अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्त्यांनी सुट्टी वाया न घालवता तयार केले मास्क केली गरजूंची मदत
(अधिकार आमचा न्यूज नेटवर्क)
दौंड प्रतिनिधी पवन साळवे
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे सरकार सर्व उपाययोजना राबविण्यात वेळ खर्ची घालत आहे आणि त्यातच काही स्वयंसेवी संस्था फुल नाही फुलाची पाकळी म्हणून गरजू जनतेला सहकार्य व मदतीचा हात देत आहे त्याच अनुषंगाने काही महाविद्यालयीन विद्यार्थी आपली सुट्टी वाया जाऊ नये देश सेवेसाठी आपली सुट्टी खर्ची घालू या उद्देशाने श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या स्वयंसेवकांनी गरजुंसाठी कापडी मास्क तयार करुन गरजुंना वाटप केले , पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेले हे विद्यार्थी सध्या पुण्यातील कोरोनाच्या वढत्या प्रादुर्भावामुळे आपापल्या गावी आले आहेत , घरी फक्त बसून न राहता गरजुंसाठी फेस मास्क बनवतात
दौंडमधील विद्यार्थी –
१) आभिषेक अंबादास वाघमारे
२) अभिजित फुलारी
या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.