
उद्या 3700 ट्रेन रद्द कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
देशात करोनाच्या प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनंही पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च (रविवार) सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी या कालावधीत जनतेनं घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं होतं. आता यासोबतच रेल्वेनंही २२ मार्च रोजी पूर्ण दिवस देशात ३ हजार ७०० ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनं यासंबंधी परिपत्रकही काढलं आहे. तसंच मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथील उपनगरीय रेल्वेच्याही किमान फेऱ्याच सोडण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
२१/२२ मार्च मध्यरात्री १२ वाजल्यापासून २२ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तब्बल २२ तास एकही ट्रेन चालवण्यात येणार नाही. परंतु सात तासांपेक्षा अधिक कालावधी प्रवास सुरू असलेल्या प्रवासी ट्रेनसाठी रेल्वेनं दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा ट्रेन आपल्या निर्धारित स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत.रेल्वे मंत्रालयानं काढलेल्या परिपत्रकानुसार २२ मार्च रोजी २२ तासांसाठी कोणतीही ट्रेन आपल्या सुरूवातीच्या स्थानकापासून रवाना होणार नाही. दरम्यान, मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनचं परिचालन रविवारी सकाळी ४ वाजता थांबवण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. सकाळी ४ वाजण्यापूर्वी रवाना झालेल्या गाड्यांना आपल्या अंतिम स्थानकापर्यंत पोहोचण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोणत्या ट्रेन रद्द होतील यासंदर्भातील अधिक माहिती आज देण्यात येणार आहे.

Related
More Stories
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
Average Rating