चाळीसगाव येथे महाविकास आघाडी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जल्लोष

Read Time47 Second

चाळीसगाव प्रतिनिधी-आज शिवतीर्थावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच चाळीसगाव येथे शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष रमेश विक्रम चव्हाण,दिलीप घोरपडे शिवसेना तालुका प्रवक्ता,शेखर देशमुख नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सुनील काशीनाथ गायकवाड शिवसेना तालुका संघटक व कार्यकर्ते उपस्थित होते .

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

समाजसुधारक विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Read Time2 Minute, 9 Second

मोरांबा ता अक्कलकुवा( जि नंदुरबार )-आज प्राथमिक आरोग्य केंद्र मोरांबा ता अक्कलकुवा जि नंदुरबार येथे समाजसुधारक विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

भारतीय समाज सुधारणेत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव अग्रणी येते. पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. क्रांतीसूर्य महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज संस्थेची स्थापना केली. त्याआधारे शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. १८८८ मध्ये जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ‘शेतकर्‍यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता.आजही त्यांचे विचार प्रेरणादायी आहे प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन डॉ प्रमोद सोनवणे यांनी केले

यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ प्रमोद सोनवणे, औषधनिर्माण अधिकारी सचिन अग्रवाल, श्रीमती एस डी गावीत, श्रीमती वसावे, श्री राजू पठाण, क्लर्क श्री पवार , श्री ज्ञानेश्वर रोकडे , श्री अजिनाथ साबळे, श्री शरद जाधव,श्री रवि गायकवाड आदी उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्यावतीने पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन.

Read Time7 Minute, 54 Second

एरंडोल(जि जळगांव)-महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचा प्रेरणादायी उपक्रम.
आपल्या प्रेरणादायी कार्याने इतरांना दिशा देण्याचे काम प्रत्येक क्षेत्रात अनेकांकडून सातत्याने होत असून ही बाब लक्षात घेऊन सर्व क्षेत्रातील धडपडणार्‍या उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना समान संधी मिळावी याकरिता निकोप व निस्वार्थ हेतुने ,
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ वतीने राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले , लोकनेते यशवंतराव चव्हाण, डॉक्टर पंजाबराव देशमुख, मौलाना अबुल कलाम आझाद , स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, लोकनेते गोपीनाथ मुंडे,प्रमोदजी महाजन आदींच्या नावे विविध क्षेत्रातील मानाचा नाविन्यपूर्ण पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून आपापल्या क्षेत्रात सेवाभावी वृत्ती जोपासणाऱ्या उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तसेच राज्यशासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर यांनी दिली.
दिनांक 28 नोव्हेंबर 2019 सदर प्रस्ताव सादर करावयाचे असून 10डिसेंबर 2019 पर्यंत आदर्श शेतकरी, आदर्श जिल्हा परिषद सदस्य,जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक, संस्थांचे माध्यमिक शिक्षक, खाजगी प्राथमिक शिक्षक, स्वयसेवी संस्था, शिक्षक व इतर संघटना, अल्पसंख्याक शाळा व क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, विद्या प्राधिकरणातील व राज्यस्तरावरील शिक्षण विभागातील अधिकारी,पत्रकार ,समाजसेवक, उद्योजक, साहित्यिक,शासनाच्या तेजस प्रकल्पांतर्गत कार्य करणारे टॅग कॉर्डिनेटर, केंद्रप्रमुख ,शिक्षण विस्ताराधिकारी , पोलिस व संरक्षण विभाग, अधिकारी विभाग, ग्रामसेवक ,सरपंच, तलाठी, महापालिका, महापौर नगरसेवक, पंचायत समिती सभापती सदस्य,या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील आलेल्या प्रस्तावामधून प्रत्येक क्षेत्रातून एकाची निवड ही निवड समितीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक तथा सन्मान सोहळ्याचे आयोजक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.सदरील व्यापक स्वरूपाचा पुरस्कार सन्मान सोहळा यंदा सर्वस्तरीय व्हावा यासाठी इच्छा सोशल मीडिया व वैयक्तिक अनेकांनी व्यक्त केल्याने या वर्षी विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्यांसाठी पुरस्कार सन्मान सोहळ्याचे दारे खुली करण्यात आली असून हा प्रेरणादायी व महत्वपूर्ण असा उपक्रम सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.जळगाव जिल्ह्यातून निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित आमदार, विविध क्षेत्रातील मान्यवर, मान्यवर दैनिकाचे संपादक,लोकसभा मतदारसंघाचे खासदार, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य, शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीच्या वतीने राज्य समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षण तज्ञ,जळगाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व शिक्षण विभागाचे सभापती, जिल्हाधिकारी,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्याचे नियोजन व्यापक मंथन अंतर ठेवण्यात आले असून संबंधितांनी आपले प्रस्ताव हे पासपोर्ट फोटोसह किशोर पाटील कुंझरकर,53 अ, क्षितिज निवास चिमुकले दत्त मंदिराजवळ आदर्श नगर एरंडोल तालुका एरंडोल जिल्हा जळगाव. पिन 425109.

