गुन्हे शाखा युनिट 2 ची आणखीन 1 कारवाई….

Read Time1 Minute, 44 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

चिंचवड(प्रतिनिधी) दिनांक 06/11/2020 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 ची टीम सह PSI निलपत्रेवार , पोहवा स्वामी,पोहवा वेताळ, पोहवा माने, पोना जयवंत राऊत, नामदेव उर्फ देवा राऊत, अजित सानप असे हद्दीत पेट्रोलींग करत आसताना जयवंत राऊत यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की एक इसम घातक आग्नीशस्त्र घेवुन बिजलीनगर येथे येणार आहे आशी माहीती मिळाल्याने सदरची माहिती मिळाल्याने शैलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनखाली सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार व स्टफ यांनी सापळा रचुन बातमीतील इसमास ताब्यात घेतले त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव १) तुषार उर्फ दादया रविद्र खांगटे वय 32 वर्षे धंदा मजुरी रा बिजलीनगर चिंचवड असे सांगीतले त्याची अंगझडती घेतली आसता त्यांचे कमरेला गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस मिळुन आले ते दोन पंचा समक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध आर्म अॅक्ट 3 [ 25] प्रमाणे चिंचवड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास चालू आहे

2 0
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नतीच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्री गटाची स्थापना-कास्ट्राईब कर्मचारीकल्याण महासंघाच्या लढ्याला यश

Read Time2 Minute, 40 Second

दौंड(प्रतिनिधी)-कास्ट्राईब कर्मचारीकल्याण महासंघाने पदोन्नतीचे आरक्षण हा आमुचा संविधानिक अधिकार आहे आणि तो आम्हांला मिळालाच पाहिजे या मागाणीसाठी महाराष्ट्र विधानसभेतील सर्व मंत्राना भेटून निवेदने दिली त्याच बरोबर जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसाचे आंदोलन केले दि.30/10/2020 ते 3/11/2020 नागपूर ते मुबंई लॉंगमार्च काढण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.त्याची पूर्व कल्पना दिली होतीच. मा. छगन भुजबळ यांची मा. अरुण गाडे यांनी नाशिक येते भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी मंत्री मंडळात चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मंत्री गटाची स्थापना करण्यात यावी असा प्रस्ताव शासनाकडे कास्ट्राईबच्या वतिने मांडला होता. अखेर महाराष्ट्र शासनाने मंत्री गटाची स्थापना केली आहे.
पदोन्नतीच्या आरक्षणाचा संघर्ष अजुन संपलेला नाही.परंतु आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनावर दबाव आणून आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यात कास्ट्राईब यशस्वी झाली आहे.
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संघटनेच्या बैठकीत पदोन्नतीच्या आरक्षणाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने मांडला होता. त्यावेळी मा.मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
पदोन्नतीचे आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी प्रसंगी आपल्याला जण आंदोलन करावे लागेल. तेव्हा सर्व मागासवर्गीय कर्मचार्यांनी मा.अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखालील कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र यावे.असे जाहीर आव्हान गौतम कांबळे
राज्य महासचिव महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडी यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

1 1
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंड तालुका साऊंड लाईट, मंडप, जनरेटर असोसिएशन च्या अध्यक्षपदी मा. जितेंद्र देशमुख व उपाध्यक्षपदी मा. दादा मोरे यांची निवड

Read Time2 Minute, 4 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी हर्षल पाटोळे

