आज आमदार मंगेश चव्हाण यांचा वाढदिवस. शुभेच्छा देताना एवढेच म्हणावेसे वाटते की “आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढणाऱ्या लोकप्रियतेसह अनुभव, दूरदृष्टी आणि विकास यांचा आलेखही झपाट्याने वाढत आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शक मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत एका कार्यक्रमात
मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी उभारलेले जनसेवा कार्यालय म्हणजे जणू एक छोटंसं प्रशासनच! रेशनपासून आरोग्यापर्यंत, शासकीय कागदपत्रांपासून थेट योजनांच्या लाभापर्यंत – सर्व सेवा एका छताखाली देण्याचा आमदार मंगेश चव्हाण यांचा जनसेवक म्हणून प्रयत्न आणि या सेवेचा लाभ घेणारी तालुक्यातील जनता…
आमदार मंगेश चव्हाण यांचे जनसेवा कार्यालय
आपल्या मतदार संघातील लोकांची विविध शासकीय कामे आमदारांच्या जनसेवा कार्यालयात निरंतर सुरू आहे, जसे नाव तसे अनुभव लोकांना या कार्यालयात येत असतात,खरोखर या कार्यालयाच्या माध्यमातून आमदार चव्हाण हे आपल्या मतदार संघातील लोकांची जनसेवा करत आहेत.
उपजिल्हा रुग्णालयाचे प्रगतीपथावर सुरू असलेले काम
शासकीय सेवांपासून सुरू केलेली जनसेवा ही तालुक्याच्या विकास च्या मार्गाने आरोग्य सेवेच्या उंबरठ्यापर्यंत आलेली आहे. शहरात प्रगतीपथावर असलेले उपजिल्हा रुग्णालयाचे काम म्हणजे तालुक्यातील जनतेची आरोग्यासाठीची मोठ मोठ्या शहरात होणारी धावपळ व वणवण थांबणार आहे.जिल्ह्यात मिळणाऱ्या आरोग्य सेवा आता शहरात मिळणार आहे या मुळे आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असे कार्य आमदार चव्हाण यांनी सुरू केले आहे.
जनसेवा कार्यालयात जनसेवेत हातभार लावताना आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा ताई चव्हाण
यामुळे एक मत किती अमूल्य आहे,हे त्या मताने केलेल्या परिवर्तनातून आज तालुक्याच्या झालेला विकासामुळे स्पष्ट दिसत आहे.नवीन रस्ते,नवीन शासकीय इमारती,लोकांच्या समस्या पासून ते समाधानापर्यंत सुरू असलेले नियोजन म्हणजे तुम्ही केलेल्या मतदानाने आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्याचे बदललेले रूपच आहे.
"जनसेवेचा संकल्प,जनसेवेची संकल्पना" "जनसेवेची दूरदृष्टी,जनसेवेतून मतदार संघ बदलण्याची कल्पना"
असा हा दोन ओळींचा तालुक्याचा सुरू असलेला विकास आहे आणि या विकासासाठी जनसेवेला समर्पित आमदार मंगेश चव्हाण यांचे कार्य यामुळे काल स्वप्न वाटत होते ते आज सत्यात उतरले आहे आणि आज जे स्वप्न वाटत असतील ते भविष्यातील विकासाने सत्यात येतील आमदारांच्या वाढणाऱ्या वयासोबत त्यांचा अनुभव देखील वाढत असून राजकारणात त्यांची पकड देखील घट्ट होत आहे हे वेगळे सांगायला नको लिहायला खूप काही आहे तूर्तास आमदार मंगेश चव्हाण यांना आजच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जनतेची सुरू असलेल्या जनसेवेबद्दल त्यांचे आभार…..
पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772