अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येत असून सकाळपासूनच विविध भागांत रंगांची उधळण, पाण्याचे फवारे आणि रंगाच्या आनंदात तरुणाईने ठेका धरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ परिसर तसेच निवासी भागांमध्ये नागरिकांनी एकमेकांना रंग लावत सणाचा आनंद घेत आहे, विशेष म्हणजे लहान मुले रंग, पिचकारी आणि फुग्यांच्या माध्यमातून रंगपंचमीचा मनसोक्त आनंद घेत आहे, गल्लीबोळांत मुलांचा किलबिलाट आणि हास्याने वातावरण रंगून गेले असल्याचे दिसत आहे.
रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक व्यापारी संकुल व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. व्यवहार बंद ठेवून व्यापारी देखील सण साजरा करत असल्यामुळे बाजारपेठेत तुलनेने शांतता पाहायला मिळाली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला असून कोणतीही अनुचित घटना न घडता सण शांततेत व उत्साहात सुरू आहे.
एकूणच, चाळीसगावकरांनी पारंपरिक उत्साह, आपुलकी आणि रंगांच्या उधळणीत रंगपंचमी साजरी करत सणाचा आनंद द्विगुणित केला.
