Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

शिक्षक दाम्पत्याचा घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी उपक्रम ठरतोय अनुकरणीय

0
1 0
Read Time11 Minute, 26 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

एरंडोल-एरंडोल दिनांक ३० शिक्षक दाम्पत्याचा घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी उपक्रम ठरतोय अनुकरणीय. कोरोणा काळात राज्यात शाळा बंद शिक्षण सुरू परिस्थिती असताना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत गोरगरीब घटक आदिवासी वाडी वस्ती काटेवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा ठरू पाहणारा अडसर दूर करण्यासाठी शिक्षक दांपत्याने पुढाकार घेतला आहे.प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले व सतत नवनवीन उपक्रम राबवणारे एरंडोल तालुक्याचे बालरक्षक किशोर पाटील कुंझरकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गालापूरच्या आदर्श उपक्रम शिक्षिका जयश्री पुरुषोत्तम पाटील यांनी कोरोणा काळात जूनपासून शाळा बंद असून या परिस्थितीत आदिवासी वाड्यांवर शिक्षण सुरू राहण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर जात विद्यार्थ्यांच्या घरीच अंगणातच मास्क, सनी टाय झर चा वापर फिजिकल डिस्टेंस चे सर्व नियम पाळून पालकांच्या मदतीने घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी हा अनोखा प्रयोग स्वेच्छेने राबवत आहे. ज्यांचे कोणी नाही त्यांचे साठी शिक्षक दिलासादायक आहेत जणू काही हाच संदेश हे सेवाभावी शिक्षक दाम्पत्य देत आहेत.हा उपक्रम अनोखा असल्याने इतर सर्व शिक्षकांसाठी राज्यात सर्वत्र अनुकरणीय ठरला आहे.तेजस प्रकल्प टॅग कॉर्डिनेटर तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गालापूर आदर्श शिक्षिका जयश्री पाटील आणि किशोर पाटील कुंझरकर हे शिक्षक दाम्पत्य सामाजिक शैक्षणिक बांधिलकीतून शैक्षणिक क्षेत्रात सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात स्वतःच्या दोन्ही मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करणे,राज्यातील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या ठिकाणी वाढावी यासाठी स्वेच्छेने राज्यात सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात करणे, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या मदतीने शिक्षकांना इंग्रजी विषयाचे धडे देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस प्रकल्पात टॅग कॉर्डिनेटर म्हणून यशस्वी भूमिका बजावणे , तालुका जिल्हा स्तरावर प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका बजावणे ,सर्वत्र सकारात्मक शैक्षणिक वातावरण तयार होण्यासाठी प्रयत्न करणे जि प शाळा टिकवा अभियान राज्यभर राबवणे असे उल्लेखनीय कार्य या दोघेही शिक्षक दाम्पत्यांनी यापूर्वी यशस्वीरीत्या हाती घेत पूर्ण केले आहे. त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्यातून सतत इतरांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते व त्यांची सर्व उपक्रम नाविन्यपूर्ण असल्याने व कालसुसंगत असल्यानेअनुकरणीय ठरत असतात.किशोर पाटील कुंझ रकर हे दरवर्षी विविध सण उत्सवाच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव,शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका तसेच विविध योजनांची तळागाळात जनजागृती करतात.जयश्री पाटील या मुक ऑनलाईन या शिक्षकांसाठी शासनाने सुरु केलेल्या कोर्स च्या तालुका कॉर्डिनेटर म्हणून देखील काम पाहतात. अनेक तालुका जिल्हा स्तर प्रशिक्षणात दोघांनी तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या समता विभागांतर्गत बालरक्षकाच्या भूमिकेत दोघेजण कार्य करीत असून उपक्रमशीलता व तंत्र स्नेही पद्धतीने शिक्षकांमध्ये उत्साह वाढावा यासाठी देखील ते सर्वांना मदत करत असतात व प्रबोधन करत असतात. शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी समता विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या उपक्रमात देखील त्यांनी सहभाग घेतले आहे.