अधिकार आमचा न्युज नेटवर्क संपादक गफ्फार शेख (मलिक) उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील स्टेशन रोड परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल अवघ्या आठ तासांत शोधून काढत चाळीसगाव शहर पोलिसांनी तपासात यश मिळवले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीला चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी दीपक अनिल बच्छे यांची अंदाजे ३० हजार रुपये किमतीची युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपासून दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेदरम्यान स्टेशन रोड परिसरातील पाणपोईजवळून चोरीस गेली होती. याप्रकरणी दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल सोनवणे व पोलीस अंमलदार दिपक चौधरी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी चोरीस गेलेली मोटारसायकल पुणे जिल्ह्यातील रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आरोपीसह हस्तगत केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या आठ तासांत गुन्ह्याचा छडा लावल्याने चाळीसगाव पोलिसांच्या तपासाची चर्चा होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ पोलीस हवालदार राहुल सोनवणे, पोलीस अंमलदार दिपक चौधरी, जितेंद्र वाघ तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सहभाग घेतला. About The Author admin पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772 See author's posts Views: 142 Post navigation फटाका विक्री स्टॉलची प्रत्यक्ष तपासणी करून नियमबाह्य विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी परवानगीधारक फटाका विक्रेत्यांची मागणी इच्छादेवी मंदिर चोरीचा उलगडा; २२ वर्षीय आरोपी जेरबंद, २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत