चाळीसगाव कोरोना उपचारासाठी औषधांचा तुटवडा होऊ नये,लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांची आरोग्यमंत्री टोपे यांची भेट

Read Time1 Minute, 51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव – शहरासह तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यात अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. यात शहरात असलेल्या कोव्हीड सेंटरला उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना रेडमिसीअर इंजेक्शन तसेच फेबिफ्ल्यू गोळ्यांची पुर्तता करण्यात यावी यासाठी लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेत कोरोना विषाणूच्या उपचाराकामी निवेदन देत साकडे घातले.

राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांनी तात्काळ याकामी माहीती घेत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधत महाराष्ट्र राज्याच्या सचिव अर्चना पाटील यांच्याशी संवाद साधत रेडमिसीअर इंजेक्शन व फेबिफ्लू औषधींचा पुरवठा करण्याबाबत सुचना दिल्यात. याप्रसंगी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष शाम देशमुख, भगवान पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, दिपक पाटील, सुर्यकांत ठाकूर, जगदीश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते दिपक कच्छवा आदी उपस्थित होते.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

ब्लड मॅन पंकज पाटील यांची किसान क्रांती युवा संघटनेच्या चाळीसगाव तालुकाध्यक्ष पदी निवड

Read Time1 Minute, 32 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शहा

चाळीसगाव(दि 30)-चाळीसगाव येथील ब्लड मॅन अशी ओळख असणारे पंकज पाटील यांची किसान क्रांती युवा संघटनेच्या चाळीसगाव तालुकाध्यक्ष पदी निवड, चाळीसगाव तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ब्लड मॅन म्हणून प्रसिध्द असणारे रक्तदानसाठी एक मोठी टीम तयार करून रक्ताचा तुटवडा होऊ न देणारे आरोग्य क्षेत्रात ठसा उमटवून आता किसान क्रांती युवा संघटनेच्या चाळीसगाव तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून सोडविण्याचा ध्यास घेऊन काम करतील व न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील अशी चर्चा आहे,नियुक्तीचे पत्र किसान क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी पाटील यांना दिले आहे सदर नियुक्तीचे चाळीसगाव तालुक्यातून कौतुक होत आहे व पाटील यांना सर्व स्थरातून शुभेच्छा प्राप्त होत आहे.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

शिक्षक दाम्पत्याचा घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी उपक्रम ठरतोय अनुकरणीय

Read Time11 Minute, 26 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

एरंडोल-एरंडोल दिनांक ३० शिक्षक दाम्पत्याचा घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी उपक्रम ठरतोय अनुकरणीय. कोरोणा काळात राज्यात शाळा बंद शिक्षण सुरू परिस्थिती असताना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत गोरगरीब घटक आदिवासी वाडी वस्ती काटेवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा ठरू पाहणारा अडसर दूर करण्यासाठी शिक्षक दांपत्याने पुढाकार घेतला आहे.प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले व सतत नवनवीन उपक्रम राबवणारे एरंडोल तालुक्याचे बालरक्षक किशोर पाटील कुंझरकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापूरच्या आदर्श उपक्रम शिक्षिका जयश्री पुरुषोत्तम पाटील यांनी कोरोणा काळात जूनपासून शाळा बंद असून या परिस्थितीत आदिवासी वाड्यांवर शिक्षण सुरू राहण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर जात विद्यार्थ्यांच्या घरीच अंगणातच मास्क, सनी टाय झर चा वापर फिजिकल डिस्टेंस चे सर्व नियम पाळून पालकांच्या मदतीने घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी हा अनोखा प्रयोग स्वेच्छेने राबवत आहे. ज्यांचे कोणी नाही त्यांचे साठी शिक्षक दिलासादायक आहेत जणू काही हाच संदेश हे सेवाभावी शिक्षक दाम्पत्य देत आहेत.हा उपक्रम अनोखा असल्याने इतर सर्व शिक्षकांसाठी राज्यात सर्वत्र अनुकरणीय ठरला आहे.तेजस प्रकल्प टॅग कॉर्डिनेटर तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गालापूर आदर्श शिक्षिका जयश्री पाटील आणि किशोर पाटील कुंझरकर हे शिक्षक दाम्पत्य सामाजिक शैक्षणिक बांधिलकीतून शैक्षणिक क्षेत्रात सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात स्वतःच्या दोन्ही मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करणे,राज्यातील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या ठिकाणी वाढावी यासाठी स्वेच्छेने राज्यात सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात करणे, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या मदतीने शिक्षकांना इंग्रजी विषयाचे धडे देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस प्रकल्पात टॅग कॉर्डिनेटर म्हणून यशस्वी भूमिका बजावणे , तालुका जिल्हा स्तरावर प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका बजावणे ,सर्वत्र सकारात्मक शैक्षणिक वातावरण तयार होण्यासाठी प्रयत्न करणे जि प शाळा टिकवा अभियान राज्यभर राबवणे असे उल्लेखनीय कार्य या दोघेही शिक्षक दाम्पत्यांनी यापूर्वी यशस्वीरीत्या हाती घेत पूर्ण केले आहे. त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्यातून सतत इतरांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते व त्यांची सर्व उपक्रम नाविन्यपूर्ण असल्याने व कालसुसंगत असल्यानेअनुकरणीय ठरत असतात.किशोर पाटील कुंझ रकर हे दरवर्षी विविध सण उत्सवाच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव,शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका तसेच विविध योजनांची तळागाळात जनजागृती करतात.जयश्री पाटील या मुक ऑनलाईन या शिक्षकांसाठी शासनाने सुरु केलेल्या कोर्स च्या तालुका कॉर्डिनेटर म्हणून देखील काम पाहतात. अनेक तालुका जिल्हा स्तर प्रशिक्षणात दोघांनी तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या समता विभागांतर्गत बालरक्षकाच्या भूमिकेत दोघेजण कार्य करीत असून उपक्रमशीलता व तंत्र स्नेही पद्धतीने शिक्षकांमध्ये उत्साह वाढावा यासाठी देखील ते सर्वांना मदत करत असतात व प्रबोधन करत असतात. शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी समता विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या उपक्रमात देखील त्यांनी सहभाग घेतले आहे.जून पासून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या कोरोना काळाच्या दृष्टीने त्यांना सुचलेला घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी हा प्रयोग आदिवासी तसेच काठेवाडी वाड्या-वस्त्यांवर जाऊन प्रत्यक्ष ज्ञानदानाचे धडे देत शालेय विद्यार्थ्या साठी राबवत असून हा उपक्रम राज्यात सर्वत्र स्तुत्य आणिअनुकरणीय ठरला आहे.या उपक्रमाच्या सार्वत्रिकीकरणासाठी त्यांनी सोशल मीडिया व सर्वांना प्रोत्साहन दिले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड, आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे,जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील, विद्या परिषद पुणेचे संचालक डॉक्टर दिनकर पाटील, प्राथमिक विभागाचे संचालक जगताप साहेब,सह संचालक दिनकर टेमकर, डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर, लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश दादा पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार निलेश लंके आमदार विक्रम काळे आमदार किशोर दराडे आमदार मंगेश चव्हाण माजी सभापती पोपट तात्या भोळे,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील, आदींनी शुभेच्छा पाठवून या शिक्षक दाम्पत्याचे आत्मबळ वाढवले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षक संघटनांसह अनेकांनी राबवलेल्या या उपक्रमाविषयी या दोघे आधुनिक सामाजिक शैक्षणिक बांधिलकीतून कार्य करणाऱ्या दाम्पत्याच सोशल मीडिया व प्रत्यक्ष फोनवरून अभिनंदन केले आहे.जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांसह जळगाव डायट प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर व सर्व अधिव्याख्याता तसेच डॉक्टर विद्या बोरसे सुचेता पाटील. अधिव्याख्याता शैलेश पाटील डॉक्टर राजेंद्र महाजन अधिव्याख्याता मंगेश घोगरे डॉक्टर वाय आर सोनवणे अशोक चव्हाण व सर्व अधिव्याख्याता प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी एस अकला डे, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील ,जे डी पाटील केंद्रप्रमुख सूनिल महाजन पंचायत समिती सभापती अनिल महाजन सर्व सदस्य सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने व शिक्षकांच्या वतीने तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी शिक्षक संघटनांतर्फे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. बालरक्षक म्हणून थोर समाजसुधारकांच्या कृतीयुक्त वारसा चालवण्यासाठी या धडपडी शिक्षक दांपत्याने सुरू केलेला स्वच्छेने सुरू केलेला कालसुसंगत घर घर शाळा शिक्षण आपल्या घरी शिक्षण आपल्या दारी, उपक्रम राज्यात सर्वत्र अनुकरणीय ठरला आहे. सरळ मार्गाने फक्त आपल्या कार्यावर भर देत आणि कोणी निंदो किंवा वंदू सेवाभावी वृत्ती जोपासत शिक्षणक्षेत्रात स्वतःपासून बदलाची सुरुवात करणाऱ्या या शिक्षक दाम्पत्याने शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून अनोखा आदर्श उभा केला आहे. कोणी निंदा कोणी वंदा सरळ मार्गाने थोर समाज सुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा डोळ्यापुढे ठेवून या दोघा शिक्षक दांपत्याने कृतीयुक्त पद्धतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा केवळ भाषणातून ना सांगता कृतीयुक्त पद्धतीने पुढे नेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक अडचणी व त्रासातून या शिक्षक दाम्पत्याने सुरू केलेला शैक्षणिक सामाजिक कार्याचा सकारात्मक प्रवास प्रेरणादायी व अनुकरणीय कार्य करत आहे . सदरील शिक्षक दाम्पत्य आहे सतत चांगुलपणाचा ध्यास घेऊन शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो असे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील,माझी गटशिक्षणाधिकारी विकास पाटील माजी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी केंद्रप्रमुख संघाचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुणराव जाधव यांनी म्हटले.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

विनामास्क कारवायांची हाफ सेंच्युरी। तरीही नागरिकांमधे उदासीनता,चाळीसगावकारांचे मास्क कडे दुर्लक्ष

Read Time2 Minute, 14 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शहा

चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दि 29 चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे मा पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांचा मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलिस शिपाई विनोद खैरनार, प्रकाश पाटील, महेंद्र पाटील, संदीप पाटील, तसेच होमगार्ड जाधव, पवार, पाटील यांचे पथकाने चाळीसगाव नगरपालिकेचे कर्मचारी अजय देशमुख, किशोर राजपूत व रफिक शेख यांचे सोबतीने चाळीसगाव शहरातील गर्दीचे ठिकाण असलेल्या आर्योपार चौकात नाकाबंदीचे आयोजन करीत विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली, सदर कारवाईत 52 नागरिकांकडून प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे 5200 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यावेळी, नागरिकांनी मास्क न लावल्याची बहुविध कारणे सादर करीत पळवाटा शोधन्याचा प्रयत्न केला. त्यात, आता घरातून बाहेर आलो, दवाखान्यात गेलो होतो, तब्बेत बरी नाही, अंत्यविधीला जात असल्याने विसरलो, पहिल्यांदाच मास्क घालायला विसरलो अशी कारणे दिली परंतु, पोलिसांनी त्यांना मास्क लावणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले व त्यांचा कडून नगरपालिका कर्मचााऱ्यांनी दंड वसूल केला.

नागरिकांनी मास्क लावणे नितांत गरजेचे असल्याने विनामास्क घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी केले आहे.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

औरंगाबाद धुळे बायपास रोडवरील अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश

Read Time1 Minute, 41 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव-दि 28 चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील धुळे औरंगाबाद बायपास रोडच्या बाजूला चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस नाईक भटू पाटील, पोलीस शिपाई रवी पाटील, अशोक मोरे, भूषण पाटील, मुकेश पाटील या पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये आरोपी नामे दिलीप वसंत बाविस्कर वय- 35 वर्षे, राहणार- डेराबर्डी, चाळीसगाव हा त्याचे ताब्यात विदेशी दारू व बिअर बाटल्या चोरट्या विक्रीसाठी बाळगून असल्याचे मिळून आल्याने रक्कम रुपये 3910/- ची विदेशी रॉयल स्टेग दारूच्या बाटल्या व टुबोर्ग बिअरच्या बाटल्यांसह आरोपीला ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पो स्टे ला आणून आरोपिविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक भटू पाटील हे करीत आहेत.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नांतून पारोळा तालुक्यातील सावरखेडा शिवरे परिसरातील शेतकऱ्यांची वीज समस्या सुटली,मानले आभार आभार

Read Time2 Minute, 32 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

पारोळा — गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पारोळा तालुक्यातील सावरखेडा , शिवरे परिसरातील शेतकऱ्यांना वीज समस्येचा सामना करावा लागत होता. एकीकडे भरपूर पाणी असताना दुसरीकडे डी पी जळाल्याने वीज समस्या निर्माण झाली होती. गेल्या तीन दिवसांपूर्वी परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचे कडे आपली कैफियत मांडली होती. खासदार उन्मेश यांनी तातडीने पाचोरा उप विभाग अधिकाऱ्यांना सूचना देत दोन दिवसांत रोहित्र (डी पी) बसवण्याचे आदेश दिले होते. अखेर आज हे रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून खासदार उन्मेश पाटील यांचे आभार मानले आहेत.
याबाबत माहिती अशी की पारोळा तालुक्यातील सावरखेडा , शिवरे परिसरातील शेतकऱ्यांना शेती साठी विज पुरवठा देणारे रोहित्र (डी पी ) जळाल्याने वीज समस्या निर्माण झाली होती. याबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील विज वितरण कंपनी कडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने येथील शेतकरी भाऊसाहेब पाटील, प्रवीण पाटील,संभाजी पाटील, नाना चींधा पाटील, तुकाराम शीवरे, बापू पाटील,सागर कुमावत, दीपक पाटील यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याशी संवाद साधून आम्हाला शेतीसाठी विज पुरवठा देणारी डी पी बसवण्याची विनंती केली होती. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी पाचोरा उपविभाग अधिकारी शिरसाठ साहेब यांना तातडीने दखल घेत डी पी बसवण्याचे सूचना केली होती. आज अखेर हे रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

इंटरनॅशनल योंगमुडो फेडरेशन तथा भारतीय योंगमूडो फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट सेमिनार व ब्लॅक बेल्ट परीक्षा ऑनलाईन पध्दतीने

Read Time2 Minute, 22 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी मयूर साळवे

दिनांक: 20 सप्टेंबर रोजी इंटरनॅशनल योंगमुडो फेडरेशन तथा भारतीय योंगमूडो फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट सेमिनार व ब्लॅक बेल्ट परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आलेल्या होत्या ,या परीक्षेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय योंगमुडो फेडरेशनचे प्रमुख आंतरराष्ट्रीय परीक्षक,
मास्टर: हेऑन ताय क्वॉन,(कोरिया)
मास्टर: मिन चूल कांग(कोरिया)

राष्ट्रीय परिक्षक
मास्टर, रोहित नारकर (मुंबई)
(संस्थापक अध्यक्ष, भारतीय योंगमुडो महासंघ)

मास्टर, राणा अजय सिंग (छत्तीसगड)
(महासचिव,भारतीय योंगमुडो महासंघ)

मास्टर, प्रविण होले (पुणे)
(महासचिव, महाराष्ट्र योंगमुडो असोसिएशन)
हे उपस्थित होते,
या पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये योंगमुडो या खेळाचे 3rd DAN ब्लॅक बेल्ट मिळवणारे मास्टर प्रविण होले सर हे राज्यातील दुसरे तर पुणे जिल्ह्यातील पहिले खेळाडू व आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या पाचउत्कृष्ट खेळाडूंनमधे त्यांची निवड झाली आहे,
प्रविण होले सर योंगमुडो या खेळाचे विद्यमान महासचिव म्हणून कार्य करत आहेत,,,
याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे,,,तसेच भारतीय योंगमुडो फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष, मा. श्री. रोहितजी नारकर सर,
महासचिव, मा. श्री. राणा अजय सिंग यांनीही सरांचे कौतुक व अभिनंदन केले,, सरांच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

विकास कामांचे फलक लावणे आदेशाला दौंड नगरपालिका ठेकेदारांन कडून केराची टोपली. दौंड नगरपालिका प्रशासनाचा मनमानी कारभार

Read Time4 Minute, 20 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी हर्षल पाटोळे

दौंड,दि.24/09/2020 (दौंड प्रतिनिधी: हर्षल पाटोळे ) कामाची माहिती व्यापक प्रसिद्धीच्या दृष्टीने जनतेस सहजरीत्या उपलब्ध करून देणे तसेच कामामध्ये पारदर्शीपणा असणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने विकास कामांचे माहिती दर्शक फलक लावणे शासन नियम आदेशा नुसार बंधनकारक असताना दौंड नगरपालिका ठेकेदारांन कडून मात्र शासन आदेशाचा अवमान केला जात आहे. या बाबत दौंड नगरपालिका प्रशासना कडून मात्र कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई दौंड नगरपालिका ठेकेदारांनवर  करताना आढळून येत नाही.दौंड नगरपालिका हद्दीत सद्यस्थितीला विविध विकास कामे सुरु आहेत. विकास कामे सुरु असताना कामाच्या ठिकाणी विकास कामांचे माहिती दर्शक फलक लावणे बंधनकारक आहे या बाबत नागरिकांन कडून वारंवार विचारणा केली जात आहे. विकास कामांचे माहिती दर्शक फलक लावलेले नाही ही बाब नगरपालिका प्रशासनास निदर्शनास आली असता दिनांक 12/02/2020 रोजी मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी कार्यालयीन आदेश काढून सर्व विभाग प्रमुखांना आदेशित केले की, दौंड नगरपरिषद मार्फत सुरु असलेल्या विकास कामांचे फलक लावणे हे प्राधान्याने पुर्ण करुन तसा अहवाल सात दिवसात सादर करावा जे विभाग प्रमुख आदेशा नुसार कार्यवाही करणार नाही अशा विभाग प्रमुखां विरुद्ध शासकीय नियमानुसार योग्य ती कारवाईकरण्यात येईल अशा आशयाचे कार्यालयीन आदेश असताना देखील संबधित विभाग प्रमुखांनी, ठेकेदारांन कडून फलक लावणे बाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच मुख्याधिकारी यांनी संबधित विभाग प्रमुखांनवर आदेशाची अंमलबजावणी न होणे बाबत
कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.
   नागरिकांच्या मौखिक/लेखी स्वरुपात तक्रारी येत असताना मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी दिनांक 14/08/2020 रोजी कामांचे ठिकाणी माहिती दर्शक फलक लावणे बाबत नगरपालिका ठेकेदार बांधकाम विभाग, 17 ठेकेदारांना पत्र काढण्यात आली, या पत्रामध्ये असे म्हटंले आहे की, चालू असलेले कामांचे माहिती दर्शक फलक शासन नियमानुसार दोन दिवसात बसविणेत यावे व माहिती दर्शक फलक जिओ टँगिग द्वारे फोटो काढून कार्यालयात सादर करावा अन्यथा नगरपरिषद आपले बिलातून सदर रक्कम कपात करुन माहिती दर्शक फलक बसविणेचे कार्यवाही करेल याची सक्त नोंद घ्यावी. अशा प्रकारची सक्त ताकीद देऊन देखील अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेचे निदर्शनास येत नाही.
   मुखयाधिकारी मंगेश शिंदे यांची बदली झाल्यामुळे नव्याने पदभार स्विकार करणारे मुख्याधिकारी सौ.निर्मला राशिनकर दौंड नगरपालिकेचा कारभार   पारदर्शी आणि लोकाभिमुख होणे कामी संबधित विषया कामी कोणती कारवाई करणार या बाबत नागरिकांन कडून खुलासा मागितला जात आहे.

3 0
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दारू पिऊन मध्यरात्री रोडवर धिंगाणा घालणाऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलावर गुन्हा दाखल

Read Time1 Minute, 56 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शहा

चाळीसगांव(दि 22)-चाळीसगाव तरुण वयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणावर पोलिसांची दबंग कारवाई रात्री शहर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत दारू पिऊन धिंगाणा घालनाऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड परिसरात असलेल्या साई पान स्टॉल शेजारील सार्वजनिक जागेवर दारू पिऊन धिंगाणा करणारा तरुण नामे अथर्व येमेश नेरकर (सोनार) वय- 22 वर्षे , धंदा- ज्वेलरी डीजायनिंग , राहणार- सराफ गल्ली, चाळीसगाव यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मयूर भामरे हे करीत आहेत।

सदर धिंगाणा घालणाऱ्या तरुणाचे वडील चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर येत आहे व त्यामुळेच आपले कोणी वाकडे करू शकत नाही या अविर्भावात सदर तरुण वावरत होता अशी चर्चा आहे.

रात्रीच्या वेळेस शहरात मद्यपान करून सर्वसामान्य नागरिकाना त्रास देणाऱ्या अशा बड्या धेंडांवर कारवाई झाल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

राज्यात डिजिटल शिक्षणासाठी शिक्षकांना ऑनलाइन गुगल क्लासरूम प्रशिक्षण शासनाचा उपक्रम

Read Time6 Minute, 24 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

जळगाव- दिनांक 22 महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, तसेच सर्व मंत्रिमंडळ तसेच राज्याच्या शालेय शिक्षण विभाग,शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार वर्षाताई गायकवाड यांच्या प्रेरणेने आणि पुढाकारातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे विविध मार्गाचा अवलंब करीत आहे.शाळा बंद पण शिक्षण सुरू अशा परिस्थितीत शाळा बंद परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीला महत्त्व प्राप्त झाले आहे.महाराष्ट्र सरकार गुगल फॉर एज्युकेशन स्कूल नेट फॉर इंडिया, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा राज्यातील शिक्षकांना ऑनलाइन डिजिटल टूल्स फॉर एज्युकेशन एज्युकेशन च्या बाबतीत गूगल क्लासरूम द्वारा गूगल द्वारा समृद्ध करण्याचा कार्यक्रम शासनाच्या पुढाकाराने हाती घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन प्रशिक्षणाची दोन दिवशीय कार्यक्रमाची पहिल्या टप्प्याची दिनांक २२ रोजी सांगता झाली. सदरील ऑनलाइन राज्यस्तरीय प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येत असून लगेच यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना ऑनलाईन सर्टिफिकेट उपलब्ध होत आहे.नोंदणीकृत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे द्वारा प्राप्त यादी आणि प्राप्त पासकोड झालेल्या शिक्षकांना डिजिटल एज्युकेशन संदर्भात कल्पेश महाशिलकर आणि मनीष किरडे यांनी दिनांक २१आणि २२ सप्टेंबर २०२० रोजी सखोल मार्गदर्शन केल्याची माहिती या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गालापूर येथील प्रयोगशील शिक्षिका तसेच शासनाच्या तेजस प्रकल्पातील टॅग कॉर्डिनेटर तथा एरंडोल तालुका MOOC प्रकल्पाच्या तालुका कॉर्डिनेटर जयश्री पुरुषोत्तम पाटील यांनी दिली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,कालसुसंगत व शिक्षकांना अपडेट राहण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्यशासनाने तसेच राज्य शालेय शिक्षण विभागाने उचललेले हे महत्त्वपूर्ण आणि आम्हा शिक्षकांना उपयुक्त पाऊल आहे. सदरील प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण करताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्याअसल्याचे म्हटले. सहभागी व यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना लगेच ऑनलाईन राज्य सरकार द्वारा प्रमाणपत्र देखील ईमेलवर प्राप्त झालेत. दरम्यान या गूगल क्लासरूम राज्यस्तरीय प्रशिक्षणाच्या संदर्भात शिक्षकांसाठी नियोजन करून कठीण काळात अपडेट होण्याची सुवर्ण संधी मिळवून दिल्याचे महाराष्ट्र राज्यातील 32 शिक्षक संघटनांच्या एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समितीचे राज्य महासचिव तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव आणि या प्रशिक्षणात सहभाग घेऊन यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणारे राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी किशोर पाटील कुं झरकर यांनी राज्य शासनाचे तसेच मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार तसेच एस सी ईआर टी चेआभार व्यक्त केले असून शाळा बंद परंतु शिक्षण सुरू अशा अवस्थेत ऑनलाइन पद्धतीने राज्यातील शिक्षकांना शिकण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे म्हटले.यासंदर्भात त्यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड तसेच एस सी आर ई आर टी चे संचालक डॉक्टर दिनकर पाटील, आयटी सेल, स्कूल नेट फॉर इंडिया टीम आणि अंमलबजावणी करणाऱ्या सर्व घटकांचे शिक्षक संवर्ग कडून व शिक्षण संघटनांकडून अभिनंदन केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डायट चे प्राचार्य व सर्व टीम त्याच जोडीने गटशिक्षणाधिकारी , शिक्षण विस्ताराधिकारी विशेष तज्ञ आयटी सेलकेंद्रप्रमुख या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी समन्वयाची भूमिका बजावत आहेत.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %