अधिकार आमचा न्युज नेटवर्क

संपादक गफ्फार शेख (मलिक)

उपसंपादक रोहित शिंदे

चॉपर हल्ल्यात एकाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडी बुद्रुक येथील माऊली नगर परिसरात मोटारसायकलच्या लाईटवरून जाब विचारल्याच्या कारणावरून धारदार चॉपरने हल्ला केल्याची घटना २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील (वय ४४, रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक) यांचा मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील (वय ३५) हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणातील संशयित आरोपी मयूर चैत्राराम जाधव (रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक, ता. जि. जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी संशयित आरोपी मयूर जाधव हा मोटारसायकलवरून परिसरात आला होता. त्याने मोटारसायकलचा लाईट सुरू-बंद केल्याच्या कारणावरून परिसरात बसलेल्या महिलांनी जाब विचारला. याच कारणावरून झालेल्या वादातून त्याने धारदार चॉपरने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात किरण पाटील यांचा मृत्यू झाला, तर किशोर पाटील गंभीर जखमी झाले. जखमी किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), १०९(१), ३५१(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक माहिती संकलित केली. तसेच तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून संशयित आरोपी मयूर जाधव याला गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.

About The Author

By admin

पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!