अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव-दि 28 चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील धुळे औरंगाबाद बायपास रोडच्या बाजूला चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस नाईक भटू पाटील, पोलीस शिपाई रवी पाटील, अशोक मोरे, भूषण पाटील, मुकेश पाटील या पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये आरोपी नामे दिलीप वसंत बाविस्कर वय- 35 वर्षे, राहणार- डेराबर्डी, चाळीसगाव हा त्याचे ताब्यात विदेशी दारू व बिअर बाटल्या चोरट्या विक्रीसाठी बाळगून असल्याचे मिळून आल्याने रक्कम रुपये 3910/- ची विदेशी रॉयल स्टेग दारूच्या बाटल्या व टुबोर्ग बिअरच्या बाटल्यांसह आरोपीला ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पो स्टे ला आणून आरोपिविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक भटू पाटील हे करीत आहेत.