अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील जामदे गावात दि २७ जुलै रविवारी उशिरा रात्री महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर पुढील कार्यवाहीसाठी चाळीसगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.
या कारवाईत बहाळचे मंडळ अधिकारी विष्णु राठोड, तसेच मेहुणबारे येथील तलाठी नयना ब्राह्मणे यांचा समावेश होता. रात्रीच्या वेळी धाडसी कारवाई करून महसूल पथकाने अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र या कारवाईनंतर जामदे परिसरातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीची माहिती स्थानिक तलाठींना नव्होती का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.याबाबत जामदा गावातील तलाठी प्रशांत कंकुरे यांना फोनवर विचारणा केली असता त्यांनी “आम्ही चार लोक असतो आणि ते ४०० लोक रस्त्यावर असतात,” असे उत्तर दिले. या वक्तव्यामुळे अवैध वाळू उपसा व वाहतुकीत सहभागी असलेल्या टोळ्यांची संख्या, त्यांचा प्रभाव आणि महसूल कर्मचाऱ्यांवर असलेला दबाव अप्रत्यक्षपणे समोर आल्याचे दिसत आहे.विशेष म्हणजे रात्री झालेल्या कारवाई पथकात दोनच कर्मचारी होते त्यापैकी एक महिला कर्मचारी असल्यावर कारवाई झाली.
मात्र गावातील तलाठी यांनी सांगितल्या प्रमाणे जर वाळू चोरांची एवढी मोठी फळी असेल तर पथकाचे कौतुक करावे लागेल आणि स्थानिक तलाठी यांना प्रश्न की आपण वरिष्ठांना तक्रारी दिल्यात का? आणि जर दिल्या नाहीत तर का नाही याची वरिष्ठांनी दखल घेत चौकशी करावी.
जामदेसह गिरणा नदी परिसरातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी महसूल विभागाने पोलिसांच्या मदतीने संयुक्त आणि सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मेहुणबारे पोलिस ठाण्याचे नवनियुक्त सहायक पोलिस निरीक्षक यांनी देखील आपल्या कार्याची सिंघम स्टाईल दाखवत मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाळू माफियांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आपल्या काही कर्मचाऱ्यांना देखील चोख कार्य बजाविण्याची समज द्यावी
