जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातवळण शाळेचे मंथन पूर्व प्रज्ञाशोध (मंथन जनरल नॉलेज एक्सामिनाशन)M.G.K.E मंथन टॅलेंट सर्च एक्सामिनाशन परीक्षेत राज्यस्तरीय घवघवीत यश

Read Time1 Minute, 54 Second

दौंड(प्रतिनिधी):- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातवळण शाळेचे मंथन पूर्व प्रज्ञाशोध (मंथन जनरल नॉलेज एक्सामिनाशन)M.G.K.E मंथन टॅलेंट सर्च एक्सामिनाशन परीक्षेत राज्यस्तरीय घवघवीत यश,
या मध्ये
इयत्ता पहिली:- कुमारी ,श्रेया दिलीप मोरे राज्यस्तरीय 35 वी.
इयत्ता चौथी :-1) कुमार शिवतेज मंगेश फडके ,राज्यस्तरीय 26 वा,
कुमारी शेजल अशोक गदादे,राज्यस्तरीय 28 वी,
इयत्ता पाचवी 1)कुमारी प्रणिती चंद्रकांत शितोळे राज्यस्तरीय 25 वी,
2) कुमारी सुष्टी सचिन शिंदे राज्यस्तरीय 28 वी
इयत्ता सहावी :- कुमारी तृप्ती सचिन शिंदे ,राज्यस्तरीय 51 वी
सर्व यश संपादित विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच या साठी मनापासून प्रयत्न करणारे सर्व शिक्षक वर्ग शाळेच्या मुख्यध्यपिका पगारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कष्ट करणारे श्री भालेराव सर,शीतल शेंडे मॅडम,माया नराळे मॅडम, श्री घोरपडे सर,व संपकाळ सर यांचे हि श्री मंगेशदादा फडके अध्यक्ष शालेय शिक्षण समिती(माजी) यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले, व शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, व शालेय शिक्षण समिती व हातवळण ग्रामस्तांनी शाळेचे मनभरून कौतुक केले,

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

कुठल्याही अफवांना बळी पडू नका जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतरच स्थलांतरणास परवानगी

Read Time2 Minute, 56 Second

दि.30/04/2020 लॉकडाऊन मुळे अडकलेल्या कामगारांनी स्थलांतरणासाठी घाई करु नये-जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन

पुणे दि 30: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांनी त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने कार्यपध्दती निश्चित केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. तथापि स्थलांतरणासाठी इच्छूकांनी जाण्यासाठी घाई करु नये तसेच घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.सद्यस्थितीत कुठल्याही बसेस अथवा रेल्वे सुरु करण्यात येणार नाहीत. त्यामुळे कामगार व नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये. तसेच घराबाहेर न पडता आहे त्या ठिकाणीच सुरक्षित राहावे. जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांची व व्यक्तींची प्रशासनाच्या वतीने माहिती घेऊन स्थलांतरणासाठी इच्छुकांची यादी तयार करण्यात येणार आहे. हे कामगार ज्या राज्यात जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्या राज्याशी राज्य शासनामार्फत संपर्क साधून त्यांना संबंधित राज्याची परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतरच स्थलांतरनाची कार्यवाही सुरु केली जाईल. कामगारांच्या सर्व तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 24 तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तक्रार असल्यास दुरध्वनी क्र.020-26111061 अथवा 020-26123371 अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तसेच dcegspune1@gmail.com व controlroompune@gmail.com या इमेलवर तक्रारी स्विकारल्या जातील. याशिवाय तालुका नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिली.

4 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

पुणे विभागातील 305 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 1 हजार 905 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Read Time3 Minute, 3 Second

विभागातील 18 हजार 59 नमून्यांची तपासणी पूर्ण 16 हजार 212 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह तर 1 हजार 905अहवाल पॉझिटिव्ह

पुणे दि. 30:-पुणे विभागातील 305कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 504 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात 1 हजार 905 बाधित रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 738 बाधीत रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 43 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 81 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 13 बाधीत रुग्ण आहेत.पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्ण 1 हजार 738 झाले आहेत. तर 268 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्हयात ॲक्टीव रुग्ण 1 हजार 383 असून कोरोनाबाधीत 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. आजपर्यत विभागामध्ये एकूण 19 हजार 23 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 18 हजार 59 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 964 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 16 हजार 212 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 1 हजार 905 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागातील 62 लाख 89 हजार 701 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 42 लाख 11 हजार 256 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 414 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

