Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

लॉकडाऊन मुळे राज्यासह राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाकडून कार्यपद्धती निश्चित

0
3 0
Read Time4 Minute, 30 Second

मुंबई दि 29:-लॉकडाऊन मुळे राज्यासह राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाकडून कार्यपद्धती निश्चित. याबाबतीत सर्व यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक व जबाबदारीने अंमलबजावणी करावी यासाठी सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील, तर मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाणार. संपर्कासाीठी ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे दूरध्वनी क्रमांक, तर controlroom@maharashtra.gov.in हा ईमेल उपलब्ध- मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अभय यावलकर यांच्यावर जबाबदारी जिल्ह्यांचे नोडल अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील अडकलेल्या व्यक्तींची यादी तयार करून संबंधित इतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवतील. परराज्यातील लोकांची ये-जा करण्यासाठी दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते ठरवतील जिल्हाधिकारी किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालकांचे पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतराची परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तींना कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यांनाच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाणार व्यक्तींमध्ये काही लक्षणे आढळल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे वैद्यकीय उपचार करण्यात येतील. इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या पत्रात संबंधित व्यक्तीस कुठलेही लक्षण नाही हे स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांप्रमाणे वागणे व उपचार घेणे त्या व्यक्तीवर बंधनकारक. ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे आहे त्यांच्याकडे देखील अशाच पद्धतीने राज्यांची संमतीपत्रे असणे आवश्यक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ट्रान्झिट पास,त्यावर सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणे गरजेचे.यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधीही बंधनकारक.पाठपुराव्यासाठी ज्या स्थळी जे प्रवासी उतरणार आहेत तशी यादी त्या त्या राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येणार वाहतुकीला वापरण्यात येणारी वाहने जंतुनाशकांनी फवारलेली असावीत. वाहनात देखील सोशल डिस्टनसिंग पाळणे गरजेचे. इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल, याची दक्षता जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी घ्यावी राज्यात आलेल्या सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होणार. त्यानंतर संबंधित व्यक्तीस घरीच क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. त्यांना केंद्र शासनाचे आरोग्यसेतू ऍप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल. त्यामुळे त्यांच्याशी कायम संपर्क ठेवता येईल अशी माहिती मुख्यमंत्री मा:उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: