अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(वृत्तसेवा)-महाराष्ट्राच्या कुस्तीचा अभिमान,महाराष्ट्राच्या तमाम युवा पैलवानांनचे आदर्श,आपल्या खेळाच्या कौशल्याने व विनयशील व नम्रता या गुणांमुळे लाखो कुस्ती शौकिनांनच्या मनावर राज्य करणारे,ट्रिपल महाराष्ट्र केसरी, A.C.P. पै.विजय चौधरी (सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे) यांचा आज,पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा तर्फे सन्मान खाकी वर्दीचा या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,गृहमंत्री श्री. अनिल देशमुख,श्री.राजीव खांडेकर(मुख्य संपादक A B P माझा) श्री.योगेश जाधव( व्यवस्थापकीय संपादक दै.पुढारी) या सर्व मान्यवरांच्या हस्ते,कोरोना काळात लॉकडाउनमध्ये मध्ये सलग 4 महिने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ज्या ज्या पोलीस अधिकारी वर्गाने योगदान दिले त्याचा सन्मान आज पुणे येथील कार्यक्रमात करण्यात आला.या कार्यक्रमास पुण्यातील उच्च पदावर आसणार्या अनेक पोलीस अधिकार्याचा सन्मान करण्यात आला. गेली 6 महिने पै.विजय चौधरी आपले कर्तव्य अंखडपणे बजावत आहेत.