
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) :दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक ७०६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०३ इत्यादीप्रमाणे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांत शिताफीने जेरबंद केले.
या गंभीर खुनाच्या घटनेचा तातडीने छडा लावण्याच्या दृष्टीने डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना विशेष आदेश दिले होते.
त्यानुसार निरीक्षक गायकवाड यांनी पोह. नितीन बाविस्कर, पोना. किशोर पाटील, पोकॅ. छगन तायडे, पोकों. रविंद्र कापडणे या अधिकाऱ्यांचे पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी पाठवले. खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने कार्यवाही करत नशिराबाद परिसरातून मुख्य आरोपी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) यास ताब्यात घेतले.
पुढील कारवाईसाठी आरोपीस एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव तसेच नितीन गणापुरे, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.