दौंड-कोरोनच्या पार्श्वभूमीवर साउंड ,लाईट मंडप, जनरेटर व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. तो नव्याने चालू करण्यासाठी आज दिनांक 20 सप्टेंबर 2020 रोजी दौंड येथे मिटिंग आयोजित केली होती या मिटिंग मधे छावा क्रांतिवीर सेना , महाराष्ट्र राज्य प्रणित पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम असोसिएशन यांच्यावतीने दौंड तालुका साऊंड लाईट, मंडप, जनरेटर असोसिएशन च्या अध्यक्षपदी मा. जितेंद्र देशमुख व उपाध्यक्षपदी मा. दादा मोरे याची निवड करण्यात आली या वेळी दौंड तालुका साऊड लाईट मंडप जनरेटरचे मालक वर्ग उपस्थिती होते त्या नंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सर्व सभासद यांच्यामध्ये अडी-अडचणी वर चर्चा झाल्या . त्या नंतर कुणावरही अन्याय होणार नाही याची आम्ही खात्री देतोय व आपण ही यापुढे आपल्याकडून कोणत्याही सरकारी नियमाचे उलनघन होणार नाही याची देखील काळजी घेणे गरजचे आहे. त्याचबरोबर गेली सहा महिने कोरोनाच् सावट असल्यामुळे आपल्या व्यवसायाला चालना मिळालेली नसून या पुढील काळात लोक डाऊन कमी होत आहे . तरी आपण शासनाला विनंती करून परिस्थिती नुसार शासकीय नियमात राहून आम्हाला देखील व्यवसाय चालू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करू ज्याने करून आपल्या व्यवसाय करणाऱ्याना दिलासा भेटेल.

6 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

दौंड शहरातील वोडाफोन व आयडिया कंपनीचे ग्राहक बोगस नेटवर्कमुळे त्रस्त….

Read Time1 Minute, 27 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड शहरातील वोडाफोन व आयडिया कंपनीचे ग्राहक बोगस नेटवर्कमुळे त्रस्त.
दौंड शहरामध्ये आयडिया व वोडाफोन कंपनीचे मोबाईल सिमकार्ड ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत परंतू गेली दोन ते तिन महीने झाले या कंपन्याग्राहकांना व्यवस्थित सेवा देत नाहीत. कस्टमर केअरला फोन केला तर उडवा उडवीची उत्तर देतात,४जी स्पीड चें दर घेऊन आणि २ जी चे नेटवर्क सुद्धा मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे,कधी कॉल ड्रॉप,कधी नेटवर्क नाही,कधी कॉल लागत नाही अश्या अनेक समस्या ग्राहकांच्या समोर उभ्या आहेत मात्र नंबर 1 म्हणणाऱ्या कंपन्या जर असे करत असतील तर ग्राहकांनी काय करावे असा प्रश्न निर्माण होतो,या समस्येने ग्राहक हैरान झाले आहे.,ग्राहकांचा कल आता सिमकार्ड कंपनी बदलन्याकडे (पोर्टबिलिटी) जास्त वाढला आहे. अशा दौंड शहरातील नागरीकांचे म्हणने आहे.

प्रतिकात्मक चित्र
7 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

गुन्हे शाखा युनिट 2 ची अजून एक कारवाई….

Read Time2 Minute, 10 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी चिंचवड

काल दिनांक 15/08/2020 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 ची टीम सह PSI निलपत्रेवार पोहवा स्वामी,वेताळ, नामदेव राऊत, पोना,जयवंत राऊत असे हद्दीत पेट्रोलींग करत आसताना नामदेव उर्फ देवा राऊत यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की दोन सराईत चोर चोरीचा लॅपटॉप विकण्यासाठी पवळे ब्रीज येथे येणार आहेत अशी माहिती मिळताच तातडीने वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनखाली सदर ठिकाणी सापळा रचुन मिळाल्या माहितीनुसार आरोपी इसमास ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेतली व कसून चौकशी केली असता त्यांच्या कडे त्यांनी चोरलेला एक लॅपटॉप आढळून आला
त्यांनी खडक पोलीस स्टेशन च्या हद्दीत लॅपटॉपची चोरी केली असल्याचे कबुल केले त्यांना त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव ) मंगेश विजय चव्हाण वय 23 वर्षे रा. वडारवाडी पुणे व ) महमद कलीम शेख वय 38 वर्षे रा. संत कबीर चौक नानापेठा पुणे असे सांगीतले त्यांची पूर्ण चौकशि केली असता ते सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले लॅपटॉप चोरीचा गुन्हा हा खडक पोलीस स्टेशन येथे नोंद असल्याचे निष्पन्न झाल्यावर व आरोपीनी गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपीस रिपोर्टसह पुढील कार्यवाही साठी खडक पो.स्टे चे ताब्यात देण्यात आले आहे

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

तरुणाच्या डोक्‍यावर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला,रविदास चर्मकार युवा फाऊडेशनच्या वतीने दौंड तहसिलदार व दौंड पोलीस स्टेशनला निवेदन.

