर्वेदिक औषधाचे काम करतात. जिल्ह्यातील कोरोना सध्या नियंत्रणात आला आहे. या महोत्सवातून रानभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा, नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून भाज्या खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री. दिवाणजी म्हणाले, फास्टफूडच्या जमान्यात युवा पिढीला रानभाज्यांचे महत्व पटवून देण्याची गरज आहे. आरोग्यासाठी रानभाज्या खाणे महत्वाचे आहे.

यावेळी मान्यवरांनी रानभाज्यांची शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. तसेच रानभाजी माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमाला अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील, आत्माचे प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, शिवकुमार सदाफुले, शहाजी पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

या महोत्सवात चुका भाजी, अंबाडी, गुळवेल, चिघळ, शेवगा पाला, उंबर, पाथरी, कडवंची, तांदुळजा, हादगा, आघाडा, अळू, इचका, टाकळा, चंदन बटवा, करडई आणि कुरडू या रानभाज्या विक्रीसाठी आहेत. रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले उपयोग याची सचित्र माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्यात यावे यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात निवेदन सादर करणार-महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम आय एम विद्यार्थी आघाडी

Read Time3 Minute, 6 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उप संपादक रोहित शिंदे

मजलिस ए इततेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेबांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. खासादर सैय्यद इम्तियाज जलील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र चे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष मा. डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक चा लॉक डाउन च्या काळातला (मार्च ते जुलै) पर्यंत चा वीज बिल माफ करण्या साठी दिनांक २० जुलै २०२० रोजी महाराष्ट्र स्तर वर प्रत्येक शहर तालुका व जिल्हा मधे निवेदन सादर करण्यात येणार आहे शिवाय त्याच दिवशी म्हणजे २० जुलै २०२० रोजी रात्री ८ ते ८.०५ वाजेपर्यंत (फक्त ५मिनिट) आपल्या घर,दुकान व संस्थान चे लाईट बंद करून विरोध करायचा आहे।
सर्व महाराष्ट्र वासीयांना विनंती आहे कि आपण २० जुलै २०२० रोजी रात्री ८ ते ८.०५ वाजेपर्यंत (फक्त ५मिनिट) आपल्या घर,दुकान व संस्थान चे लाईट बंद करून सहकार्य करावे ।
आम्ही कोरोना मुळे बाहेर जाऊन विरोध जरी करू शकत नाही पण आपल्या घर,दुकान संस्थान मधे राहून लाईट बंद करून सुद्धा विरोध करू शकतो आपण सर्व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं ही विनंती असे आव्हान एम आय एम विद्यार्थी आघाडी औरंगाबाद च्या वतीने करण्यात येत आहे
डाॅ. कुणाल खरात
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम आय एम विद्यार्थी ,मझर पठाण
मराठवाडा अध्यक्षएम आय एम विद्यार्थी
अझीम पटेल मराठवाडा कार्याध्यक्ष
एम आय एम विद्यार्थी आघाडी
अब्दुल रेहमान आलम खान
जिल्हा अध्यक्ष एम आय एम विद्यार्थी
मोहींमिन खान शहर अध्यक्ष
एम आय एम विद्यार्थी आघाडी
शाफिक पटेल शहर जिल्हा अध्यक्ष
नवाज कुरेशी सोशल मीडिया अध्यक्ष
समी आली खान
अवेज शेख
रोहित धनराज
शुभम जमधडे
शेहरोज शेख
शेहरोज सिद्दीकी
आकिब खान
तलेवा शेख
शाहबाझ खान
सोहेल पठाण
मुजाहि्द शेख
ऊबेदुर रेहमान
शेख सोहेल

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे

Read Time6 Minute, 21 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

निवेदनाद्वारे मा. वर्षाताई  गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री यांना केली आहे,ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे अशी मागणी डॉ कुणाल खरात( प्रदेश अध्यक्ष)महाराष्ट्र राज्य AIMIM विद्यार्थी आघाडी यांनी केली आहे
कोरोना महामारीच्या काळात शिक्षण संस्थांना शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत सुचना आहेत व कोरोनाचा फैलाव होवू नये याकरिता विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात न येता ऑनलाईन वर्ग भरवून शिकवले जात आहे. या ऑनलाईन वर्गाच्या शिक्षणात अनेक शाळा महाविद्यालये विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये उपस्थित राहावे अशी ताकीद देत असून सिलाबस बुडाला तर त्यास विद्यार्थी जबाबदार राहतील असे तोंडी सांगत आहेत .अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लाससाठी आवश्यक असलेले साधने उपलब्ध नसल्याने शिक्षणाला मुकावे लागत आहे , कोरोना महामारीच्या काळात अगोदरच अनेक पाल्यांच्या पालकांचे रोजगार बुडाले असून त्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत असून पालकांचे कंबरडे मोडलेले आहे , ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी आपल्या पालकांना मोबाईल,टॅब,लॅपटॉप व ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारे साधने घेण्यासाठी हट्ट करीत आहेत . जे सधन घरातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयीच्या समस्या निर्माण होत असून मान, कंबर, मणका ,डोळे,खांदा, मनगट दुखीच्या समस्या मोठया प्रमाणात  विद्यार्थ्यांना होत असून पालक हया समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. आपन ऑनलाईन शिक्षणाला मुकणार म्हणून अनेक विद्यार्थी नैराश्यामधे जात आहे , त्याचाच एक भाग म्हणून काल बीड जिल्ह्यातील गेवराई येथील इयत्ता दहावीत शिकणार्या अभिषेक संत हया हुशार व होतकरू विद्यार्थ्याने ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब न मिळाल्याने आत्महत्या केली आहे, सदरील बाब ही गंभीर असून शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण घेणारे श्रीमंत विद्यार्थी  व ऑनलाईन शिक्षणासाठी साधने नसलेेेले गरीब विद्यार्थी असा भेदभाव निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था तयार होते आहे . जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला मुकत आहेत अशे विद्यार्थी नैराश्यामधे जाऊन आजारी पडण्याच्या तक्रारी सुद्धा पाहायला भेटत आहेत . शिक्षण विभागाच्या सर्वेनुसार राज्यातील विद्यार्थ्यांची सध्याची स्थिती राज्यात स्मार्ट फोन असणारे विद्यार्थी ४३.६३% ,साधा मोबाईल असलेले विद्यार्थी ३०.७४% ,मोबाईल उपलब्ध नसलेले विद्यार्थी २६.११% , टि.व्ही. ची सुविधा उपलब्ध असलेले विद्यार्थी ६५.०३% , रेडिओ उपलब्ध असलेले विद्यार्थी १०.७८% , आणि कोणतीही सुविधा उपलब्ध नसलेले विद्यार्थी १५.६०%. आता शिक्षण विभागाने सांगावे आपन किती विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलभुत शैक्षणिक अधिकाराला त्यांना मुकवणार आहात . आणि काही शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास अटेंड केले नाही तर झालेल्या शैक्षणिक नुकसाला विद्यार्थी जबाबदार राहतील असे सांगत आहेत. ज्यामुळे अनेक विद्यार्थी तनावाखाली जगत आहेत. जो पर्यंत सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना समान शिक्षण उपलब्ध होत नाही व सरकार योग्य ती योजना आखत नाही तो पर्यंत ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे. देशाचे भविष्य असणार्या हया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये व शैक्षणिक अधिकारापासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घेणे सरकार व प्रशासणाचे कर्तव्य आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांने पुन्हां ऑनलाईन शिक्षणासाठी आत्महत्या केली तर त्या शिक्षण संस्थेतील जबाबदार व्यक्तींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हे दाखल करावे व सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध होईल अशी यंत्रणा निर्माण करावी. तो पर्यंत ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे. अन्यथा गोर गरीब विद्यार्थ्यांच्या न्याय व शैक्षणिक हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल डॉ कुणाल खरात( प्रदेश अध्यक्ष)महाराष्ट्र राज्य AIMIM विद्यार्थी आघाडी .

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

पिंपरी-चिंचवड जि. पुणे व नागपूर येथील घटनेचा रि.पा.इ. विध्यार्थी आघाडी सातारा जिल्हा यांचे कडून तिव्र निषेध.

Read Time2 Minute, 51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

सौजन्य पवन साळवे

सातारा
दि. १२/०६/२०२०

पिंपरी-चिंचवड जिल्हा पुणे येथे बौद्ध समाजातील तरूण मयत विराज भालचंद्र जगताप (वय २०) या तरूणाचा काही जातीयवादी समाजकंटकांनी आसुड बुद्धीने लोखंडी गज, तलावार, चाकू काठीने अमानुष मारहाण करूण हत्या केली. तसेच अरविंद बनसोड जिल्हा नागपूर या ही युवकाची हत्या केली, दोन्ही घटनेचा रि.पा.इ. विध्यार्थी आघाडी सातारा जिल्हा यांचे वतीने सातारा जिल्हाधिकारी सो. यांना निवेदन देऊन झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला
तसेच मयत विराज जगताप यांची हत्या करणाऱ्या समाजकंटक आरोपींवर भा.द.सं. प्रमाणे खुनाचा व ॲक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करूण हा खटला जलदगती न्यायालयात चालवून मयत विराज जगताप व अरविंद बनसोड यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देवून न्याय करण्यात यावा असे जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले._
येणाऱ्या काळात जातिवादाला आळा घालण्यासाठी,जात-पात तोडो समाज जोडो ही संकल्पना सत्त्यात उतरवण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुण- तरुणींना रिपब्लिकन विध्यार्थी आघाडी पाठबळ देऊन, शासकीय निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे,

येणाऱ्या काळात आरोपींना कठोरात कठोर कारवाई न झाल्यास, जिल्हाध्यक्ष- अशोक बापू गायकवाड, विध्यार्थी आघाडी प,म अध्यक्ष बोधिसत्व माने (नाना), यांच्या नेतृत्वाखाली तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणारअसे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले…

या वेळी रिपाई विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष- वैभव गायकवाड,युथ जिल्हाउपाध्यक्ष-आदित्य गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव,सुशिल गायकवाड, अक्षय चव्हाण,अजित कांबळे, टायगर ग्रुपचे अजित वाघमारे, सूरज मस्के,अजय अडागळे,सूरज बाबर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

12 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

सावरमाळ येथे आले मुंबईहून २७ मजुर गावात ; परिसरात भीतीचे वातावरण

Read Time3 Minute, 30 Second


नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- विजय पां, मोरे कोळी

राज्यात लॉकडाऊन तिव्र असातानाही सांगली व हैद्राबाद येथे अडकले मुखेड तालुक्यातील सावरमाळ येथील आठरा मजूर हे, गुरुवारी तेथून दुचाकीवर व गुरुवारी रात्री मुंबईहून ट्रकने नऊ असे २७ मजुर गावात आल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले असून मंडळ अधिकारी एस.बी. मुंढे ,सपोनी कमलाकर गड्डीमे यांनी भेट देऊन त्यांना गावातील एका शाळेत तात्पुरते विलगीकरण करून ठेवले आहेत.

मुक्रमाबाद पासून जवळच असलेल्या सावरमाळ येथील सत्तावीस मजूराच्या हाताला कामच नसल्यामुळे कामाच्या शोधात हे मजुर आपल्या कुटुंबासह मुंबई,सांगली व हैद्राबाद येथे कामाला गेले होते. देशात सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर हे, मजूर ज्या-त्या ठिकाणी अडकून पडले होते. एकीकडे दिवसागणिक कोरोना रुग्नाचा वाढत असलेला मृत्यूचा व वाढत्या रुग्नांचा आकडा हा भयभित करणारा असून शासन यावर आळा घालण्यासाठी राञ दिवस एक करत असून ज्या ठिकाणी मजूर व इतर नागरिक आडकले आहेत त्यांनी त्याच ठिकाणी राहावेत असे सांगत आहेत.

व त्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय राज्य सरकारकडून करण्यात आलेली असतानाही सावरमाळ (ता.मुखेड) येथील हे, मजूर आपला व आपल्याला लेकरांचा जीव धोक्यात घालून आडमार्गाने राञीचा दुचाकीवरून प्रवास करीत हे, मजूर गावाकडं परतले आहेत. तर यापैकी हैद्राबाद येथून चार जण हे, मिळेल त्या वाहनाने व पायी आले. तर गुरुवारी रात्री मुंबईहून ट्रकने नऊ मजुर गावाकडं आले असल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

त्यांना गावातील नागरिका पासून दूर ठेऊन त्याचे नमुने तपासणी तात्काळ करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी शासनाकडे केली असून वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश गायकवाड यांनी मजुरांची तपासणी करुण हातावर शिक्के मारुण काळजी घेण्यास सांगितले यावेळी मंडळ अधिकारी साहेबराव मुंढे, सपोनी कमलाकर गड्डीमे,तलाठी शिवाजी तोत्रे,कृषी सहाय्यक डी.ए.भालेराव यांनी तात्काळ भेट देऊन त्यांना गावातीलच एका शाळेतील वेगवेगळ्या वर्ग खोल्यात विलगीकरण करून त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था केली आहे.याकामी सरपंच राम कुडदुले,विजय स्वामीसह गावकरी सहकार्य करीत आहेत.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

नारळीबाग मित्रमंडळाचे कम्युनिटी किचन लॉकडाऊनच्या काळात ठरले गरिबांना आधार

Read Time4 Minute, 44 Second

औरंगाबाद:-जगभर कोरोना विषाणू्चे सावट असताना हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे पण त्यावर नारळीबाग मित्र मंडळाने “कम्युनिटी किचन” ची स्थापना करून उपाय शोधला आहे.
औरंगाबाद शहर हे तसे औद्योगिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे शिवाय रोजगार व राहण्याच्या दृष्टीने सर्वसामान्यांना महागाईच्या काळात परवडणारे शहर असल्याने महाराष्ट्र भरातून रोजगारासाठी लाखो नागरिक मोल मजुरी साठी शहरात स्थायिक झाले आहेत पण कोरोनाच्या वाढत्या प्रभावमुळे शासनाने लॉक डाऊन चा निर्णय जाहीर केल्याने अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत असताना नारळीबाग वासियांचा कम्युनिटी किचनचा अभिनव उपक्रम गरजूंना दिलासा देणारा ठरला आहे.
दि.२८ मार्च पासून तब्बल १०० तरुणांच्या प्रयत्नातून व नागरिकांच्या उस्फुर्त सहभागातून हा उपक्रम सुरू झाला व आज घडीला सुमारे १५०० नागरिकांची भूक या माध्यमातून भागवली जात आहे.

नारळीबाग येथील युवकांनी या साठी केलेली कामाची विभागणी मुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आहे.

या कम्युनिटी किचन साठी युवकांची एक टीम प्रत्येक घरात जाऊन सकाळी 9 ते 10 या वेळेत लाऊस्पिकर द्वारे प्रत्येक घरातून पोळ्याचे संकलन करते एका घरातून किमान दोन पोळ्या संकलित केल्या जातात पण अनेक नागरिक शक्यतो अधिक पोळ्यांची मदत करतात.यात शासन निर्देशांनुसार सोशल डीस्टनसिंग चे काटेकोर पालन केले जाते हे विशेष.

एक टीम पोळ्या संकलित करत असताना एक टीम भाजी बनविण्यासाठी भाज्यांची स्वछता करणे व भाजी भात बनविण्यासाठी पूर्वतयारी ची आवश्यक ती कामे करतात ही कामे करत असताना हॅण्ड ग्लोव्हज,टोपी चा कटाक्षाने वापर केला जातो. भाजी भात बनविण्यासाठी युवक व काही नागरिक स्वखुशीने पैसे वस्तू देतात ज्यातून रोज वेग वेगळी चविष्ट भाजी बनवली जाते ज्यात कुठल्याही प्रकारे दर्जाशी तडजोड केली जात नाही.

भाजी भात व पोळी यांची पॅकिंग करण्यासाठी एक टीम सज्ज असते जी पटापट ह्या सगळ्यांची पाकिटे तयार करतात

अन् शेवटची एक टीम ही पॅकिंग केलेली पाकिटे घेऊन शहरातील विविध झोपडपट्ट्या,उड्डाणपूल,रस्त्यावरील बेघर नागरिक,झोपड्यांमध्ये राहणारे व पायपीट करत गावाकडे जाणाऱ्या गरजू नागरिकांपर्यंत हे फूड पाकिटे पोचवतात.

अनेक ठिकाणी ही फूड पाकिटे पोहचविले जात असल्याने गरजे नुसार नागरिक फोन वरून संपर्क साधून ही फूड पाकिटे मागून घेतात.

नारळीबाग येथील नागरिकांच्या ह्या उपक्रमामुळे लॉक डाऊन च्या काळात गरजूंना आधार देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आपल्या जेवणातील फक्त दोन पोळ्या भाजी दिल्यास शहरातील एक ही गरजू उपाशी राहणार नाही कम्युनिटी किचन चालू करण्यासाठी सुज्ञ नागरिकांनी पुढाकार घ्यावा व प्रत्येक वसाहतीत असे कम्युनिटी किचन सुरू करावे प्रत्येक वसाहतीतील आर्थिक दृष्ट्या सधन असणाऱ्यांनी अश्या उपक्रमासाठी साठी मदत करावी असे आवाहन नारळी बाग मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

वक्त ग्रूप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने खुडूसच्या आरोग्य विभागास साहीत्य वाटप

Read Time4 Minute, 14 Second

नादेंड जिल्हा प्रतिनिधी – विजय पां,मोरे कोळी

कोरोना विषाणुमूळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परस्थीती निर्माण झाली आहे.सोलापूर जिल्ह्यतील ग्रामीण भागात परदेश प्रवास करून आलेले नागरीक पुणे -मुंबई व इतर ठीकानाहून कोरोना या विषाणूमुळे स्थलांतरीत नागरीकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात सध्यस्थीतीत आहे.त्यामुळे कोरोना या विषाणूचा प्रार्दुभाव सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पसरण्याची शक्यता आहे.कोरोनाच्या प्रसारावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना आवश्यक आहे.कोरोना विषाणुमूळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या पायबंद साठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व आरोग्यविभाग, ग्रामपंचायती उपाययोजना करीत आहेत.
खुडूस(ता.माळशिरस) आरोग्यविभागाचे कर्मचारी त्यांचा जीव धोक्यात घालून कार्य करीत आहेत.खुडूस आरोग्यविभागास अध्याप आरोग्यविभागाकडून कोणतेही त्यांच्या संरक्षणासाठी साहित्य देण्यात आले नाही. आरोग्यविभाग त्यांचे जीव धोक्यात घालून जनतेच्या आरोग्यासाठी आहोरात्र काम करीत आहे.अखेर आरोग्यविभागाच्या मदतीला वक्त ग्रुप महाराष्ट्रराज्य सामाजिक संघटना धाऊन आली.या संघटनेकडून आरोग्य विभागास समीटायझर,हातमोजे,मास्क देण्यात आले.तसेच माळशिरस तालुक्यातील बेघर,अत्यंत हालाकीची परस्थीती असणाऱ्याना जेवन देवून सामाजीक बांदीलकी जोपासली.यावेळी वक्त ग्रूप महाराष्ट्रराज्य संस्थापक अध्यक्ष संजयभाऊ जगताप,महाराष्ट्रराज्य उपाध्यक्ष सोमनाथ मुकूंद आदटराव,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष युवराज चव्हाण,सहकारी मित्र दादासाहेब ढेरे यांच्यासह आरोग्यविभाग खुडूसचे डॉ.तुषार तारू,आरोग्यविभागाच्या शिस्टर एच.पी.ओहळ,आरोग्यविभागाच्या आशा वर्कर ,खुडूसच्या राधे शाम गो शाळा संस्थापक अध्यक्ष बंडू कांबळे,पत्रकार सचिन करडे,विनायक साठे,धनाजी साठे,अमोल वाघ,प्रेम कांबळे,प्रकाश लोखंडे अदी उपस्थीत होते.

जनतेच्या अडी अडचनीला व मानूसकीचा जिव्हाळा निर्माण करणारी वक्त ग्रूप महाराष्ट्रराज्य सामाजीक संघटनेचे कार्य कौतुक करण्यासारखे आहे.महामारीसारखी परस्थीती निर्माण झाली असल्याने अनेखानवरती उपासमारीची वेळ आली आहे.ज्यांना एक वेळचे जेवन व आरोग्याच्या सोई सुविधा मिळत नाही अशा लोकांच्या हकेला योग्य वेळी धाऊन जात असल्याने वक्त ग्रूप सामाजीक संघटना या नावाचे सार्थक केले आहे.वक्त ग्रूप सामाजीक संघटनेचा आदर्श घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष,सर्व सामाजीक संघटनांनी जिवना अवशक वस्तूंची मदत करून मानूसकी जपणे गरजेचे आहे.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

जातीय सलोखा कायम ठेवावा अफवांना बळी पडू नये-पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब.

Read Time59 Second

प्रतिनिधी(औरंगाबाद):-दि 28 फेब्रुवारी 2020 शुक्रवार रोजी औरंगाबाद नवापुरा येथे जिंसी पोलीस स्टेशन च्या वतीने जातीय सलोखा निमित्ताने शांतता कमिटी ची बैठक घेण्यात आली यावेळी जिंसी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब,मुजाहेद खान,मोहम्मद रफिक,जयसिंग हुलीया व नवापुरा भागातील नागरिक उपस्थित होते यावेळी जातीय सलोखा कायम राखण्याचे व अफवांना बळी पडू नये तसेच कोणत्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण होईल असे काही सोशल मीडिया वर शेअर करू नये असे आव्हान पोलीस निरीक्षक केंद्रे साहेबांनी केले.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %