अधिकार आमचा न्युज नेटवर्क संपादक गफ्फार शेख (मलिक) उपसंपादक रोहित शिंदे सांडपाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा; अन्यथा आमरण उपोषणाचा सामाजिक कार्यकर्ता अण्णा विसपुते यांचा इशारा चाळीसगाव (प्रतिनिधी) – करगाव रेल्वे बोगदा नागरिकांसाठी खुला झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, बोगद्यातील सांडपाण्याचा प्रश्न अद्याप कायम असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बोगदा सुरू झाला असला, तरी सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वे बोगद्यात साचणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अण्णा विसपुते यांनी केली आहे. बोगदा नागरिकांसाठी खुला करताना सांडपाण्याच्या समस्येवरही ठोस उपाययोजना होणे अपेक्षित होते. मात्र, हा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सांडपाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात आला नाही, तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा अण्णा विसपुते यांनी दिला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन आता या समस्येवर कोणती कार्यवाही करते आणि करगाव रेल्वे बोगद्यातील सांडपाण्याचा प्रश्न कधी मार्गी लागतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. About The Author admin पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772 See author's posts Views: 177 Post navigation चाळीसगाव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या पाच जणांना अटक नाल्याच्या प्रवाहात अडथळा तक्रार आणि पंचनामे पण कारवाई कधी!दुष्काळाच्या संकटात सापडलेला शेतकरी आणि पुन्हा समोर उभे आहे दुसरे संकट….