जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यास परवानगी-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Read Time2 Minute, 8 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगाव, दि. 27 (वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दिनांक 23 ऑक्टोबर, 2020 च्या परिपत्रकानुसार यापूर्वी नमूद तरतुदी शिथिल करण्यात आला आहेत. या परिपत्रकाच्या अधिन राहून दिनांक 25 ऑक्टोबर, 2020 पासून जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित ( Containment Zone) क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले क्षेत्र वगळून व भविष्यात वेळोवेळी प्रतिबंधित ( Containment Zone) क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणारे क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रात व्यायामशाळा ( Gymnasiums) सुरु करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. असे आदेश अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अधक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPs) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश यापुढेही लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही श्री. राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

पहिले गुटखा आता गांजा,अवैध धंदे बंदी कडे पोलीस प्रशासनाचे वाढते पाऊल….

Read Time2 Minute, 21 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 26 चाळीसगाव शहर पो स्टेशन हद्दीतील गोपाळपूरा भागात चोरटी गांजाची विक्री करणारा व गांजा बाळगणारा आरोपी नामे मांगीलाल मुरलीधर गुजर वय 52 वर्षे, राहणार- गोपालपुरा, चाळीसगाव हा गांजा विकत असल्याची चाळीसगाव शहर पोलिसांना माहिती प्राप्त झालेवरून मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन गोरे सो यांचे आदेशाने व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव विभाग श्री कैलास गावडे यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांनी सहायक पोलिस निरीक्षक श्री मयूर भामरे, पोहेका गणेश पाटील, पोना भगवान उमाळे, पंकज पाटील, सुभाष घोडेस्वार, संदीप पाटील, पोशीसह दीपक पाटील, निलेश पाटील, विनोद खैरनार, विजय पाटील, संदीप पाटील व मपोशी सबा शेख यांचे घरी तसेच मा परी. तहसीलदार श्री सागर ढवळे सो व दोन पंच यांचे उपस्थितीत सदर आरोपीच्या घरी आज रोजी संध्याकाळी 6.00 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता, आरोपीच्या राहत्या घरात रक्कम रुपये 6840 रुपयांचा 1 किलो 368 ग्रॅम गांजा व रोख रक्कम रुपये 21300 असा एकूण 28140 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीविरुद्ध पोशी दीपक पाटील यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला NDPS कायद्यानुसार गुन्हा क्र 292/2020 एन डी पी एस कायदा 1985 चे कलम 8 क सह 20 बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

गुटखा किंग अटकेत,तपास सुरू आजून किंग आहेत का ? खेळ सुरू झाला की खेळ संपला?

Read Time2 Minute, 35 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगाव दि 22-आमदार मंगेश चव्हाण यांनी अवैध धंदे तालुक्यातुन हद्द पार करण्याचा निर्णय घेतला असून सद्या चाळीसगाव शहरात आमदार साहेबांच्या कार्य कडे सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे,16 तारखेला रात्री झालेल्या कारवाईत पन्नास ते साठ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला होता या कारवाईचा पुढील भाग म्हणून मुख्य सुत्रदार शोधण्याचे पोलीस प्रशासनासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले होते हे आव्हान पेलत पोलीस प्रशासनाने साखळी ची एक महत्वाची कडी हाती लागली ती कडी म्हणजे आरोपी गुटखा किंग देवरे ही होती या कारवाईत चाळीसगाव तालुक्यातून देवरे नामक गुटखा किंग यास अटक करण्यात आली पण ही नुसती कडी आहे की पूर्ण साखळी ये तपासाअंती समोर येणारच मात्र तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा आहे की या या गुटख्याच्या तलावातील देवरे हा इतका मोठा मासा आहे की एका वेळेस 50 ते 60 लाखाचा माल आणू शकतो? की आजून काही मोठे मासे या गुटख्याच्या तलावात आहेत? पोलीस प्रशासन नक्कीच आपल्या समोर असणारे गुटखा माफियांचे आव्हान सक्षम पने पेलणार पण पुढील तपासात काय समोर येते की खेळ इथेच संपणार की इथून सुरू होणार, आरोपी देवरे यास अटक झाल्यानंतर आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे 2 दिवसात काय समोर येणार या कडे तालुक्याचे लक्ष लागून आहे पुढील तपास उपविभागीय अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन करीत आहेत तपासात कोणती नावे समोर येतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

रिपब्लिकन श्रमिक संघटने तर्फे दौंड नगराध्यक्ष यांना कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचे निवेदन दिले..

Read Time2 Minute, 49 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी दि 21)-रिपब्लिकन श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य,नगरपालिका/ नगरपंचायत कामगार संघटना दौंड, शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे, सचिव विशाल ओव्हळ व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल पाळेकर तसेच सर्वच सफाई कामगारवर्ग , दौंड नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांच्यामार्फत दौंड नगरपालिकेमध्ये कामगारांच्या विविध समस्यांबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी
सौ.निर्मला राशीनकर आणि नगराध्यक्षा सौ.शितल कटारिया यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. दीपावलीला सुरुवात होत आहे त्यामुळे दरवर्षी दिवाळीला सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या घराविषयी देखील चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी यांनी शासनाने सांगितल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाची उंची वाढवली पाहिजे त्याप्रमाणे पुढील काळात सफाई कामगारांच्या हक्काच्या घरासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल व कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी तसेच त्याच्या आरोग्याविषयी मांडलेल्या प्रश्नांबाबत लवकरात लवकर आणि चांगल्यात चांगली ज्याचा कुटुंबाला देखील फायदा होईल अशी कौटुंबिक मेडिकल पॉलिसी काढण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. लवकरात लवकर यावर चर्चा करून हा प्रश्नदेखील मार्गी लावू असे सांगितले. तसेच अशा विविध चर्चांसाठी सफाई कामगारांनी वेळ मागितला असता, नगरपालिकेचा कर्मचारी-अधिकारी स्वतंत्रपणे येऊन आपली समस्या आणि मत मांडू शकतो त्यासाठी कोणत्याही अर्जाची किंवा वेळ मागायची गरज नाही. त्यामुळे माझ्याकडे कोणीही अर्ज करून वेळ मागू नये असे या चर्चेच्या वेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले.
यानंतर सदरच्या विषयांबाबत मुख्यधिकारी यांना व नगराध्यक्ष यांना कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचे निवेदन दिले.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

परतीच्या पावसाने हवालदिल शेतकरी,परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी सह्याद्री प्रतिष्ठान ची मागणी

Read Time1 Minute, 55 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव(प्रतिनिधी) -सध्या परिस्थितीमध्ये पाहता कोरोना आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे ,संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला आहे कुठल्याही प्रकारचा आधार शेतकरी राजाला राहिला नसून ह्या प्रचंड झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे अशा परिस्थितीमध्ये जगाचा पोशिंदा शेतकरी राजा उभा राहावा व त्याला हातभार मिळावा म्हणून शासनाने त्यांचे सरसकट पंचनामे करून सरसकट मदत द्यावी तसेच कर्ज माफी द्यावी या मागणीचे निवेदन आज दि 20 ऑक्टोबर 2020 मंगळवार रोजी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने चाळीसगाव चे तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे मा अध्यक्ष दिलीप घोरपडे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम चव्हाण, जळगाव जिल्हा प्रशासक गजानन मोरे ,जिल्हा उपाध्यक्ष दीपक राजपूत, तालुका कार्याध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी, रवींद्र दुशिंग जिल्हा उपाध्यक्ष विवेक रणदिवे ,तालुका अध्यक्ष विनोद शिंपी, मुन्ना पगार आदी उपस्थित होते

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

सोडावॉटर च्या नावाखाली अवैध दारू विक्रीचा खेळ होता सुरू,शहर पोलिसांच्या कारवाई मुळे खेळ झाला बंद…

Read Time2 Minute, 8 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव(प्रतिनिधी)-आज दि 15 ऑक्टोबर 2020 गुरुवार रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी घाटावरील सोडा वॉटरच्या नावाखाली सुरू असलेला अवैध दारू विक्रीचा अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव,पोलीस शिपाई विनोद खैरनार व विजय पाटील या पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये दारूविक्री करणारा आरोपी नामे गजानन भिकन अहिरे वय- 35 वर्षे, राहणार- डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, चाळीसगाव हा त्याचे ताब्यात देशी टंगो संत्रा दारूच्या 22 बाटल्या व मॅकडोवेल नंबर वन व्हिस्की व एमपेरिअल ब्लू व्हिस्कीच्या 30 बाटल्या चोरट्या विक्रीसाठी बाळगून असल्याचे मिळून आल्याने रक्कम रुपये 4769/- ची देशी व विदेशी दारूच्या एकूण 52 बाटल्यांसह आरोपीला ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पो स्टे ला आणून आरोपिविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,शहरातील सोडा वॉटरच्या नावाखाली अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई करणार असल्याचे पोनि विजयकुमार ठाकूरवाड यांनी यावेळी सांगितले आहे.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

वाळू माफियांचे धाबे दणाणले,चाळीसगाव हद्दीत कारवाई सुरू

Read Time1 Minute, 38 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव शहर पो स्टे हद्दीत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पो नि मा विजयकुमार ठाकूरवाड व मा. तहसीलदार श्री अमोल मोरे सो, चाळीसगाव यांचे पथकाने आज दि 15 ऑक्टोबर 2020 गुरुवार रोजी चाळीसगाव धुळे रोडवरील अवैधरित्या बेकायदा वाळू या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर आज रोजी कारवाई केली असून, अंदाजे 35000/- रुपये किमतीची 7 ब्रास वाळू व अंदाजे 15,00,000/- रुपये किमतीचा एक ट्रक ताब्यात घेण्यात आला असून,
सदरबाबत ट्रक चालक व मालक यांचे विरोधात चाळीसगाव शहर तलाठी श्री. विनोद कृष्णराव मेन यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 276/2020 भादवी कलम 379, 109, 34 अन्वये गुन्हा नोंद करून, सदर गुन्ह्यात आरोपी चालक नामे रामचंद्र उर्फ सुनील मारुती डांगे, राहणार- निमगाव, तालुका- मालेगाव, जिल्हा- जळगाव यास आज रोजी अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मयुर भामरे करीत आहेत.

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

पावसासोबत कोरोनाही परतीच्या मार्गावर आज दौंड मध्ये फक्त चार रुग्ण पॉझिटिव्ह

Read Time46 Second


दौंड(प्रतिनिधी) दिं. 12/10/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 64 रूग्णांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यांचे अहवाल अर्ध्या तासात प्राप्त झाले
त्यपैकी एकूण 4 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
तिन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे.दौंड शहर=03 व ग्रामीण=01असे एकूण चार रूग्ण आहेत. 28 ते 55 वर्ष वयोगटातील आहेत. अशी माहीती डॉ.संग्राम डांगे
(वैद्यकीयअधीक्षक उपजिल्हा रुग्णाल दौंड)यांनी दिली।

1 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

आई डी बी आई बँक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी लागणारी बँक खाती उघडून दिली

Read Time2 Minute, 7 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 10 ऑक्टोबर 2020 शनिवार रोजी आई डी बी आई बँक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी लागणारे बँक खाते उघडून दिले,सद्या शिष्यवृत्ती साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी पालकांची कागदपत्रांची जमाव जमाव सुरू आहे त्यात काही बँकांच्या कर्मचारी वर्गाच्या आढमूठ पणा मुळे पालकांना व विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे,चाळीसगांवत काही बँकांच्या मनमानी धोरणामुळे शिष्यवृत्ती चे खाते उघडून दिले जात नाही पालकांनी जाब विचारल्यास उडवा उडावीची उत्तरे दिली जातात यात आई डी बी आई बँक कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते फिरोज कादरी शेख,सलमान खान अय्युब खान,आरिफ कुरेशी खालिक,कादिर खान सलीम खान,फखरोद्दीनशेख अलीमोद्दीन,गुलामे मुस्तफा बागी साहब यांनी मिळून 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी लागणारी खाती मदिना मस्जिद शेजारी कॅम्प लावून उघडून दिली असून विध्यार्थी व पालकांची होणारी वणवण थांबविण्याचा प्रयत्न केला आहे तरी इतर बँकांनी सुद्धा विध्यार्थी व पालकांना सहकार्य करावे अशी अपेक्षा पालक करीत आहेत व आई डी बी आई बँकेच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पालकांनी कौतुक केले आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

कैवल्य नगरमधील अवैध दारूविक्रीचा खेळ खल्लास….

Read Time1 Minute, 48 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव(प्रतिनिधी)-आज दि 09 ऑक्टोबर 2020 शुक्रवार रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कैवल्य नगरमधील अवैध दारू विक्रीचा अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस नाईक भटू पाटील, पोलीस शिपाई भूषण पाटील, विनोद खैरनार व विजय पाटील या पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, अवैध दारू विक्रीचा खेळ खल्लास केला आहे, दारूविक्री करणारा आरोपी नामे अनिल बापू वय- 34 वर्षे, राहणार- मोची गल्ली, चाळीसगाव हा त्याचे ताब्यात देशी टंगो संत्रा दारूच्या बाटल्या चोरट्या विक्रीसाठी बाळगून असल्याचे मिळून आल्याने रक्कम रुपये 2704/- ची देशी दारूच्या 52 टंगो पंच ब्रँडच्या बाटल्यांसह आरोपीला ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पो स्टे ला आणून आरोपिविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक भटू पाटील हे करीत आहेत.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %