अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी): राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा लोकाभिमुख नेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त बुधवारी (२२ जुलै) चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व तालुका शाखेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचा, प्रशासनावरील भक्कम पकडीचा तसेच जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या कार्यशैलीचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचा व जनसेवेच्या वारशाचा आदर्श भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शशिकांत साळुंखे, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, प्रदेश युवक उपाध्यक्ष तथा नगरसेवक अभिषेक देशमुख, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, शहर कार्याध्यक्ष योगेश राजधर पाटील, प्रदेश सरचिटणीस कुशल देशमुख, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब दिनकर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष (सामाजिक न्याय विभाग) किशोर जाधव, तालुकाध्यक्ष (सामाजिक न्याय विभाग) खुशाल मोरे, महिला तालुकाध्यक्ष सोनाली देऊळकर, युवती जिल्हा कार्याध्यक्ष स्वाती राजपूत, महिला जिल्हा उपाध्यक्षा सोनाली गुरव, विद्यार्थी जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रणव (बिट्टू) अहिरे, युवक तालुकाध्यक्ष करण पाटील, जितेंद्र पाटील, रवींद्र पाटील, प्रताप भोसले, सागर पाटील, स्वप्नील पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चाळीसगाव शहर व तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले.
