अधिकार आमचा न्युज नेटवर्क

संपादक गफ्फार शेख (मलिक)

उपसंपादक रोहित शिंदे

दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश; चोरीस गेलेले १० ग्रॅम सोने हस्तगत

चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या पाच जणांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन महिला व तीन पुरुष आरोपींचा समावेश असून, पोलिसांनी चोरीस गेलेले एकूण १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले आहे. या कारवाईमुळे बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.

दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानकावरील फलाट क्रमांक पाच येथे महिला व पुरुष प्रवाशांची गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने फिर्यादी व साक्षीदार यांच्या गळ्यातील प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार प्रवीण जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी माहिती संकलित करून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन महिला व तीन पुरुष अशा पाच आरोपींना अटक केली. तसेच चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे लगड, असे एकूण १० ग्रॅम सोने हस्तगत केले. त्यामुळे फिर्यादी व साक्षीदार यांच्या मालकीचा चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार प्रवीण जाधव, राहुल सोनवणे तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी ही कारवाई केली.

About The Author

By admin

पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!