जून पासून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या कोरोना काळाच्या दृष्टीने त्यांना सुचलेला घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी हा प्रयोग आदिवासी तसेच काठेवाडी वाड्या-वस्त्यांवर जाऊन प्रत्यक्ष ज्ञानदानाचे धडे देत शालेय विद्यार्थ्या साठी राबवत असून हा उपक्रम राज्यात सर्वत्र स्तुत्य आणिअनुकरणीय ठरला आहे.या उपक्रमाच्या सार्वत्रिकीकरणासाठी त्यांनी सोशल मीडिया व सर्वांना प्रोत्साहन दिले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड, आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे,जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील, विद्या परिषद पुणेचे संचालक डॉक्टर दिनकर पाटील, प्राथमिक विभागाचे संचालक जगताप साहेब,सह संचालक दिनकर टेमकर, डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर, लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश दादा पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार निलेश लंके आमदार विक्रम काळे आमदार किशोर दराडे आमदार मंगेश चव्हाण माजी सभापती पोपट तात्या भोळे,जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील, आदींनी शुभेच्छा पाठवून या शिक्षक दाम्पत्याचे आत्मबळ वाढवले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षक संघटनांसह अनेकांनी राबवलेल्या या उपक्रमाविषयी या दोघे आधुनिक सामाजिक शैक्षणिक बांधिलकीतून कार्य करणाऱ्या दाम्पत्याच सोशल मीडिया व प्रत्यक्ष फोनवरून अभिनंदन केले आहे.जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांसह जळगाव डायट प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर व सर्व अधिव्याख्याता तसेच डॉक्टर विद्या बोरसे सुचेता पाटील. अधिव्याख्याता शैलेश पाटील डॉक्टर राजेंद्र महाजन अधिव्याख्याता मंगेश घोगरे डॉक्टर वाय आर सोनवणे अशोक चव्हाण व सर्व अधिव्याख्याता प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी एस अकला डे, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील ,जे डी पाटील केंद्रप्रमुख सूनिल महाजन पंचायत समिती सभापती अनिल महाजन सर्व सदस्य सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने व शिक्षकांच्या वतीने तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी शिक्षक संघटनांतर्फे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. बालरक्षक म्हणून थोर समाजसुधारकांच्या कृतीयुक्त वारसा चालवण्यासाठी या धडपडी शिक्षक दांपत्याने सुरू केलेला स्वच्छेने सुरू केलेला कालसुसंगत घर घर शाळा शिक्षण आपल्या घरी शिक्षण आपल्या दारी, उपक्रम राज्यात सर्वत्र अनुकरणीय ठरला आहे. सरळ मार्गाने फक्त आपल्या कार्यावर भर देत आणि कोणी निंदो किंवा वंदू सेवाभावी वृत्ती जोपासत शिक्षणक्षेत्रात स्वतःपासून बदलाची सुरुवात करणाऱ्या या शिक्षक दाम्पत्याने शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून अनोखा आदर्श उभा केला आहे. कोणी निंदा कोणी वंदा सरळ मार्गाने थोर समाज सुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा डोळ्यापुढे ठेवून या दोघा शिक्षक दांपत्याने कृतीयुक्त पद्धतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा केवळ भाषणातून ना सांगता कृतीयुक्त पद्धतीने पुढे नेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक अडचणी व त्रासातून या शिक्षक दाम्पत्याने सुरू केलेला शैक्षणिक सामाजिक कार्याचा सकारात्मक प्रवास प्रेरणादायी व अनुकरणीय कार्य करत आहे . सदरील शिक्षक दाम्पत्य आहे सतत चांगुलपणाचा ध्यास घेऊन शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो असे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील,माझी गटशिक्षणाधिकारी विकास पाटील माजी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी केंद्रप्रमुख संघाचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुणराव जाधव यांनी म्हटले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: