
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- आज दि. ३० जून रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चाळीसगाव- नांदगाव रोडवर खडकी गावाजवळ खडकी बायपासवर एक भीषण अपघात घडला. शेतासाठी खत घेऊन मोटारसायकलवरून निघालेल्या आबा जानराव (धनगर) (वय 35 वर्ष) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत असलेले भगवान कोल्हे (वय 26 वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर संतप्त खडकी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र रस्ता रोको आंदोलन केले.यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून वाहनांची रांग लागलेली आहे. शहर पोलिस व वाहतूक शाखेचे अधिकारी- कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांना समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत.
अज्ञात वाहन अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी देखील गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला होता.त्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत कठोर भूमिका घेतली असल्याचे कळते.तसेच या रस्त्यावर वेगमर्यादा, वाहतूक नियमन व सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.