{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील खडकी बु. येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन अशोक ठुबे (वय ३७) यांचे रात्री रेल्वे पुलावरून घरी जात असताना अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या होंडा ऍक्टिवा (एम एच १९ बी एस ८२४०) दुचाकीला चारचाकी वाहनाची जोरदार धडक लागल्याचे प्राथमिक पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक ३ मार्च रोजी रात्री रेल्वे पुलावरून घराकडे ऍक्टिवा या दुचाकीने घराकडे निघालेल्या ठूबे यांच्या वाहनाला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाल्याचे कळते,धडक देणारे संबंधित वाहन घेऊन वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून वाहन व वाहनचालक अद्याप अज्ञात आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सचिन ठुबे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे खडकी बु. व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई व एक मुलगी असा परिवार आहे.
अपघातास कारणीभूत वाहनचालकाचा व वाहनाचा शोध सुरू असून पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत.
