Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

Month: June 2022

राज्यातील खरीप हंगाम, पाऊस-पाणी आणि पीकविमा याबाबतचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क मुंबई-मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत काही वेळ होत नाही तो पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्री मंडळाची बैठक घेण्यात आली असून महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कार्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक झाली. […]

आगामी निवडणुका व पक्ष बांधणी अश्या विविध विषयांवर रिपाइं आठवले पक्षाची महत्वपूर्ण बैठक शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित संपन्न

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि.३० जून २०२२ रोजी रिपाइंआठवले पक्षाची चाळीसगांव तालुका व शहरातील महत्वाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक नवजीवन सिंधी हॉल मध्ये घेण्यात आली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद तसेच पक्ष वाढीवन्यासाठी सभासदांची मोठ्या प्रमाणात वाढ करून पक्ष बळकट करण्याचा संकल्प करण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, रिपाइं […]

शोध 1 मोटार सायकलीचा सापडल्या 4,चार दिवसात आरोपीसह मोटार सायकली ताब्यात,शहर पोलिसांची कामगिरी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव(प्रतिनिधी)-26 जून रोजी होंडा शाईन चोरी 30 जून आरोपिसहित मोटार सायकल पोलिसांच्या ताब्यात अवघ्या 4 दिवसात चोराचा तपास शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी.26 जून रोजी सागर प्रवीण केले यांनी 25000 किमतीची काळ्या रंगाची होंडा कंपनी ची सीबी शाईन मोटार सायकल क्रमांक एम एच 19 बी एक्स 1203 देशमुखवाडा जुने […]

प्रधानमंत्री जनकल्याण जत्रेचे आयोजन,75 योजनांचे 75 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न-खासदार उन्मेष पाटील

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव आपण साजरा करतो आहोत. अनेक योजना या लोकप्रिय झाल्या मात्र अनेक योजना या लाभार्थ्यांचे जनकल्याण आत्मनिर्भर होण्यासाठी पुरक असताना त्या योजनेबद्दल गैरसमज आहे. योजना न समजता पाठपुरावा केला तर पदरी निराशा येते. त्यामूळे योजनेचा उद्देश सफल होत नाही.त्यामुळे लाभार्थी वंचित राहतात. ही बाब आमदार […]

153 रक्तदात्यांनी केले रक्तदान, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांचे कार्य उल्लेखनीय, गावात तंटे मिटविण्यात यश पोलीस निरीक्षक विनोद घुगे

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-गोपाळवाडी येथे झालेल्या रक्तदान शिबीरात तीन महिलांसह 153 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे,ग्रामपंचायत सदस्य रोहन गारुडी या तरुणाच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला,रक्तदान शिबिराचे उद्घाटन दौंड चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते झाले, यावेळी पो नि विनोद घुगे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले, पुढे बोलताना […]

भडगाव कट्टर शिवसैनिकांचे रक्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थनाचे पत्र….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक भडगाव(प्रतिनिधी)- दि 24 महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठे वादळ उठलेले आहे,शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून त्यांच्या सोबत शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार बंडात सामील असल्याचे सांगितले जात आहे,या बंडात सामील झालेल्या आमदारांमध्ये भडगाव पाचोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे सुद्धा सामील आहे. याचाच परिणाम म्हणून […]

गुडशेपर्ड हायस्कुल चाळीसगाव येथे हसत खेळत आंतरराष्ट्रीय योगादिवस साजरा

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिकचाळीसगाव(प्रतिनिधी)-आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.आज देशभरात योग दिन साजरा […]

तालुका विधी समिती व तालुका वकील संघातर्फे चाळीसगांव येथे योगादिवस साजरा..

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि तालुका वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने ‘जागतिक योग दिवस’ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन संपन्नमाननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे दि. २१ जून २०२२ रोजी ‘जागतिक योग दिवस’ निमित्त तालुका विधी सेवा समिती […]

टी एच आर(सुगडी) प्रकरणी अंगणवाडीत मोठा गोंधळ असण्याची शक्यता,बालगोपाळांच्या खाऊ वर पुरावठेदाराचा डल्ला?

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात टी एच आर प्रकरणी अधिकार आमचा च्या टीम ने केले स्टिंग ऑपरेशन हिरापूर रोड वरील 145 नंबरच्या अंगणवाडी मध्ये रेशनची टेक होम रेशनची (टी.एच.आर/सुगडी) पाकिटे वाटपात गोंधळ आढळून आले असून यामुळे बालगोपाळांच्या खाऊ वर पुरावठेदाराचा डल्ला तर मारत नाही ना असा संशय निर्माण होतो.तीन वर्षांखालील वयोगटासाठी टेक […]

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसह अन्य सोयी सुविधामध्ये वाढ करा अनुसूचित जाती कल्याण समितीकडे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव पुणे(प्रतिनिधी)-विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसह अन्य सोयी सुविधामध्ये वाढ करा अनुसूचित जाती कल्याण समितीकडे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची मागणी,गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य यांची माहिती,याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की ,शासकीय विश्रामगृह पुणे येथे अनुसूचित जाती कल्याण समितीचे […]

Back To Top
error: Content is protected !!