अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी पवन साळवे
अधिकार आमचा च्या बातमी मुळे जनसामान्यांना न्याय मिळाला आहे, 20 एप्रिल 2020 रोजी नागरिकांनी केलेल्या लेखी तक्रारीनुसार व अधिकार आमचा च्या न्युज चॅनल मार्फत नागरिकांनी मांडलेल्या व्यथा मार्फत दौंड तहसीलदार संजय पाटील यांच्या सुचने -नुसार दौंड पुरवठा निरीक्षक भालेराव यांनी केलेल्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी सो (पुरवठा विभाग) पुणे यांच्या आदेशाने धान्याचे अनियमीत वाटप होत असल्याकारणाने जय अंबिका ग्राहक भंडार सोनवडी प्रोप्रा. बाबू राठोड – व – प्रथमेश महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान घोलपघर प्रोप्रा. प्रथमेश राठोड हे दोन दुकाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात अली आहेत. तसेच भविष्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन्ही दुकाने सदर दुकानास जोडली आहेत. . (1)जय अंबिका ग्राहक भंडार प्रोप्रा. बाबू राठोड सोनवडी – स्थलांतर – नानविज विकास सोसायटी नानविज, (2) प्रथमेश महिला बचत गट प्रोप्रा. प्रथमेश राठोड घोलपघर – स्थलांतर – व्ही.जे. नादखिले गार या दुकानात जोडलेले आहे तरी रेशनकार्डधारकांना विनंती आहे की पुढील महिन्यापासून आपण आपले रेशन स्थलांतरी दुकानातून घेऊन जावे
