अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहर पोलिसांनी आणखी एक उल्लेखनीय कामगिरी करत नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला नियोजनबद्ध सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपी हा अंबड पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे दाखल असलेल्या CR No. 518/2026 मधील भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(3) अंतर्गत गुन्ह्यात हवा होता. गोपनीय माहितीच्या आधारे चाळीसगाव शहर पोलिसांनी नियोजनपूर्वक कारवाई करत संशयित आरोपीस ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी अंबड पोलिसांच्या स्वाधीन केले.
या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील, सहायक फौजदार अजय माळचे, पोलीस हवालदार राहुल सोनवणे तसेच अंमलदार दत्तू साळवे, सुनील पाटील, अशोक पाटील आणि जितेंद्र वाघ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या धडाकेबाज कारवाईमुळे चाळीसगाव शहर पोलिसांच्या सतर्कतेचे आणि गुन्हेगारांविरोधातील तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून, नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
