
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – येत्या नगरपरिषद निवडणुकीसाठी चाळीसगाव शहरातील प्रभाग आरक्षणाचा तक्ता जाहीर करण्यात आला आहे. एकूण १८ प्रभागांसाठी ‘अ’ आणि ‘ब’ या गटांनुसार पुरुष व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार काही प्रभाग सर्वसाधारण (जनरल), काही अनुसूचित जाती (एस.सी.) तसेच काही इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील पुरुष व महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
तक्त्यानुसार
प्रभाग क्र. १ ते ४ जनरल पुरुषांसाठी तर त्यांचे जोड प्रभाग अनुक्रमे जनरल महिला, एस.सी. महिला, जनरल महिला व ओबीसी महिला यांच्यासाठी आहेत.
प्रभाग ५ एस.सी. पुरुष व प्रभाग ६ जनरल पुरुष असा क्रम असून, त्यांच्या जोड प्रभागात अनुक्रमे जनरल महिला व ओबीसी महिला आरक्षित आहेत.
प्रभाग ७, ८, १० आणि ११ ओबीसी पुरुषांसाठी तर त्यांच्या जोड प्रभागात जनरल व ओबीसी महिला यांना आरक्षण देण्यात आले आहे.
प्रभाग ९ एस.सी. पुरुष, तर जोड प्रभाग जनरल महिला यांच्यासाठी राखीव आहे.
प्रभाग १२ ते १८ या गटात बहुसंख्य प्रभाग जनरल पुरुषांसाठी असून, जोड प्रभागात एस.सी. महिला, ओबीसी महिला आणि जनरल महिला आरक्षित करण्यात आले आहेत.
या आरक्षणामुळे शहरातील विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळणार असून, नगरपरिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.