Read Time4 Minute, 19 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दिं. 28/07/2020 रोजी साबळेश्वर (पै)ता.केज.जि बीड सुरज कांबळे यांच्या डोक्‍यावर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला झाल्याबाबत रविदास चर्मकार युवा फाऊडेशनच्या वतीने दौंड तहसिलदार व दौंड पोलीस स्टेशनला काल दि 4 ऑगस्ट 2020 रोजी निवेदन देण्यात आले,
पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ख्याती असणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांवर जातीय कारणातून होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येत आहे, आपल्या सर्वांसाठी निश्चित निंदावजनक आहे ,पुणे ,औरंगाबाद, जालना, परभणी, नागपूर, बीड इत्यादी ठिकाणी आशा घटनांमधून हत्याकांड देखील झाल्या आहेत,सर्व प्रकारामुळे अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये सहकार्याबद्दल असंतोष बळावत आहे तसेच सरकार पातळीवरून जातीय अत्याचाराच्या घटनेकडे दुर्लक्ष केले जात आहे अशी भावना निर्माण झाली आहे ,तरी वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येऊन जातीय अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाने नव्या कृती कार्यक्रम करावा या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे करण्यात आल्या आहेत,

1)जातीय अत्याचाराच्या खुनाच्या घटनांचा तपास सरसकट राज्यगुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा.
2) जातीय अत्याचाराच्या सर्वच घटना यापूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार द्रुतगती न्यायालयामार्फत सुनिश्चित कालखंडात चालवले जातील यासाठी विशेष न्यायालयीन समिती नियुक्त करण्यात यावी.
3) जातीय अत्याचाराच्या घटनांमध्ये दुसऱ्यांदा गुन्हा दाखल होणाऱ्या व्यक्तीवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
4) जातीय अत्याचाराच्या घटना नोंद करण्यास तपासामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबतची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी करावी.
5) जातीय अत्याचाराच्या घटना मधील अत्याचारित व्यक्तींना शासन धोरणानुसार देण्यात येणारा अर्थसहाय्य निधी 48 तासात देण्यात यावा तसेच मृत्यू पडणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय-निमशासकीय नोकरी देण्यात यावी असे निवेदन संत रोहिदास चर्मकार युवा फाउंडेशन च्या वतीने दौंड तहसीलदार व पोलीस स्टेशनला देण्यात आले ,यावेळी श्री अमोल कांबळे (दौंड शहर व तालुका अध्यक्ष) यांनी दिली निवेदन देताना श्री.गणेश ढमढरे (दौंड तालुका उपाध्यक्ष) श्री. सुशांत जाधव (युवक सचिव),श्री. अविनाश तिखे (दौंड तालुका सल्लागार),श्री.सागर तावडे (संपर्कप्रमुख),श्री. संतोष जाधव (,नविन गार शाखाप्रमुख) श्री.गणेश दळवी (दौंड तालुका कार्याध्यक्ष) हे उपस्थित होते

3 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

स्थगीत केलेले धरणे आंदोलन पुन्हा सुरु,अधिग्रहित रुग्णालयांची मनमानी सुरूच…

Read Time4 Minute, 46 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव


कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे उपचारास्तव शासनाने अधिग्रहीत केलेल्या दौंड शहरातील महालक्ष्मी हॉस्पिटल व पिरामिड हॉस्पिटलचे संबंधित डॉक्टर शासनाचे आदेश धुडकावून तसेच आपण त्यांना बसले नोटीस ढाके बसून पॉझिटिव पेशंट ऍडमिट करून घेत नसल्याचे निषेधार्थ स्थगित केलेले धरणे आंदोलन लोकशाहीचे सनदशीर मार्गाने दि 03/08/2005 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून दौंड तहसील कार्यालयाच्या समोर करीत असले बाबत निवेदन देण्यात आले 1)उपविभागीय अधिकारी दौंड /पुरंदर/ फौज/कोरोना कावि/52,53,54/2020 दिं.21/07/2020 रोजीचा आदेश.
2) आपले कडील फौजदारी कावी/1364/2020 दिं.27/07/2020 रोजीचे संबंधित डॉक्टर्सला बजावली नोटीस.
3)ओ.पी.डी. क्र72961 या पेशंटच्या नातेवाईकांनी आपल्याकडे रीतसर केला अर्ज
शासनाने अत्यावस्थ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे वरचा उपचारास्तव दौंड शहरातील अधिग्रहण केलेल्या हॉस्पिटल्स पैकी महालक्ष्मी हॉस्पिटल आणि पिरॅमिड हॉस्पिटल ही कोरोना पेशंटला ऍडमिट करून घेत नसलेचे निषेधार्थ आम्ही आपल्या कार्यालयासमोर दिनांक 28/ 07/ 2020 रोजीचे बेमुदत धरणे आंदोलन आपले लेखी आश्‍वासनानंतर तसेच आपण संबंधित हॉस्पिटल्सना तात्काळ नोटिसबजावुन संदर्भीय शासकीय आदेशान्वये कोरोना पेशंटस ऍडमिट करून घेण्यासंबधीचे लेखी पत्र दिल्याने तूर्त स्थगित केले होते. परंतु सदरहू आपले आदेशानंतरही महालक्ष्मी हॉस्पिटल पिरॅमिड हॉस्पिटल यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऍडमिट करून घेण्यास नकार दिला आहे तर दुसरीकडे योगेश्वरी हॉस्पिटल व पिरॅमिड हॉस्पिटल हे अत्यावश्यक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना अनामत रक्कम दैनंदिन औषधे व पी.पी.ई.किटसचे पैशाची मागणी करीत आहेत. वास्तविक पाहता उपरोल्लेखित हॉस्पिटल्स ही एम.जे.पी.ए.वाय या योजनेचे लाभार्थी असताना हे हॉस्पिटल संबंधित रुग्णांना पैशाची मागणी करत आहेत ही बाब म्हणजे शुद्ध भ्रष्टाचार आहे सबब या हॉस्पिटलचे प्रमुखावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये तसेच या हॉस्पिटलचे अधिग्रहण करणे संबंधि शासनाचे आदेश झाल्यानंतर उपचारा अभावी यांचे मृत्यू दरम्यानचे कालावधीमध्ये झालेले आहेत. त्यास जबाबदार धरण्यात येऊन भा.द.वि.कलम 304 अन्वये सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने दिनांक 03/08/ 2019 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून स्थगित केलेले बेमुदत आंदोलन चालू केले आहे. धरणे आंदोलनात आबा(सुरेश) वाघमारे,(प्रांत उपाध्यक्ष बहुजन लोक अभियान) लोकश्री.विनायक माने(अखिल भारतीय होलार समाज संघटना प्रदेश उपाध्यक्ष),श्री.प्रशांत धनवे श्री. नरेश डाळींबे(मा.सरपंच) यानी सहभाग घेतला आहे. तसेच विकास शेलार, विनायक मोरे, रविंद्र सकट, सुशांत वाघमारे उपस्थित होते.आंदोलना दरम्यान जर का? शांतता सुव्यवस्था व सोशल डिस्टंगशींगचा प्रश्न झाल्यास त्यास सर्व तोपरी शासन जबाबदार राहील असे आंदोलन करत्यांनी म्हटले आहे.

6 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

पोलीस रेकॉर्ड वरील आरोपीस अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तूल व चार कडतुस जप्त गुन्हे शाखा युनिट 2 कारवाई

Read Time4 Minute, 16 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चिंचवड प्रतिनिधी सनी घावरी

दिनांक ०१/०८/२०२० रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडून बकरी ईदचे अनुशंगाने मा. पोलीस
आयुक्त श्री संदीप बिष्णोई साहेब यांचे आदेशाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकींगची व्यापक मोहीम
राबविण्यात येत असुन पोलीस दिपक खरात यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकरवी बातमी मिळाली
कि, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार १) सोमनाथ भारत शिंदे वय २६ वर्षे, धंदा- ड्रायव्हर रा. जय
बजरंग हौसिंग सोसायटी अजंठानगर, चिंचवड २) मंगेश सुनिल
झुंबरे वय २८ वर्षे, धंदा- व्यापार रा. आयव्ही इस्टेट, आयव्ही विलास सी/१४ केसनंद फाटा वाघोली
हे थरमॅक्स चौक येथे दुचाकीवर घातक अग्निशस्त्रासह येणार असल्याची बातमी मिळालेने वरीष्ठ
पोलीस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड यांना बातमीचा आशय कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर
ठिकाणी पोलीस उप निरीक्षक एस डी निलपत्रेवार, पोलीस हवालदार दिपक खरात, प्रमोद
वेताळ, केराप्पा माने, वसंत खोमणे, पोकॉ , नामदेव राऊत, , अजित सानप
यांनी सापळा रचून आरोपी सोमनाथ भारत शिंदे वय २६ वर्षे, धंदा- ड्रायव्हर रा. जय बजरंग
हौसिंग सोसायटी अजंठानगर, चिंचवड, मंगेश सुनिल झुंबरे वय २८
वर्षे, धंदा- व्यापार रा. आयव्ही इस्टेट, आयव्ही विलास सी/१४ केसनंद फाटा वाघोली त्यास
दुचाकीसह शिताफीने अटक केली त्याची अंगझडती घेवून त्याचे जवळील दोन देशी बनावटीचे
पिस्टल व चार जिवंत काडतुस मिळुन आले. आरोपी १) सोमनाथ भारत शिंदे वय २६ वर्षे, धंदा-
ड्रायव्हर रा. जय बजरंग हौसिंग सोसायटी बिल्डींग अजंठानगर, चिंचवड
२) मंगेश सुनिल झुंबरे वय २८ वर्षे, धंदा- व्यापार रा. आयव्ही इस्टेट, आयव्ही विलास सी/१४
केसनंद फाटा वाघोली यास अटक करुन त्याचे विरुध्द निगडी पोलीस ठाणेकडे भारतीय शस्त्र
अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३)
सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप
निरीक्षक एस डी निलपत्रेवार हे करीत आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस
आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस
आयुक्त गुन्हे १ श्री आर आर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट २ चे प्रभारी वरीष्ठ
पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक संयज निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी
पोहवा. दिपक खरात, शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, वसंत खोमणे, मपोहवा उषा
दळे, नामदेव राऊत, जयवंत राऊत,दिलीप चौधरी, विपुल जाधव, चेतन मुंढे, तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र शेटे व पोलीस नाईक नागेश माळी यांचे पथकाने कारवाई केली
आहे.

4 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध….

Read Time2 Minute, 16 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव – दुधाला जादा दर मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते चाळीसगावी देखील आंदोलन झाले या आंदोलनात खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण देखील सहभागी झाले होते मात्र आमदार मंगेश चव्हाण यांचा तोल गेला व उद्धव ठाकरे हे रिकामचोट मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केल्याने याचे पडसाद राज्यभर उमटले असून अनेक शिवसैनिकांनी त्यांना मोबाईल वर कॉल करून याचा जाब विचारत निषेध केला.

     दि 3 ऑगस्ट रोजी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस च्या वतीने या घटनेचा निषेध करून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीपासून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदार व पोलीस प्रशासन चाळीसगाव यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले आहे आमदार मंगेश चव्हाण यांनी या वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी करून त्यांच्या विरोधात घोषणा बाजी करून त्यांच्या फोटो ला जोडा मारो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा उपप्रमुख आर एल पाटील, महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल निकम, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष दिनेश पाटील, श्याम देशमुख,  यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %