रयत सेनेच्या रक्तदान शिबिराला वाढता प्रतिसाद – आज शिबिराचा तिसरा दिवस

चाळीसगाव – राज्य शासनाने अनेक वेळा आवाहन करून देखील नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नाही मात्र देशाप्रती अस्था ठेवुन रक्तदान करावे असे आवाहन रयत सेने तर्फे नागरिकांना करतो .या संकटकालीन स्थितीत रक्तपुरवठ्यात घट होऊ नये व गरजूंना रक्त पुरवठा कमी पडे नये हे लक्षात घेऊन येथील रयत सेनेच्या वतीने दिनांक […]

करोना प्रतिबंधासाठी कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्तींना मिळणार १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम आणि २५ लाखाचे विमा

मुंबई, दि. ३१ : सध्या करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांना मिळणाऱ्या नियमित वेतन, मानधनाव्यतिरिक्त त्यांना १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर,रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय केंद्र शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या ५० लाख रुपयांच्या विम्याच्या […]

पीपल्स सोशल फाउंडेशन व रोटरॅक्ट क्लब ऑफ क्लासिक चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 50 कुटूंबाना भाजीपाला वाटप

चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दि 30 मार्च पीपल्स सोशल फाउंडेशन व रोटरॅक्ट क्लब ऑफ क्लासिक चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या मदत कार्यासाठी आज रुतिक पाटील याच्या कुटुंबच्या मदतीने. एकलव्यनगर व डेराबर्डी परिसरातील भटकंती करणारी कुटुंब तसेच पंचशीलनगर येथील काही हातमजुर गरीब कुटूंबाना 3-4 दिवस पुरेल असा 50 कुटूंबाना भाजीपाला वाटप करण्यात आल्या. […]

कोरोना विषाणूबाबत पुणे विभाग माहिती पत्र

पुणे(प्रतिनिधी):- दि. 30/03/2020 पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल)च्या दि.२९/०३/२०२० रोजी एकूण २१६०३ फे-यांपैकी १९९९३ फे-या रद्द केल्या. १६१० फे-यांमध्ये एकूण ५१६१ प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. सद्या फक्त अत्यावश्यक बाबींसाठी फे-या सुरु ठेवलेल्या आहेत. 1)पुणे विभागामध्ये कोरोना सांर्सगिक रुग्णसंख्येमध्ये 8ने वाढ झाली असून आज दि.30/03/2020 अखेर एकूण रुग्णसंख्या 72 आहे […]

ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीची जिल्‍हाधिकारी राम किशोर नवल यांच्‍याकडून पहाणी

पुणे(प्रतिनिधी):-कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीत 5 एप्रिलपर्यंत 50 आयसीयू (इंटेन्सिव्‍ह केअर यूनिट) आणि 100 आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्‍या कामांची पहाणी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांनी केली. यावेळी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. अजय चंदनवाले, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, डॉ. […]

ज्येष्ठ नागरिकांमधील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असून त्यांच्यामधील या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत केंद्रीय आरोग्य.कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सोशल मीडियाद्वारे जनतेशी वारंवार संवाद साधून कोरोनाला रोखण्यासाठी घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन केले […]

आपल्या पगारातून 121 कुटुंबांना किराणा वाटप चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन चा उपक्रम

चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दि 30 मार्च रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे 121 कुटुंबांना 19 प्रकारचा किराणा वाटण्यात आला किराणा मध्ये 5 किलो गहू,5 किलो तांदूळ,1 किलो शेंगदाणे,1 किलो सोयाबीन तेल,1 किलो मीठ,1 किलो मसूर डाळ,1किलो साखर,टूथपेस्ट,अंघोळीचा साबण,कपड्यांचा साबण,भांड्यांचा साबण,पॅराशूट तेल,चहा पावडर,हळद,मसाला पावडर,मिरची पावडर,जिरे,मोहरी प्रत्येकी 1 नग,बिस्कीट 2 नग हा सर्व प्रकारचा […]

कोरोना रुग्णांची माहिती सोशल मिडीयावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जळगाव, दि. 29 – जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचे नाव व तपासणी अहवाल सोशल मिडीयावर प्रसारित करणा-या अज्ञाताविरुध्द तातडीने गुन्हा दाखल करावा. तसेच संबंधितांचा शोध जिल्हा सायबर सेलने लवकरात लवकर घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिलेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर […]

वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी येणारा खर्च राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून खर्च करण्याची सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी

मुंबई:-राज्यात लॉकडाऊन मुळे परराज्यातील प्रवाशी, स्थलांतरित कामगार, बेघर व्यक्तींना अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी येणारा खर्च राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून खर्च करण्याची सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी. सर्व जिल्ह्यांना ४५ कोटी निधी वितरीत.महाराष्ट्राच्या किंवा जिल्ह्यातील सीमेवर स्थलांतरित कामगार, बेघर व्यक्ती मिळेल त्या वाहनाने, पायी येत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये […]