
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि. २ जुलै २०२५ धुळे ते चाळीसगाव मार्गावर दसेगाव शिवारातील गिरणा नदी पुलाजवळ भीषण अपघातात ऊजेर अब्दुल रशिद शेख (वय २७, रा. अनिल नगर, चाळीसगाव) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे.
ऊजेर शेख हा वैद्यकीय प्रतिनिधी (Medical Representative) म्हणून कार्यरत होता. तो आज सकाळी त्याची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्र. MH 20 FW 6368) घेऊन मेहुणबारे येथे कामासाठी गेला होता. काम आटोपून चाळीसगावकडे परतत असताना भरधाव वेगाने आलेल्या मारुती स्विफ्ट गाडीने (क्र. UP 19 V 7922) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात ऊजेर याच्या डोक्याला आणि कपाळाला गंभीर मार लागला. त्यास तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अपघातानंतर ऊजेरचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून, सदर गाडी हरियाणातील यमुनानगर, जगाधरी येथील मोहम्मद उसामा रियाज अहमद( रा.रसोली रोड शर्मा ट्रेडिंग कंपनी च्या बाजूला,यमुना नगर जगाधरी हरियाणा) याच्या ताब्यात होती.वाहनाच्या चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि मागून ऊजेरच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातामुळे दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले असून, याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात मोहम्मद उसामा रियाज अहमद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मेहुणबारे पोलिसांकडून सुरू आहे.