अधिकार आमचा न्युज नेटवर्क संपादक गफ्फार शेख (मलिक) छोट्या-मोठ्या चोऱ्या, चेन स्नॅचिंग आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शहर पोलीस ॲक्शन मोडमध्ये चाळीसगाव(प्रतिनिधी)- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चाळीसगाव शहर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.बाजारपेठ परिसरात छोट्या-मोठ्या चोऱ्या, चेन स्नॅचिंग तसेच इतर अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी शहर पोलिसांच्या वतीने आज सकाळी ११ वाजेपासून सर्व मुख्य बाजारपेठेत पायी रूट मार्च काढण्यात आला. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश होता. पोलिसांच्या या प्रत्यक्ष गस्तीद्वारे गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच संभाव्य गैरप्रकार करणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. या रूट मार्चमध्ये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी चाळीसगाव शहर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचे या रूट मार्चमधून दिसून आले. About The Author admin पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772 See author's posts Views: 225 Post navigation इच्छादेवी मंदिर चोरीचा उलगडा; २२ वर्षीय आरोपी जेरबंद, २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत भोरटेक येथे विहिरीत पडलेल्या बिबट मादीला वनविभागाने दिले जीवनदान!