Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रीयेस १जानेवारी पासून सुरूवात

0
0 0
Read Time4 Minute, 3 Second

जळगाव, दि. २७ – अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली व २ रीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता १ ली व २ रीत प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याला त्याचे किंवा त्याच्या पालकांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये १ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, इयत्ता १ ली साठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ३० सप्टेंबर, २०२० रोजी ६ वर्षे पुर्ण असावे. त्यानुसार त्याचा जन्म १ ऑक्टोंबर, २०१३ ते ३० सप्टेंबर, २०१४ दरम्यानचा असावा. तर इयत्ता २ रीच्या वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थीने २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता १ ली मध्ये शाळेत प्रवेशित असल्याबाबतचे बोनाफाईड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे आधारकार्ड असणे आवश्यक असून विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, पालक शासकीय/निमशासकीय सेवेत नसावा.
या योजनेंतर्गत ज्या पालकांना आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत १ ली व २ री च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा पालकांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्मदाखला व आधारकार्डची साक्षांकित प्रत सादर केल्यांनंतर प्रवेश अर्ज १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी, २०२० या दरम्यान वाटप केले जाणार आहे. पालकांनी परीपूर्ण भरलेला अर्ज ५ मार्च, २०२० पूर्वी सादर करावा.
इयत्ता १ ली व २ रीच्या प्रवेशासाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी १५ मार्च, २०२० रोजी बालमोहन विद्यालय, चोपडा, शिवकॉलनी शिरपुर रोड, चोपडा येथे उपस्थित रहावे. तर रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी १५ मार्च, २०२० रोजी शासकीय आश्रमशाळा, डोंगरकठोरा, ता.यावल येथे उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयाच्या 02585-261432/262035 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि.जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: