अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रीयेस १जानेवारी पासून सुरूवात

Read Time4 Minute, 3 Second

जळगाव, दि. २७ – अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली व २ रीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता १ ली व २ रीत प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला त्याचे किंवा त्याच्या पालकांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये १ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, इयत्ता १ ली साठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ३० सप्टेंबर, २०२० रोजी ६ वर्षे पुर्ण असावे. त्यानुसार त्याचा जन्म १ ऑक्टोंबर, २०१३ ते ३० सप्टेंबर, २०१४ दरम्यानचा असावा. तर इयत्ता २ रीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थीने २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता १ ली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे आधारकार्ड असणे आवश्यक असून विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, पालक शासकीय/निमशासकीय सेवेत नसावा.
या योजनेंतर्गत ज्या पालकांना आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत १ ली व २ री च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा पालकांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्मदाखला व आधारकार्डची साक्षांकित प्रत सादर केल्यांनंतर प्रवेश अर्ज १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी, २०२० या दरम्यान वाटप केले जाणार आहे. पालकांनी परीपूर्ण भरलेला अर्ज ५ मार्च, २०२० पूर्वी सादर करावा.
इयत्ता १ ली व २ रीच्या प्रवेशासाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी १५ मार्च, २०२० रोजी बालमोहन विद्यालय, चोपडा, शिवकॉलनी शिरपुर रोड, चोपडा येथे उपस्थित रहावे. तर रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी १५ मार्च, २०२० रोजी शासकीय आश्रमशाळा, डोंगरकठोरा, ता.यावल येथे उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयाच्या 02585-261432/262035 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

अझरुद्दीन रेहमान मुल्ला यांची ग्रामीण मुस्लिम साहित्य चळवळ तालुका प्रमुख पदी निवड

Read Time40 Second

उंबरखेड ता चाळीसगाव (प्रतिनिधी): उंबरखेड ता चाळीसगाव येथील अझरुद्दीन रेहमान मुल्ला यांची ग्रामीण मुस्लिम साहित्य चळवळ तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली या वेळी उंबरखेड ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य लियाकत पठाण ,मुस्लिम पंच कमिटी राजू पठाण, रहेमान मुल्ला
सहकारी, आरिफ पठाण, वसीम शेख, आसिफ मुल्ला, नदीम पठाण, करिम सैय्यद यांनी सत्कार केला.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

मुक्त कलाविष्कारातून कलाशिक्षकांनी दिले विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ,रोटरी क्लबतर्फे आयोजित चित्रकला कार्यशाळेचे आयोजन

Read Time3 Minute, 37 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी) आज दि २७/१२/२०१९ रोजी सकाळी ९ वाजता रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव यांच्या वतीने कलामहर्षी केकी मुस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील सुवर्णा स्मृती उद्यानात चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संदिप देशमुख, प्रकल्प प्रमुख नरेंद्र शिरुडे, सह प्रकल्प प्रमुख स्वप्नील कोतकर, संजय चौधरी, मधुकर कासार, समकित छाजेड, राजेंद्र कटारिया, बलदेव पुन्शी, प्रा. अभिषेक देशमुख, सनी वर्मा, गणेश बागड आदी उपस्थित होते

सुरुवातीस कलामहर्षी केकी मुस यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येवून केकी मुस यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली. डॉ. संदिप देशमुख यांनी केकीमुस यांच्या जीवनावर आधारित माहिती स्पष्ट करीत चित्रकलेच्या माध्यमातून अनेक परिक्षा देवून याचा लाभ आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा घेता येत असतो. एलिमेंटरी, इंटरमीजिएट यासारख्या चित्रकलेच्या परिक्षांचे महत्व जाणून घ्यायला हवे असे डॉ. संदिप देशमुख यांनी सांगितले तर चित्रकला हा छंदाबरोबर जीवन जगण्याची कला शिकवण्याचे माध्यम असून अंगी असलेली कोणतीही कला वाया जात नसल्याचे चित्रकार धर्मराज खैरनार यांनी यावेळी सांगितले. यावेळी कलाशिक्षक धर्मराज खैरनार,मनोज पाटील, सादिक शेख, अमोल येवले, अमोल रोजेकर, सागर मोरे यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले तर सोहम पिंगळे, विश्वेश पाटील, रणवीर पाटील, गणेश मोरे (पोहरे) या विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले.

