अधिकार आमचा न्युज नेटवर्क

संपादक गफ्फार शेख (मलिक)

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील हिरापूर रोडवरील इच्छादेवी मंदिरात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा चाळीसगाव शहर पोलिसांनी यशस्वी उलगडा केला असून, याप्रकरणी २२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या पितळी घंटा, तांब्याचे कलश आणि पूजेचे साहित्य असा एकूण २१ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इच्छादेवी मंदिरात पुजारी संजू महाराज गोपालदास पागलदास (वय ५२) हे वास्तव्यास आहेत. दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी अज्ञात चोरट्याने मंदिरातील घंटा व इतर पूजेचे साहित्य असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी गुन्हे शोध पथकाकडे सोपविला.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस हवालदार राहुल सोनवणे, पोलीस अंमलदार मोहन सूर्यवंशी, विलास पवार, दिलीप राठे, विकास पाटील व दत्तू सावळे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोपाल सुरेश माचे (वय २२, रा. ओस्तवाल हॉस्पिटलजवळ, मनोरमा हॉटेलच्या पाठीमागे, चाळीसगाव) याला ताब्यात घेतले. त्याची विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मंदिरातील चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याच्याकडून ११ हजार रुपये किमतीची अंदाजे ११ किलो वजनाची एक पितळी घंटा, ५ हजार रुपये किमतीच्या अंदाजे ५ किलो वजनाच्या तीन पितळी घंटा, २ हजार ७०० रुपये किमतीच्या अंदाजे एक किलो वजनाच्या दोन पितळी घंटा, १ हजार ८०० रुपये किमतीचे दोन तांब्याचे कलश आणि १ हजार २०० रुपये किमतीचे पाच पितळी पूजेचे साहित्य असा एकूण २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार राहुल सोनवणे करीत आहेत.

चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी नागरिकांना सण-उत्सवाच्या काळात घराला व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षितता वाढविण्याचे तसेच परिसरात संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

By admin

पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!