अधिकार आमचा न्युज नेटवर्क

संपादक गफ्फार शेख (मलिक)

बातमीची दखल; भराव थांबविण्याचे निर्देश, मुरूमाच्या परवान्यांची तपासणी व पंचनाम्यानंतर कारवाई होणार

चाळीसगाव(प्रतिनिधी)-बिलाखेड शिवारातील हॉटेल प्रांजलसमोरील गट क्रमांक १४६/२/१ येथील शिवपार्क परिसरात नैसर्गिक नाल्यात मुरूमाचा भराव टाकून प्रवाह बाधित केला जात असल्याच्या तक्रारीची तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दखल घेत संबंधित जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी भरावाचे काम थांबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, मुरूमासाठी आवश्यक परवानग्यांची पडताळणी, पंचनामा आणि नियमभंग आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

वाडीलाल अमरसिंग चव्हाण यांच्यासह चार अर्जदारांनी याप्रकरणी तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली होती. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यास पावसाचे पाणी शेतात साचून पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी स्वतः जागेवर जाऊन पाहणी केल्याने प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

आता महसूल विभागाकडून भरावासंदर्भातील परवानग्या, मुरूम वाहतुकीची कागदपत्रे आणि पंचनाम्यातील नोंदींची पडताळणी केली जाणार आहे. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बाधित झाल्याचे आढळल्यास तो पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही होणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर नाल्याचा प्रवाह मोकळा होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, हे आगामी कारवाईतून स्पष्ट होईल.

About The Author

By admin

पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!