जुगाराच्या अड्ड्यावर धाड,61830 रुपयांचा मुद्देमाल जप्त!हिरापुर रोडवरील कैवल्य नगर भागातून 8 जण ताब्यात, गुन्हा दाखल

Read Time3 Minute, 55 Second

चाळीसगांव(प्रतिनिधी):- आज दि 30 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विजयकुमार ठाकूरवाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस अंमलदार भटु पाटील, भूषण पाटील, राहुल गुंजाळ, सतीश राजपूत, संजय पाटील या पथकाने सायंकाळी 16:25 वाजताचे सुमारास चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील हिरापुर रोडवरील कैवल्य नगर भागातील साहेबराव पंडित पाटील यांचे घराचे शेजारी छापा टाकला असता, तेथे 8 जण 52 पत्त्यांवर जुगाराचे खेळावर पैसे लावून पत्ता जुगाराचा खेळ खेळताना मिळून आले.
सदर ठिकाणी रक्कम रुपये 6830 ताब्यात घेण्यात आली आहे तसेच आरोपींचे अंगझडतीत मिळालेले 8 मोबाइल एकूण किंमत रुपये 55000 असा एकूण 61830 रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल गुन्ह्यात जमा करण्यात आला आहे.
सदर आरोपी जुगार खेळताना मिळून आले म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस अंमलदार भूषण मांगो पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा अन्वये तसेच कोरोना विषाणूचा अनुषंगाने जाहीर केलेल्या जमावबंदी व संचारबंदी आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे चाळीसगाव शहरातील जबाबदार नागरिक कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सज्ज असून, स्वयंस्फूर्तीने पुढील तीन दिवस जनता करफ्यु पाळणार असताना, शहरातील पत्तेप्रेमींचा या वागण्याने संचारबंदीला गालबोट लागत आहे।

आरोपींची नावे-

1) भीमा धोंडिबा गवळी,
वय- 45 वर्षे , राहणार – पिरनवाडी, हिरापुर रोड, चाळीसगाव.

2) अण्णा रामा गवळी
वय- 43 वर्षे , राहणार- आदर्श नगर, हिरापुर रोड, चाळीसगाव

3) आप्पा बाळा गवळी
वय- 54 वर्षे ,
राहणार- आदर्श नगर, हिरापुर रोड, चाळीसगाव

4) राजू ज्ञानप्पा गवळी.
वय- 45 वर्षे ,
राहणार- इच्यादेवी मंदिराजवळ, हिरापुर रोड, चाळीसगाव

5) संजय दाजीबा गवळी
वय- 37 वर्षे ,
राहणार- पिरनवाडी, हिरापुर रोड,चाळीसगाव

6) जितेंद्र हरी सूर्यवंशी
वय- 46 वर्षे , राहणार- पद्मावती नगर,हिरापुर रोड, चाळीसगाव

7) राजेश सुदाम गवळी
वय- 55 वर्षे , राहणार- पिरनवाडी, हिरापुर रोड, चाळीसगाव

8) विठ्ठल राणोजी गवळी
वय- 47 वर्षे , राहणार- पिरनवाडी, हिरापुर रोड, चाळीसगाव

चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या वतीने विनाकारण घरातून बाहेर न पडण्याचे व कोरोना विषाणूच्या अनुषंगाने शासनाने दिलेले आदेशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

सायबर सेल ची ऍक्टिव्ह कामगिरी सोशल मीडिया वर खोट्या अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल

Read Time1 Minute, 36 Second

लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर काही गुन्हेगार व समाजकंटकांकडून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न. या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्याविरुद्ध सायबर सेल गुन्हे दाखल केले ३३३ गुन्हे, १५२ जणांना अटक. नागपूर ग्रामीण व पुणे ग्रामीण मध्ये नवीन गुन्ह्यांची नोंद. आक्षेपार्ह व्हाट्सएप मेसेजेस फॉरवर्ड प्रकरणी १३८ गुन्हे, फेसबुक पोस्ट्स शेअर १२५,टिकटोक विडिओ शेअर १० व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट ६, इन्स्टाग्राम द्वारे चुकीच्या पोस्ट ४, तर अन्य सोशल मीडियाच्या गैरवापरा प्रकरणी ४९ गुन्हे दाखल. ६० आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात यश.गुन्ह्यांमध्ये बीड २९,पुणे २७, जळगाव २६,मुंबई २०, कोल्हापूर १६, सांगली १२, नाशिक १२, नाशिक शहर ११,जालना ११, सातारा १०, बुलढाणा १०,लातूर १०, नांदेड ९,पालघर ९, ठाणे शहर ८,परभणी ८, सिंधुदुर्ग ७, नवी मुंबई ७, अमरावती ७, ठाणे ७, हिंगोली ६, नागपूर शहर ६ या प्रमुख जिल्हे-शहरांचा समावेश.

4 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

लॉकडाऊन मुळे राज्यासह राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाकडून कार्यपद्धती निश्चित

Read Time4 Minute, 30 Second

मुंबई दि 29:-लॉकडाऊन मुळे राज्यासह राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाकडून कार्यपद्धती निश्चित. याबाबतीत सर्व यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक व जबाबदारीने अंमलबजावणी करावी यासाठी सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील, तर मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाणार. संपर्कासाीठी ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे दूरध्वनी क्रमांक, तर controlroom@maharashtra.gov.in हा ईमेल उपलब्ध- मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अभय यावलकर यांच्यावर जबाबदारी जिल्ह्यांचे नोडल अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील अडकलेल्या व्यक्तींची यादी तयार करून संबंधित इतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवतील. परराज्यातील लोकांची ये-जा करण्यासाठी दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते ठरवतील जिल्हाधिकारी किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालकांचे पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतराची परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तींना कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यांनाच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाणार व्यक्तींमध्ये काही लक्षणे आढळल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे वैद्यकीय उपचार करण्यात येतील. इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या पत्रात संबंधित व्यक्तीस कुठलेही लक्षण नाही हे स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांप्रमाणे वागणे व उपचार घेणे त्या व्यक्तीवर बंधनकारक. ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे आहे त्यांच्याकडे देखील अशाच पद्धतीने राज्यांची संमतीपत्रे असणे आवश्यक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ट्रान्झिट पास,त्यावर सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणे गरजेचे.यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधीही बंधनकारक.पाठपुराव्यासाठी ज्या स्थळी जे प्रवासी उतरणार आहेत तशी यादी त्या त्या राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येणार वाहतुकीला वापरण्यात येणारी वाहने जंतुनाशकांनी फवारलेली असावीत. वाहनात देखील सोशल डिस्टनसिंग पाळणे गरजेचे. इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल, याची दक्षता जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी घ्यावी राज्यात आलेल्या सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होणार. त्यानंतर संबंधित व्यक्तीस घरीच क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. त्यांना केंद्र शासनाचे आरोग्यसेतू ऍप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल. त्यामुळे त्यांच्याशी कायम संपर्क ठेवता येईल अशी माहिती मुख्यमंत्री मा:उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली.

3 0
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

स्वयंस्फूर्तीने चाळीसगाव 3 दिवस बंद मेडिकल ची गरज असल्यास खालील नंबर वर संपर्क साधा

Read Time2 Minute, 0 Second

चाळीसगांव(प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यात आजून तरी कोरोनाचा रुग्ण आढळला नाही पण मालेगाव,जळगाव,पाचोरा अश्या आजू बाजूच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे हा याचे परिणाम आपल्या तालुक्यात होऊ नये म्हणून सर्व प्रशासना मेहनत घेत आहे आपली रक्षा स्वतःच करता यावी या हेतूने चाळीसगावतील सर्व राजकीय मान्यवर,समाजसेवक,व्यापारी,पत्रकार व चाळीसगाव प्रेमींनी स्वयंस्फूर्तीने चाळीसगाव शहर 3 दिवस दिनांक 1 ते 3 तारखे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यात मेडिकल असोसिएशनचे मोठे योगदान राहणार आहे मेडिकल पण बंद राहणार पण

अत्यावश्यक असल्यास संपर्क साधावा.
योगेश भोकरे 7588614724
प्रेमसिंग पवार
9021991900
प्रदीप देशमुख
9823722730
विनोद जैन
9823523105
महेश येवले
9860665376
चाळीसगांव ता मेडी असो
C/O यशश्री एज
लक्ष्मी नगर ४० गाव

संपूर्ण चाळीसगांव तालुका मेडिकल असो.
सर्व संघटनेने व लोकप्रतिनिधी यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या निर्णयानुसार आज दि. 30/04/2020 रोजी मेडिकल हे सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत सुरू राहतील
तसेच
०१/०५/२०२० पासुन दि. ०३/०५/२०२० पर्यंत तीन दिवस मेडिकल सेवा बंद राहतील.अत्यावश्यक मध्ये सुरू असलेले हॉस्पिटल व त्यात येणारे मेडिकल हे त्या वेळेत सुरु राहतील.➖➖➖➖➖➖➖
आपण घरी रहा व सुरक्षित रहा

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंडमध्ये अवैधरीत्या दारू विकणाऱ्या तळीरामांवर धडक कारवाईला सुरवात.

Read Time1 Minute, 42 Second

दौंड दि 30 -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरावर उपाययोजना सुरू असताना व कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संचारबंदी घोषित केली असून .सर्व उद्योग व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले असून कोरोणावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व वाईन शॉप बंद करण्याचे दिले असता.तरीही काही तळीरामांचा अवैद्यरित्या दारू विकण्याचा सुळसुळाट मात्र थांबायला तयार नाही.दौंडमध्येही असाच अवैद्यरीत्या दारू विकत आहे अशी माहिती दौंड पोलिस प्रशासनाला मिळताच दौंड शहरातील विविध ठिकाणी धाड टाकण्याचे सत्र सुरू केले असून दौंड शहरात पोलिसांकडून दारू माफियांचे कंबरडे मोडायला सुरुवात झाली आहे.गोवा गल्ली ६००० रुपयांची दारू जागीच नष्ट करण्यात आली. व गजानन सोसायटी(आरोपी बालाजी कांबळे याला ताब्यात घेण्यात आले आहे) ११००४ रुपयांची दारू जप्त करण्यात आली ही कारवाई दौंड पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पो.हवा.थोरात,शेख,सुळ,पो.ना. देवकाते.शेख,काळे.यांनी केली.

9 1
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

कोरोना चा रुग्ण सापडताच पुढील नियोजन म्हणून दहिटने(दौंड) येथील काही भाग प्रतिबंधित

Read Time1 Minute, 35 Second

दौंड दि 29 -दौंड येथे कोरोनाचा रुग्ण आढळला असल्याने मोठी खळबळ उडाली असता यांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दहिटने येथील काही भाग प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आला असून हा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस वायरस चे संक्रमण त्याच अनुषंगाने काही भाग प्रतिबंधित व बफर म्हणून घोषित केले असून.कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याने.दहिटने,मिरवाडी, नांदूर,खामगाव,गणेशनगर,देवकरमळा,बैलखिळा,डुबेवाडी,हे मुख्यस्थान धरून ३ किलोमीटर चा परिसर प्रतिबंधित क्षेत्र व मगरवाडी, मेमानवाडी,पिलानवाडी,गाडामोडी,बोराटेवस्ती,व देवकरवाडी. परिसर मुख्यस्थानी धरून ५ किलोमीटर चा परिसर क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून अशी माहिती मा:प्रमोद गायकवाड(उपविभागीय दंडाधिकारी दौंड-पुरंदर) यांनी दिली.

दौंड प्रतिनिधी
कु:पवन साळवे

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंड मधे कोरोनाची धडक आता जास्त काळजी घेण्याची गरज

Read Time1 Minute, 18 Second

दौंड दि 29 -कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्व स्तरावर उपाययोजना व हालचाली सुरू असताना दौंड लगत इंदापूर, बारामती, या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळले परंतु अजूनही दौंडमध्ये एकही रुग्ण न आढळल्याने सुखद बातमी असताना आज दि-२९ रोजी मात्र दौंड येथील दहिटने या ठिकाणी कोरोनाचा पहिला रुग्ण वय अंदाजे 70 वर्ष आढळल्याने एकच खळबळ उडाली.दि-२६ रोजी इसमाला खोकला, आणि घश्यात त्रास जाणवत असल्याने राहू येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार घेत असताना त्या इसमाला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र आज दि-२९ रोजी त्या इसमाचा तपासणी वैद्यकीय अहवाहल पोजिटिव्ह आल्याची माहिती.वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक राजगे यांनी दिली.आता दौंडकरांनी काळजी घ्यावी व शक्य असल्यास घराबाहेर पडू नये .

दौंड प्रतिनिधी
कु:पवन साळवे

19 4
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %