दौंड नगरपालिका येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Read Time1 Minute, 1 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

दौंड ग्रामीण प्रतिनिधी विजय जाधव

आज दौंड नगरपालिका येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 295 वि जयंती साजरी करण्यात आली,यावेळी कोरोनाच्या नियमाचे पालन करत जास्त गर्दी न करता मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली यावेळी श्री मंगेश शिंदे (मुख्यधिकारी)दौं न. पा
सौ शितल ताई कटारीया (नगराध्यक्षा) दौं.न.पा.
श्री.जिवराज (बापू)पवार.(नगरसेवक)दौं.न.पा.
सौ.पुजा गायकवाड (नगरसेविका) दौ.न.पा.
श्री.जिजाबा दिवेकर (अभियंता).
श्री.दत्ता क्षिरसागर.(पाणीपुरवठा विभाग)
श्री.राजू वाडीया.
श्री.संजय सावंत समीर शेख. आदी उपस्थित होते

6 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंडकरांनी आता पर्यंत सहकार्य केले पुढेही कराल-दौंड नगराध्यक्षा

Read Time2 Minute, 27 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे.

आपण सर्व जण कोरोना च्या महामारिला सामोरे जात असताना आपण दौंडकारांनी भरपूर सहकार्य केले आहेे.तसेच दौंडचे आमदार राहुल कुल, व प्रेमसुख कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली,
दौंड शहरातील व्यवसाय चालूं करण्यासाठी मा.नवल किशोर राम साहेब, कलेक्टर पुणे तसेच उपविभागीय अधिकारी (INCIDENT COMMANDER) , दौंड पुरंदर उपविभागीय कार्यालय, प्रमोद गायकवाड यांनी आदेश करावे ही विनंती २८मे २०२० रोजी केली होती ती आज दिनांक-३१मे २०२० प्रतिबंधात्मक क्षेत्र कमी करण्याचे आदेश, मा. प्रांत साहेब यांनी दिले आहेत. तसेच प्रभाग क्रमांक-४ व ५ मधील कुंभार गल्ली भाग,गोवा गल्ली भाग व तुकाई नगर रस्त्याचा भाग प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आला आहे अशी माहिती दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी मा. प्रमोद गायकवाड यांनी दिली.
याच अनुषंगाने मा.नवल किशोर राम, कलेक्टर पुणे,प्रांत,तहसीलदार,दौंड मुख्याधिकारी,दौंड पोलीस वर्ग, उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी वर्ग, सर्व हॉस्पिटल वर्ग व सर्व प्रशासकीय अधिकारी वर्ग यांनी केलेल्या सहकार्य बद्दल नगराध्यक्षा-सौ.शितल योगेश कटारिया यांनी आभार मानले.
तसेच, व्यापारी वर्गला व व्यवसाय धारकांना विनंती केली की,शासाने दिलेल्या आदेश नुसार व दिलेल्या वेळात व नियमाध्ये आपण योग्य ती काळजी घेऊन व्यवसाय चालू करून आपण प्रशासनाला सहकार्य करावे.

नागरिक हित संरक्षण मंडळ, रासप,रिपाई आघाडी,दौंड.पतित पावन संघटना,दौंड दौंड मर्चंट असोसिएशन, दौंड व्यापारी महासंघ.

8 1
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंड:कुरकुंभ MIDC मध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण.

Read Time1 Minute, 38 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे.

दौंड तालुक्याची ही डोकेदुखी वाढली.
दौंड येथील कुरकुंभ औद्योगिक वसाहती मध्ये कोरोणाचा रुग्ण आढळल्याने दौंडकरांच्या चिंतेत भर पडली आहे.कुरकुंभ औद्योगिक वसाहती मध्ये दिनांक-२५/०५/२०२० रोजी अंबरनाथ वरून एक 30 वर्षीय कामगार कंपनीत आला असता.त्याचे डोके दुखत असल्याने त्याचा BP वाढला व कंपनीने त्याला त्याच ठिकाणी(कंपनीमध्ये)आयसुलेट केले व खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले व खात्री करून घेण्यासाठी कोव्हीड-१९ ची टेस्ट करण्यासाठी काल दिनांक-२९/०५/२०२० रोजी पुणे येथील खाजगी लॅब मध्ये घशातील द्रव तपासणीसाठी नेले असता आज दिनांक-३०/०५/२०२० रोजी कोरोना तपासणी अहवाल पोजिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक राजगे यांनी दिली, आता दौंड तालुक्यातील रुग्णांची संख्या ११ वर पोहचली आहे.

रुग्ण कोनाच्याही संपर्कात आला नाही व कुरकुंभ मधील रहिवाशांना घाबरण्याची गरज नाही असेही सांगण्यात आले.

घरात रहा सुरक्षित रहा.

22 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे covid-19 समाजरक्षक सन्मान 2020 पुरस्कार

Read Time1 Minute, 34 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

दौंड ग्रामीण विजय जाधव

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे covid-19 समाजरक्षक सन्मान 2020 पुरस्कार सौ. सोनाली कांतीलाल तरटे (आशा स्वयंसेविका दौंड पुणे विभाग), श्रीमती.आचल हरी पवार (आशा स्वयंसेविका दौंड पुणे विभाग), श्रीमती.आशा नारायण भागवत (आशा स्वयंसेविका दौंड पुणे विभाग),श्रीमती.पपीता चंद्रकांत डोंगरे (आशा स्वयंसेविका दौंड पुणे विभाग),श्रीमती.आशा रामचंद्र देशमुख (आशा
स्वयंसेविका दौंड पुणे विभाग) तसेच श्री.विठ्ठल आनंदा होले (तंटामुक्त अध्यक्ष गोपळवाडी पत्रकार दौंड,पुणे विभाग),
श्री रतन राजाराम डोळे (पत्रकार, सोलापूर विभाग) कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लोकांच्या घरोघरी जाऊन या आजारा संदर्भात माहिती व मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आत्मबल व आत्मविश्वास वाढवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष श्री.सदाशिव रणदिवे सर यांनी दि.३०/०५/२०२० रोजी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

रुग्णाची कोरोना शी झुंज अपयशी,दौंड मधे दुसरा मृत्यू

Read Time1 Minute, 0 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड शहरातील नेहरू चौकातील ९० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती दिनांक-२५/०५/२०२० रोजी पुणे येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता.व दिनांक-२६/०५/२०२० रोजी तपासणी अहवाल पोजिटिव्ह आला व दिनांक-२९/०५/२०२० रोजी पुणे येथे उपचार घेत असताना त्या ९० वर्षीय महिलेचा कोरोनाशी झुंज देत असता मात्र त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दौंड उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.

कोरोनाने दौंडमध्ये दुसरा बळी

अजून काळजी घेण्याची गरज घरात रहा सुरक्षित रहा.

17 1
Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

अवैधरीत्या वाळू वाहतुक,दौंड पोलिसांची कारवाई,चालक मालक वर गुन्हा दाखल

Read Time1 Minute, 27 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे.

दौंड:दौंड येथे काल दिनांक-२९/०५/२०२० रोजी अवैधरीत्या वाळू वाहतुक व शासनाची कोणतीही परवानगी नसताना वाळू वाहतूक करत असल्याने व कोव्हीड-१९ संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये व शासनाच्या आदेशाचा भंग केल्याने कारवाई करण्यात आली आहे.भारत बेंज डंपर.पोलिस उपनिरीक्षक उपविभागीय कार्यालय दौंड.श्री.नितीन मोहिते,पो.हवा.सुळ,पो.हवा.थोरात,दौंड पोलिस स्टेशन पथकाने पकडला असून डंपर चालक रस्त्यामध्ये डंपर सोडून फरार झाला असल्याने अज्ञात चालक मालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डंपर नं-एम.एच.१६ सी.सी.२२८२व २७.२००रुपये किमतीची साडे तीन ब्रास वाळूची वाहतूक करताना मिळून आली फिर्याद पो.ना.डोईफोडे यांनी दिली आहे.व भारतीय दंड विधान कायदा कलम ३७९,१८८,२६९,३४ नुसार कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पो.ना.भरत जाधव यांनी दिली.

6 1
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

शिक्षकांसाठी ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड’

Read Time7 Minute, 3 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

राष्ट्रीयस्तर नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन.सर्व शिक्षकांना अभिनव संधी
सर फाउंडेशन जळगाव जिल्हा समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांचे सहभागाचे आवाहन.

दि ३० : स्टेट इनोव्हेशन अँण्ड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र (सर फाउंडेशन) तर्फे शिक्षकांसाठी ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड’ या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर फाऊंडेशन गेल्या चौदा वर्षापासून ‘इनोव्हेशन’ या विषयावर कार्य करीत आहे. आय. आय. एम. अहमदाबाद व महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग यांच्यासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत या संस्थेने हे कार्य सुरू केले आहे. अशी माहिती सर फाउंडेशन चे जळगाव जिल्हा समन्वयक राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की,
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी सर्व पातळीवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येक विद्यार्थी प्रगत होण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करीत आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने सर फाउंडेशन यांचे मार्फत ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड २०२०’ या नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर नवोपक्रमाची निवड केली जाणार आहे.
राज्यातील पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, पर्यवेक्षीय अधिकारी, शिक्षण क्षेत्रात मुक्त काम करणाऱ्या व्यक्ति यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. असे फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री किशोर पाटील कुंझरकर यांनी स्पष्ट केले.
पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे व त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील हेतु असल्याचे त्यांनी म्हटले.सर फाउंडेशन चे राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ सिद्धार्थ माशाळे हेमलता शिंदे राज किरण चव्हाण,अनघा जहागीरदार आदीजण सातत्याने परिश्रम घेत आहे.

चौकट घेणे

“नवोपक्रम अहवाल लेखनात नवोपक्रमाचे शीर्षक, नवोपक्रमाची गरज व महत्त्व, नियोजन, प्रत्यक्ष कार्यवाही, निष्कर्ष / फायदे, परिशिष्टे, नवोपक्रमाची सद्यस्थिती या मुद्द्यांचा समावेश असावा. शब्द मर्यादा १००० शब्द असून जास्तीत जास्त तीन फोटोचा वापर करावा. अहवाल १० एमबी पर्यंत पीडीएफ स्वरूपात तयार करून http://www.sirfoundation.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पाठवायचा आहे.त्यासंदर्भात कोणाला काही अडचण असेल तर 70 3080 71 90 या क्रमांकावर संपर्क साधावा”
किशोर पाटील कुंझरकर
*जिल्हा समन्वयक
सर फाउंडेशन जळगाव

क्षितीज निवास चिमुकले दत्त मंदिराजवळ आदर्श नगर एरंडोल तालुका एरंडोल जिल्हा जळगाव.


शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत तयार करावा. इतर राज्यातील शिक्षक देखील यात सहभागी होऊ शकतात. नवोपक्रम हा शिक्षकांनी स्वत: राबविलेला असावा. नवोपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२० आहे.
राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे, राजकिरण चव्हाण, सतीश सातपुते, संदीप गुंड, नवनाथ शिंदे, मधुकर घायदार व अनघा जहागिरदार , किशोर पाटील कुंझरकर , योगेश ढवारे,सुनीता पाटील,निलेश प्रभाकर शेळके छाया आरसुळे राजकिरण चव्हाण नम्रता शिंदे पद्मा तायडे सुनील मोरे ज्योती चिकणे मनीषा शेजोळे, खंडू मोरे ,विनीत पद्मवर,देवेंद्र बोरसे मनोज कारभारी सुनंदा भावसार ,अजयलिंबाजी पाटील ,पद्मातायडे अरुणा उदावंत आदी सह राज्यातील सर फाउंडेशन च्या सर्व जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंड शहरावर अजून एक संकटाची भर,पुन्हा सापडला रुग्ण

Read Time1 Minute, 40 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड शहरावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वस्वी उपाययोजना करूनही मात्र पुन्हा एकदा दौंड शहरात कोरोनाचा रुग्ण आढळला. काही दिवसांपूर्वी दौंड शहरात एका कोरोनाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली होती व सर्वच ठिकाणी आरोग्य यंत्रणा जोराने काम करत आहे,नुसते आरोग्य यंत्रणा व पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी उपाययोजना करून काही होणार नाही तर आपण स्वतः सोशल डिस्टनसिंग चे व नियमांचे पालन करावे जेणे जर सर्व यंत्रणांचा ताण कमी होईल काल दिनांक-२८/०५/२०२० रोजी दौंड शहरातील २३ नागरिकांचे घशातील द्रव पुणे येथे चाचणीसाठी घेऊन गेले असता आज दिनांक-२९/०५/२०२० रोजी मात्र २३ मधील २२ नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले व आज गोवागल्ली येथील ३२ वर्षीय इसमास कोरोणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.दौंड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ६ वर जाऊन पोहचली.अशी माहिती उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.

19 0
Happy
Happy
33 %
Sad
Sad
33 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
33 %
Surprise
Surprise
0 %

इंदापूर तालुक्याच्या रिक्षा संघटनांच्या पदाधिकरी यांची बैठक,लवकरच रिक्षा धावणार?

Read Time2 Minute, 16 Second

अधिकार आमचा न्यूज पोर्टल

दौंड प्रतिनिधी पवन साळवे

“दौंड रिक्षा महासंघ” गुरूवार दि.28/5/20 रोजी सकाळी 11.30 बारामती उप- प्रादेशिक परीवहन (R.T.O).विभाग या ठिकाणी मा.श्री.प्रशांत (नाना) सातव यांच्या वतीने दौंड, बारामती ,इंदापूर तालुक्याच्या रिक्षा संघटनांच्या पदाधिकरी यांची बैठक प्रादेशिक परिवहन अधिकारी मा.धायगुडे साहेब,मा.साखरे साहेब,मा.मुळे साहेब ,मा शिंदे साहेब,
बारामती येथील मा.श्री प्रशांत (नाना)सातव तसेच आपल्या दौंड रिक्षा महासंघाचे संस्थापक मा.प्रा.डॉ.भिमराव मोरे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली .यावेळी रिक्षा चालकांनी घ्यावयाची काळजी आणि नियम सर्वांना समजावून सांगितले आणि त्या संदर्भाचं पत्रक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रकाशित केले आहे त्या पञकाच्या प्रती श्री नाना सातव मित्र परिवार यांच्या वतीने रिक्षा चालकांसाठी देण्यात आले व प्रशासन आपणास मदत व सहकार्य तसेच रिक्षा चालकांना रिक्ष व्यवसाय सूरू करण्याबाबत लवकरच आनंदाची बातमी
देणार असल्याचे सांगितले.
तसेच या बैठकीस दौंडमधून दौंड रिक्षा महासंघाचे संस्थापक मा.प्रा.डॉ.भिमराव मोरे सर ,यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडमधून बाबासाहेब कोरी ,गौतम गायकवाड ,हिरा अयवळे तसेच उत्तम लोंढे उपस्थित होते. शेवटी मोरे सरांच्या वतीने रिक्षा चालकांच्या हिताचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले व ते लवकरच सोडवण्याचे आश्वासन परिवहन अधिकऱ्यांनी दिले.

6 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

ग्रामीण पाठोपाठ दौंड शहरातही हातभट्टी दारू निर्माण व विक्री करणाऱ्यावर धडक कारवाईला वेग.

Read Time1 Minute, 30 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करून कोरोनावर नियंत्रण करत आहेत परंतु देशातल्या जनतेची काळजी नसऱ्यांनी मात्र अवैधरित्या हातभट्टी दारु विक्री करण्याचा धुमाकूळ घातला आहे अश्या लोकांवर कडक कारवाईचे आदेश डी वाय एस पी ऐश्वर्या शर्मा यांनी दिले व पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गोवा गल्ली येथे अवैधरीत्या दारू तयार केली जात होती अशी माहिती मिळताच तेथे धाड टाकून जागीच हातभट्टी नष्ट करण्यात आली आहे.ए एस आय माने, पो हवा हिरवे,पो सय्यद, पो ना दाभाडे, बापू रोटे, पो कॉ काळे, शेख, गायकवाड, करे, देवकाते अमोल, चालक सस्ते, थोरात, शेख, देशमुख यांच्या सहकार्याने ही कारवाई केली असून अश्या अनेक अवैधरित्या धंदे चालवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.

6 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %