अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहर शिंपी समाजाच्या अध्यक्षपदी दिनेश पुरुषोत्तम बोरसे यांची एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समाजहिताच्या दृष्टीने ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
समाजातील विविध पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. सर्वांनी एकमताने बोरसे यांचे नेतृत्व मान्य करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी संधी दिली.
नवीन अध्यक्ष दिनेश बोरसे यांनी निवडीनंतर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले. समाजातील नव्या पिढीला प्रोत्साहन देणे, शिक्षण, व्यवसाय, आणि सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल दिनेश बोरसे यांचे शहर व परिसरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्यकाळाकडून समाजबांधवांना मोठ्या अपेक्षा आहेत.