अधिक माहिती साठी मोबाईल नंबर 7030887190 वर संपर्क साधावा.

व वरील पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वतः स्वहस्ते विहित नमुन्यात आपल्या सर्व कार्याची माहिती व कात्रणं सह पाठवावे.
आपले शैक्षणिक सामाजिक कार्य त्याच जोडीने उल्लेखनीय कार्याची एक प्रत स्वहस्ताक्षरात प्रस्तावना जोडायची आहे.प्रत्येक क्षेत्रातील पुरस्काराचे नाव वेगवेगळे राहणार असून आयोजक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ आहे. जळगाव जिल्ह्यासह जिल्हास्तरीय सोहळा असून इतर कोणत्याही जिल्ह्यातून आलेले प्रस्ताव स्वीकारण्यात येतील. तरी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले असून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम सुरू करण्यात सातत्याने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्यावतीने राज्य समन्वय समितीच्या व सर्व क्षेत्रातील मित्र परिवाराच्या सहकार्य व मदतीने राबविण्याचा मनोदय यावेळी शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी व्यक्त केला. आलेल्या प्रस्तावांना मधून निवड समितीमार्फत निवडण्यात आलेल्या प्रस्तावांची यादी अंतिम करण्यात येऊन ती प्रसिद्ध करण्यात येईल तदनंतर
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदय यांचे उपस्थितीत सदरील पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात येईल असेही कुंझरकर यांनी म्हटले.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

शिवसेनेचा धडक मोर्चा,शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा।

Read Time2 Minute, 28 Second

चाळीसगाव- आज दिनांक २५रोजी चाळीसगाव तालुका शिवसेने तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसीलदार कार्यालय चाळीसगाव परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्या साठी प्रति हेक्टर २५००० रु मदत त्वरित मंजूर व्हावी,ज्या शेतकऱ्यांचे पीकविमा आहे त्यांना त्वरित पीकविमा मिळावा,बँकांनी शेतकार्यावरील कर्जकपात करू नये,राज्यपालांनी जाहीर केलेली आर्थिक मदत त्वरित शेतकऱ्यांना बँक खात्यात मिळावी अश्या अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले.

या वेळी तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव खलाने, रोहिदास पाटील, प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, शेतकरी सेना तालुकाप्रमुख संजय संतोष पाटील, धर्मा खंडू काळे, नंदकिशोर बाविस्कर, संजय ठाकरे, तुकाराम पाटील, हिंमत निकम, सुरेश पाटील, जगदीश महाजन, अनिल राठोड, अण्णा पाटील, सुभाष राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, विठ्ठल पवार, सुनील किरण घोरपडे, विलास शिंदे,प्रभाकर दिनेश घोरपडे, दिलीप पाटील, शैलेंद्र सातपुते, कुमावत, अनिल पाटील, सचिन ठाकर, अनिल राठोड, वसीम शेख, संदीप पाटील, सागर पाटील, गोपाल परदेशी, दिलीप राठोड, नंदू गायकवाड, पांडुरंग बोराडे, गणेश भवर, संतोष गायकवाड, गोपाल पाटील, सचिन गुंजाळ, अनिल कुठे, दिनेश विसपुते, राजू शेळके, सुमित शेळके, शुभम शिंदे, अमोल चौधरी, रवींद्र चौधरी, सुनील पवार, बापू आगवणे आदी उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

उत्राण गुजर हद्द ग्रामपंचायत सदस्यपदी अमोल महाजन यांची बिनविरोध निवड

Read Time2 Minute, 0 Second


उत्राण तां. एरंडोल येथील एरंडोल पंचायत समिती चे विद्यमान उपसभापती व शिवसेना गटनेते श्री.अनिल रामदास महाजन यांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर वॉर्ड नंबर ४ ला होवू घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना प्रेरित परिवर्तन पॅनल कडून श्री. अमोल गोविंदा महाजन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सदर ग्राम पंचायत सदस्य पदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून गावात शांतता व सुव्यवस्था कायम असावी म्हणून निवडणूक न होवू देता बिनविरोध निवडीसाठी पंचायत समिती उपसभापती व परिवर्तन पॅनल प्रमुख अनीलभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच परिवर्तन पॅनल च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून निवडणूक न होवू देता एका उच्चशिक्षित योग्य तरुणाला संधी देवून एक आदर्श परिसरात निर्माण केला आहे. निवडी बद्दल अमोल महाजन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. बिनविरोध निवडीबद्दल नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अमोल महाजन यांनी सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देवून सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

पत्रकारांनी स्वतःची पण काळजी घ्यावी:सुप्रिया सुळे

Read Time1 Minute, 13 Second

मुंबई: अजीत पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेताच काल राजकीय भूकंप झाल्यानंतर पत्रकारांची ब्रेकिंग न्युज साठी धावपळ सुरू झाली,या धावपळी मधे सर्व पत्रकार धावपळीत असतांना जीव धोक्यात घालून बातम्या जाणते पर्यंत पाहोचविण्याचे कार्य करत असताना,राजकीय घडामोडी वर सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले असतांना त्यातून वेळ काडून सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले की माध्यमातील मित्र- मैत्रिणींनो,
ब्रेकींग न्यूजचं महत्व मी अमान्य करीत नाही, पण रस्ते सुरक्षा देखील महत्वाची आहे. मला हा फोटो पाहून कॅमेरामन आणि ड्रायव्हरची काळजी वाटत आहे. सर्वांना आवाहन आहे की, आपली काळजी घ्या
.

असे ट्विट करून सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांबद्दल काळजी व्यक्त केली.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

स्व.सतिष चंद्रसिंग पाटील (गुड्डू आबा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोकनायक तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान व हिरकणी महिला मंडळाकडून बापजी जिवनदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रुग्णासाठी मोफत अन्नछत्र सुरु

Read Time3 Minute, 57 Second

चाळीसगाव शहरातील हिरकणी महिला मंडळाकडून स्व.सतिष चंद्रसिंग पाटील (गुड्डू आबा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहरातील बापजी जीवनदिप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि रुग्णांच्या एका नातेवाईकांसाठी मोफत अन्नछत्र आजपासून सुरु करण्यात आले. याप्रसंगी बापजी हॉस्पिटलमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ.स्मिता बच्छाव, डॉ.संदीप देशमुख, सौ.कोकिळा राजपूत, नगसेवक दीपक पाटील, उत्तमराव पाटील, श्री.सुबोध वाघ, बन्सीशेठ मेहता, अनिताताई शर्मा, सौ.मीना चौधरी हे लाभलेत, याप्रसंगी धन्वंतरीपूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली, याप्रसंगी श्रीकांत राजपूत यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन केले. तर नगरसेविका सविता राजपूत, डॉ.संदीप देशमुख आणि सौ.स्मिता बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केलं, अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना युगंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता बच्छाव म्हणाल्या की हिरकणी महिला मंडळाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केलाय, अतिशय पुण्याचे अन्नदानाचे काम त्यांनी सुरु केल्याबद्दल मी अध्यक्ष सौ सुचित्रा ताई राजपूत यांचे आभार व्यक्त करते आणि ह्या कामात मी सदैव त्यांच्या सोबत आहे. तर डॉ.संदीप देशमुख यांनी देखील हिरकणी मंडळाचे आभार मानले, आभार व्यक्त करतांना हिरकणी मंडळाच्या अध्यक्षा सुचित्रा राजपूत म्हणाल्या की, माझ्या वडिलांकडून मला सामाजिक कामाचा वारसा मिळाला आहे मी गुड्डू आबा आणि तात्यांच्या स्मरणार्थ काहीतरी चांगलं आणि पुण्याचे काम करू शकले याचा मला आनंद आहे तसेच ह्या अन्नदानाच्या कार्यात जर कोणाला सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी संपर्क करावा ह्या आवाहना नंतर राहुल राजपूत यांनी दरमहा ५०० रु देणगी अन्नछत्राला चालू केली, तर बऱ्याच जणांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर मदत चालू केली आहे, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्ष सौ.सुचित्रा पाटील, प्रीती रघुवंशी, सौ.वैशाली काकडे, सौ.सुनंदा राजपूत, राहुल राजपूत, कविता अमृतकार,सुरेखा राजपूत, आस्वाद महाशब्दे, प्रताप भोसले, टोनु राजपूत, दीपक अमृतकार, बाबा दीक्षित, विठ्ठल राजपूत, मिलिंद राजपूत, पप्पू राजपूत, दीपक पाटील, अमित गुप्ता, गीतेश कोटस्थाने, संजय चौधरी, अनिल वराडे, दिलीप जाणे, पंकज सुराणा आणि पत्रकार मुराद पटेल यांचे सहकार्य लाभले तर अन्नछत्राला नागरिकांनी मदत करावी असं जाहीर आवाहन देखील मंडळाच्या वतीने करण्यात आले आणि ज्यांना मदत करायची असेल त्यांनी हिरकणी महिला मंडळाला संपर्क साधावा.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची खासदार उन्मेश पाटील यांनी घेतली भेट .सात बलून बंधाऱ्यांना लवकरच मान्यता प्रदान करण्यात यावी अशी मागणी केली.

Read Time4 Minute, 27 Second

जळगाव — खान्देशच्या सिचन क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणारा आणि शेतकरी बांधवांच्या जिव्हाळाचा प्रश्न असलेल्या सात बलून बंधाऱ्यांना लवकरच मान्यता प्रदान करण्यात यावी यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे.यावेळी जलशक्ति मंत्री गजेद्र शेखावत यांनी या विषयांवर खासदार उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली असून या विषयाची माहिती घेतली आहे.श्री. पाटील यांनी सात बलून बंधाऱ्यांची आवश्यकता विशद केली. येत्या पंधरवड्यात तात्काळ सात बलून बंधाऱ्यांना प्राधान्याने मान्यता प्रदान करण्याचे केंद्रीय मंत्री शेखावत आशवस्त केले. खासदार उन्मेष पाटील यांनी सात बलून बंधारे पूर्ण करणेसाठी मी कंबर कसली असून या बंधाऱ्यामुळे खान्देश मध्ये जलक्रांती होईल.तसेच हा सर्व परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त केली आहे.

दृष्टिक्षेपात सात बलून बंधारे

मेहूणबारे, बहाळ ( वाडे), पांढरद, भडगाव, परधाडे, माहिजी, कानळदा या ठिकाणी हे बंधारे प्रस्तावित असून यामध्ये साचणारे पाणी : 25.28 दशलक्ष घनमीटर इतक्या क्षमतेने साचणार असून यासाठी सुमारे
अपेक्षित खर्च : 841 कोटी,15 लाख येणार आहे. या बंधाऱ्यामुळे एकूण
4489 हेक्‍टर क्षेत्राला लाभ होणार आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीतील पाणी बंधारे नसल्याने वाहून जाते. त्यामुळे गिरणा धरणापासून पुढील बाजूस असलेल्या नदीवर सात बलून बंधारे बांधून पाणी अडविण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागासमोर यापूर्वीच ठेवण्यात आलेला आहे. यामुळे नदीतून वाहून जाणारे पाणी अडविण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीचे पाणी थेट तापी नदीत मिळते. धरणापासून तापी पर्यंत नदीच्या वाटेत कोठेही पाणी अडवले जात नसल्याने पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीचे पाणी अडवले जाऊन त्याचा सिंचनासाठी लाभ व्हावा यासाठी खासदार उन्मेश पाटील या विषयाला प्राधान्य देत भक्कम पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. जिल्ह्यातील मेहुणबारे, बहाळ, परधाडे यासह इतर सात ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. त्या भागातील नदी पात्रात बंधारे बांधण्याचा प्रस्ताव पाटबंधारे खात्याने यापूर्वीच वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत पाणी उपलब्धता प्रमाणपत्र यापूर्वी उपलब्ध झाले आहे. बधांऱ्यांच्या जागेसाठी सर्वेक्षण होऊन जागा निश्चिती देखील झाल्या आहेत. यासाठी बांधकामाचे प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्यास प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. जिल्ह्याचे तरुण तडफदार आणि अभ्यासू खासदार उन्मेश पाटील यांच्या धडाडीमुळे हे सात बलून बंधारे पूर्णत्वास येतील असा विश्वास शेतकरी बांधवांमध्ये चर्चिला जातो आहे.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

जागतिक शौचालय दिन साजरा कौमी एकता सप्ताहाचे आदिवासी वस्तीत जि प शाळेत उदघाटन.

Read Time2 Minute, 23 Second

एरंडोल:जागतिक शौचालय दिनाच्यानिमित्ताने दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर तालुका एरंडोल याठिकाणी मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांचे पुढाकाराने शौचालय दिनानिमित्त माहिती देण्यात आलेली माहिती सांगण्यात आली व कृतियुक्त स्वच्छता करण्यात आली,माता पालक विद्यार्थी पालक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
यावेळी सहशिक्षक राकेश माळी, सीमाताई सोनवणे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
तसेच केंद्र शासनाने 1986साली घेतलेल्या निर्णयानुसार शासनाकडून व शिक्षण विभागाकडून प्राप्त निर्देश नुसार दिनांक 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर पर्यंत राष्ट्रीय एकात्मता अल्पसंख्यांक विकासासाठी कौमी एकता सप्ताहाचे उद्घाटन मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी बोलतांना मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी केंद्र व राज्य शासन शेवटच्या माणसाचे विकासासाठी विविध उपक्रम राबवित असून सर्वांनी एकत्रित या सर्व उपक्रमांत सहभागी होऊन स्वतःचा विकास साधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी सुरेश भील,सुभाष भील, सुनील सोनवणे, सखाराम सोनवणे, आदींनी उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.
ग्रामपंचायतीचे विस्ताराधिकारी आर् एम पवार, आरिफ शेख सर्व सदस्य गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील ,केंद्रप्रमुख सुनील महाजन, मान्यवरांनी उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम मिळावी यासाठी दि.20/11/2019 रोजी जारगाव चौफुली वर रास्ता रोको आंदोलन करणे बाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन .

Read Time2 Minute, 42 Second

पाचोरा भडगाव तालुक्यातील शंभर टक्के शेतकरी या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टी च्या पावसामुळे बाधित झाले असून त्यांच्या शेतातील पिकांचे संपूर्ण नुकसान झालेले आहे. याबाबत शासनाचे आदेशाने प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले असून तसा अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे. विद्यमान परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती शासन असल्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्याची संपूर्ण अधिकारी माननीय राज्यपाल साहेब यांना आहेत वरील परिस्थिती असताना शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसानीची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकरी अस्वस्थ असून त्याची मनस्थिती आत्महत्या कडे चुकत आहे,माननीय राज्यपाल महोदयांनी 8000रु मदत देऊ केली आहे,ती अत्यंत तुटपुंजी असून माननीय राज्यपाल साहेब यांनी शेतकऱ्यांना तातडीने सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत जमा करावी या मागणीसाठी आम्ही शिवसेना व युवासेना तर्फे दिनांक 20.11. 2019 बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता जारगाव चौफुली पाचोरा येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहोत,तरी याबाबत आपण नोंद घ्यावी शेतकऱ्यां चे प्रतिनिधी म्हणून आमच्या भावना माननीय राज्यपाल साहेब यांच्या पर्यंत पोहोचवाव्यात यासाठी उपविभागीय अधिकारी साहेब पाचोरा यांच्याकडे निवेदन देण्यात आले,यावेळी शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, नगरसेवक बापू हटकर ,विशाल राजपूत, जितू पेंढारकर ,गणेश चौधरी ,संतोष हटकर ,वैभव राजपूत ,दीपक पाटील ,नितीन पाटील, रवींद्र हटकर, हेमराज पाटील, विठ्ठल शिरसाठ, विनोद पाटील, राहुल पाटील, वाल्मिक जाधव, निलेश मराठे, अतुल मराठे, अनिकेत सूर्यवंशी, प्रदीप पाटील, खंडू सोनवणे, विजय पाटील, सुनील महाजन, हरिभाऊ पाटील, मतीन बागवान हे उपस्थित होते.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %