
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी) –तालुक्यातील देवळी येथील नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, देवळी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे अधीक्षक श्री. विनोद देसले तर प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक श्री. सतीष पाटील होते. यावेळी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनप्रवासावर शिक्षक श्री. रमाकांत कापडणीस व विद्यार्थिनी सविता पावरा यांनी माहितीपूर्ण विचार मांडले. या प्रसंगी शाळेत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन तसेच परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. जितेंद्र सूर्यवंशी यांनी मानले.