कलाशिक्षकांनी चित्रकलेच्या माध्यमातून महत्वपूर्ण नोंदीचे प्रभावी मार्गदर्शन करुन अवघड वाटणारे चित्र सोपे करुन दाखविले. रंग भरण्याच्या सोप्या पध्दती, निसर्ग चित्र, स्केचिंग, डिझाईन याविषयक प्रात्यक्षिके सादर करुन दाखवलित. अंक, अक्षर यासह अनेकविध प्रकारातून चित्र रेखाटण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावेळी उत्स्फूर्त सहभाग घेत चित्रांचा आनंद घेतला तर मुक्त कलाविष्काराच्या माध्यमातून आयोजित कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांची चित्रकलेविषयक असलेली भीती दुर झाल्याचे यावेळी दिसून आले. प्रास्ताविक मधुकर कासार यांनी केले तर आभार नरेंद्र शिरुडे यांनी मानले.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

शहर विद्रुपीकरण थांबवा संभाजी सेनेच्या ठिया आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक बॅनर मुक्त

Read Time3 Minute, 24 Second


चाळीसगाव(प्रतिनिधी): संभाजी सेनेने चाळीसगाव शहरात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विद्रूपीकरण याबाबत छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये विविध जाहिरातींचे वाढदिवसाचे अनेक कार्यक्रमांचे फलक लावून शहर विद्रुपीकरण केले जाते आणि त्यात भर म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकात होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी सध्या काम सुरू असलेले शिवसृष्टी चे काम सुरू आहे त्यावर देखील विविध कार्यक्रमांचे बॅनर लावून जाहिरातबाजी सुरू झालेली आहे तरी ही बॅनरबाजी तात्काळ रोखावी म्हणून संभाजी सेनेने आज दिनांक २७ डिसेंबर रोजी चाळीसगाव नगरपालिका प्रशासनास एक तासाची मुदत देत सदर सर्व बॅनर पोस्टर न काढल्यास ठिय्या आंदोलन करणार असा इशारा दिल्याने नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले व लागलीच छत्रपतीशिवाजीमहाराज चौकातील वाढदिवसाचे तसेच विविध हॉटेलच्या जाहिरातींचे व काही कार्यक्रमांचे लागलेले बॅनर काढून चौक बॅनर मुक्त केला यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊ लागल्याचे दिसून आले विशेष म्हणजे ज्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची शिवसृष्टी उभारली जात आहे येथेही काही महाभागांनी बॅनर लावल्याचे दिसून आल्याने संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी संताप व्यक्त केला असा प्रकार पुन्हा कधीही खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी दिला शहराचे होणारे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी संभाजी सेनेने केलेले हे अनोखे आंदोलन चाळीसगाव करांचा कौतुकाचा विषय होत आहे या वेळी संभाजी सेनेच संस्थापक अध्यक्ष
लक्ष्मण बापु शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे , अविनाश काकडे, ज्ञानेश्वर पगारे,रवींद्र शिनकर,बंटी पाटील,कृष्णा पाटील,लक्समन बनकर घनश्याम सोनार,राकेश पवार, दिवाकर म्हणाले, राकेश जोशी,आधार महाले,गणेश वाघ,सुनील पाटील, सचिन जाधव, गोपीनाथ घुगे,संदीप जाधव,कुणाल आराक, विजय सगळे, गणेश गीते, अशोक देवरे, सुरेश पाटील, भैय्यासाहेब देशमुख, सुयोग नरवाडे, सुरेश तिरमली आदी उपस्थित होते.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

पद्मदुर्ग किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा लावण्याचा आनंद सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे साजरा

Read Time2 Minute, 26 Second


चाळीसगाव(प्रतिनिधी): आज दि २७/१२/२०१९

रोजी

सह्याद्री प्रतिष्ठान या गड किल्ले संवर्धनाची चळवळ राबविणाऱ्या संघटनेने रायगड जिल्ह्यातील समुद्रात जंजिरा किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावर दिनांक २६ डिसेंबर रोजी देशातील सर्वात उंच भगवा ध्वज कायमस्वरूपी उभारून किल्ल्याच्या वैभवात भर घातली असून समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यासाठी आकर्षित करण्याचे काम परम पवित्र भगवा कायमस्वरूपी करेल हा भगवा ध्वज उभारण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान ने गेल्या वर्षभरापासून काम हाती घेतले होते.ते दिनांक २६ डिसेंबर रोजी पूर्णत्वास गेल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी आपल्या शहरांमध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला व सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे आणि सहभागी सर्व दुर्ग सेवकांचे अभिनंदन करण्यात आले .यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे उत्तर महाराष्ट्र प्रमुख,शुभम चव्हाण ,अजय जोशी ,योगेश शेळके, दिपक राजपूत ,गणेश पाटील, रामलाल मिस्तरी ,पप्पू राजपूत, दिनेश घोरपडे ,रवींद्र दुशिंग ,वाल्मीक पाटील, जितेंद्र वाघ ,सचिन पाटील ,राहुल पवार ,दिलीप बोराडे ,आकाश चव्हाण ,आकाश शेळके, रवींद्र मोरे सुनील कोळी ,सागर पांचळ,सचिन घोरपडे ,अजय घोरपडे सोहम येवले ,तेजस गुंजाळ ,निलेश गुंजाळ ,सचिन देवरे ,रोहित गुंजाळ,प्रशांत जाधव,अतिश कदम उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आयोजित कलामहर्षी केकी मुस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चित्रकला कार्यशाळा

Read Time1 Minute, 39 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आयोजित कलामहर्षी केकी मुस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
चित्रकला कार्यशाळा या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शकांकडून सोप्या पद्धतीत रेखांकन ,रंग भरण्याचे विविध सोप्या पद्धती, निसर्गचित्र , स्केचिंग ,डिझाईन या विषयाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी कलाप्रेमींनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
तज्ञ मार्गदर्शक
चित्रकार धर्मराज खैरनार , चित्रकार सादिक शेख ,चित्रकार अमोल येवले चित्रकार अमोल रोजेकर ,चित्रकार सागर मोरे ,चित्रकार मनोज पाटील
दिनांक व वेळ
दि.२९/१२/२०१९ वार -रविवार
सकाळी – ८.३० ते १०.३०
ठिकाण
कै. सौ .सुवर्णाताई उद्यान , भडगाव रोड , चाळीसगाव.
आयोजक
रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव
रोटे. डॉ. संदीप देशमुख ( अध्यक्ष )
रोटे. रोशन तातेड ( सचिव)
रोटे. नरेंद्र शिरूडे ( प्रकल्प प्रमुख )
रोटे. स्वप्निल कोतकर (सह प्रकल्प प्रमुख )
टीप – चित्रकला कार्यशाळेत उपस्थित राहणाऱ्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे देण्यात येतील.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दफनभूमी संदर्भात विश्वगुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज चाळीसगाव तालुका यांच्या वतीने प्रांताधिकारी चाळीसगाव यांना निवेदन देण्यात आले

Read Time3 Minute, 22 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी) आज दि २७/१२/२०१९ गुरुवार रोजी
श्री मुकेश प्रतापगिरी गोसावी यांच्या अध्यक्षेखाली विश्वगुरू शंकराचार्य दशनाम गोसावी समाज चाळीसगाव तालुका यांच्यावतीने सर्व समाज बांधवांनी सकाळी ११ वा.चाळीसगाव. प्रांतअधिकारी चाळीसगाव यांना दफनभुमी संदर्भात निवेदन दिले.
गोसावी समाजाने वेळोवेळी दफनभूमीसाठी जागेची मागणी केली असता असे लक्षात आले आहे की सदरची जागा ही शासनाने ग्रामपंचायतीला हस्तांतरित केलेली असल्याने गोसावी समाजाने व तहसील कार्यालयाने वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे मागणी केली असता महाराष्ट्र शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्रमांक/ द व भू /२०१० /प्र.क्र.६२ /परा ६ दिनांक १६/०९/२०१० तसेच उपसचिव ग्रामविकास विभाग यांचे सर्व जिल्हा अधिकारी व जीप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले पत्र जा.क्र.ददभु/२००४/परा ६(४७)/प्र.क्र.७७७/ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई दिनांक १७/०४/२००४ नुसार प्रत्येक गावात दफनभूमी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.
तरी गोसावी समाजाने वेळोवेळी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता मोजणी.करून वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे ठराव मागितला पण ग्रामपंचायतीने टाळाटाळ केली.त्यानुसार त्यांचे हरकत नाही असे गृहीत धरुन गोसावी समाज दफनभूमीसाठी ही जागा देण्यात यावी अन्यथा १५ जानेवारी पासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा दशनाम गोसावी समाज चाळीसगावच्या वतीने देण्यात आला. त्यावेळी सह्या करणारे समाजबांधव मुकेश गोसावी नितीन गोसावी, मंगल गोसावी ,गोरख सु गोसावी ,गणेशपेंटर गोसावी, गोरख अ गोसावी,संजय गोसावी ,संजय गोसावी ,पेंटर सुनील गोसावी ,किशोर गोसावी ,चंदन गोसावी, बजरंग गोसावी ,भैया गोसावी ,वाल्मिक गोसावी, मोतीगिरी गोसावी, शेखर गोसावी, रामचंद गोसावी ,प्रल्हाद भारती, नारायण भारती ,रवी गोसावी ,भिकन गोसावी,अप्पागिर गोसावी , मनोज गोसावी , रमेश भारती, संजय संतोष गोसावी ,अनिल गोसावी ,ज्ञानेश्वर गोसावी, प्रकाश गोसावी, त्रिशुल गोसावी, विश्वास गोसावी सर्व समाज बांधवांच्या सह्या असून निवेदन प्रसंगी उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

ज्यांचे जीवन प्रेरणा देते असे डॉ मुरलीधर(बाबा) आमटे

Read Time8 Minute, 5 Second

अधिकार आमचा(विशेष): आज दि २६/१२/२०१९ रोजी माणसातल्या देवाचा जयंती दिवस. जो हीन – दीन, दुबळे- आजारी, अंधश्रध्द – आदिवासींची सेवा – शुश्रूषा करतो, त्यांना मोफत वैद्यकिय सेवा-मुलांना शिक्षण देऊन त्यांना माणूस म्हणून स्वतःच्या पायावर उभे करतो. ती माणसे त्या देवमाणसावर प्रेम करतातच पण रानटी जनावरे-श्वापदे, सरपटणारे प्राणी सारे सारेच त्यांना आपले मानतात. ती जनावरे त्यांच्यावर खुप प्रेम करतात असे अद्भूत अवलीया, मॅगसेसे पुरस्कार विजेते, भारतभूषण डॉ. मुरलीधर (बाबा)आमटे यांना जन्मदिना निमित्त जयंतीनिमित्त शब्द प्रपंच. .समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे.
बाबांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली वर्धा जिह्यातल्या हिंगणघाट या गावी झाला. बाबांचं घराणं सधन जहागीरदाराचं. त्यांचे वडील देविदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपणनाव मिळालं होतं.
बाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते. पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत त्यांना कारावासाची शिक्षाही झाली. महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. म. गांधींबरोबरच रविंद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती.
१९४६ साली त्यांचा साधना गुलेशास्त्रींशी विवाह झाला. साधनाताई बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या आणि आयुष्यभर त्यांना साथ दिली.
बाबा एकदा मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत असहाय्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी पाहिले आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. बाबांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतरही अनेक सामाजिक-पर्यावरणसंबंधित चळवळींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
ज्या काळात त्यांनी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं कार्य हाती घेतलं, त्या काळात महारोग हा महाभयंकर समजला जात होता. महारोग्यांना कुणी जवळ करीत नसे. त्यामुळे त्यांच्या नशिबी अस्पृश्यांसारखे जीणे येत असे. असहाय्य रोगाने गांजलेले हे रोगी त्यामुळे मानसिकरित्याही खचून जात असत. समाजात त्यांना वावरताही येत नसे. त्या काळात असाही गैरसमज होता की महारोग हा संसर्गजन्य असतो. जनमानसातला हा गैरसमज दूर करण्यासाठी बाबांनी एका महारोग्याचे जंतू आपल्या नसांत इंजेक्शनने टोचून घेतले.
आज आनंदवनात एक सुसज्ज हॉस्पिटल आहे, शाळा आहे आणि अनाथाश्रमही आहे. आनंदवनात पाच हजारांपेक्षाही जास्त लोक वास्तव्याला आहेत. आनंदवन’चा प्रकल्प जगातील एक मान्यताप्राप्त प्रकल्प आहे. समाजकार्याबरोबरच मोजकंच पण अतिशय सशक्त लेखनही त्यांनी केलं.ज्वाला आणि फुले’ हा त्यांचा कवितासंग्रह अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला. उज्ज्वल उद्यासाठी’ हा काव्य संग्रह आणिमाती जागवील त्याला मत’ ही त्यांची पुस्तकंही गाजली.
बाबांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणार्‍यांसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार. हा पुरस्कार त्यांना १९८३ मध्ये प्रदान करण्यात आला. १९८५ साली आशियाचं नोबेल पारितोषिक समजले जाणारे रेमॉन मॅगसेसे पुरस्कारानं त्यांना सन्मानीत करण्यात आलं आणि संयुक्त राष्ट्र’ने १९९१ आणि १९९८ साली त्यांचा सन्मान केला. या व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. भारत सरकारने १९७१ साली पद्मश्री आणि १९८६ साली पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानीत केलं. महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुले पुरस्कार त्यांना १९९८ साली देण्यात आला आणि २००४ साली त्यांनामहाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं.
गेली काही वर्षं त्यांना शारीरिक व्याधीमुळे बसता येत नव्हतं, त्यांना सतत झोपून राहावं लागायचं. पण तरीही त्यांच्या कार्यांमध्ये कोठेही खंड पडला नाही. २००७ साली त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि अखेर ९ फेब्रुवारी २००८ साली वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
त्यांची दोन्ही मुलं विकास आणि प्रकाश आणि सुना मंदाकिनी आणि भारती हे सर्व डॉक्टर आहेत आणि वडिलांचा समाजकार्याचा वारसा समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नातवंडांची तिसरी पिढीही आता समाजकार्यासाठी सज्ज आहे.
पद्मश्री बाबा आमटे म्हणजे समाज सेवेचा प्रेरणास्रोत आजही सामाजिक कार्य करणाऱ्यांसाठी मोठा दीपस्तंभ आहेत जयंतीनिमित्तत्यांच्या शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीच्या वतीने विनम्र अभिवादन
किशोर पाटील कुंझरकर.
राज्य समन्वयक राज्य समन्वय समिती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

स्व.पप्पू दादांच्या पावन स्मृती विनम्र अभिवादन

Read Time58 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):दि २५/१२/२०१९ रोजी संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोकनेते पप्पू दादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान चाळीसगांव तर्फे स्व.पप्पूदादा गुंजाळ यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी ,लोकनेते पप्पूदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान चाळीसगांव चे उमेश(पप्पूदादा) साहेबराव गुंजाळ, मनिष सैंदाने,राहुल पाटील,साहेबराव काळे, सागर चौधरी ,सचिन फुलवारी,सोनू साळुंखे,सोनू गवळे, शशिकांत जाधव,अजय चौधरी व स्व.पप्पू दादांना मानणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

आई यलम्मा पालखी उत्सव समितीच्या वतीने आमदार डॉ. फारूक शाह यांचा सत्कार

Read Time1 Minute, 22 Second

धुळे(प्रतिनिधी):सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही आई यलम्मा (रेणुका) देवीची पालखी मालेगाव रोडवरील मंदिरातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पालखीला धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी यावेळी आईचे दर्शन घेऊन पालखीला खांदा लावून मार्गस्थ केले , आमदारांनी धुळेकर जनतेला एकात्मता आणि भक्ती भावाचे अनोखे दर्शन घडवले. यावेळी राजकमल टॉकीज, आग्रा रोड येथे आई यलम्मा पालखी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शाह यांचा सत्कार केला. यावेळी मंदिरावरील पुजारी यांच्यासह समितीचे प्रमुख संजय शेंडे पहेलवान, ज्ञानेश्वर दादा कोरे, बबन जिरेकर, भोलू बाबा शाह, अरुण मेखले, बाळू भाऊ मंगीडकर, सुनील जिरेकर, मयूर कंड्रे, सचिन शेवतकर, किशोर कंड्रे, उल्हास खोपडे, बापू मेखले, हमीद अण्णा, युसूफ पिंजारी आदी उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %