
आदेश धुकावून लावत लग्नाची हौस करणं चांगलंच अंगलट आलं आहे गुन्हा दाखल
माजलगाव-करोनामुळे सध्या सगळी भीतीचं वातावरण आहे. आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारही प्रतिबंधात्मक पावलं उचलतं आहे. गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक उपाय सरकारनं हाती घेतले आहेत. याचाच भाग म्हणून गर्दी होणारे सगळे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत. मात्र, हे आदेश धुकावून लावत लग्नाची हौस करणं चांगलंच अंगलट आलं आहे. त्यामुळे वधू-वर, त्यांचे आईवडिल आणि भटजीही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा – विठ्ठल पांडुरंग कांबळे (रा . ब्रम्हगाव ता . माजलगाव ( नवरीचे वडील ), मनकर्णा सुभाष पाटोळे (रा लवुळ ता. माजलगाव ( नवरदेवाची आई ), ज्ञानेश्वर उद्धव पाटोळे (रा . लवुळ (नवरदेवाचे चुलते ), चंदू महादेव आटवे (रा . लवुळ) यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. |
माजलगाव शहरापासून १किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास लग्नासाठी पाहुणे जमले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली .
यावरून त्यांनी शहर पोलिसांना लग्नस्थळी जाण्यास सांगितले . सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस ताफा घेऊन लग्नस्थळी गेले असता, यावेळी पोलिसांना लग्नस्थळी १००- १२५ लोक जमल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी करोना संसर्गाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची आठवण करून दिली व जमलेल्यांना पाहुण्यांना परत जाण्यास सांगितले. मात्र, पोलिसांच्या आवाहनाला नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न उपस्थितांनी केला. त्यामुळे पोलिसांनी लग्न लावण्यास आलेले भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. यानंतर ५-६ नातेवाईकांनी सदरचे लग्न उरकुन घेतल्याची माहिती आहे. या घटनेनं येत्या काही दिवसात लग्न असणाऱ्या कुटुंबीयांमध्ये खळबळ माजली आहे.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating