अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
सोनई(वृत्तसेवा)-तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्राध्यापकांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबाबत व होणाऱ्या रॅगिंगच्या प्रकाराबाबत कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्यशिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष गौतम कांबळे यांनी केले आहे .
याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष व महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य महासचिव गौतम कांबळे म्हणाले की ,सोनई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील कृषी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे . हा रॅगिंगचा प्रकार आहे,या सर्व प्रकाराला कंटाळून या महाविद्यालयातील गरिबांची मुले कॉलेज सोडून आपलं शिक्षण अर्धवट सोडून आपल्या गावी निघून गेलेली आहेत .या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार केलेला आहे.त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अथवा संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल .
या सर्व प्रकाराबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य मोरे यांना विचारले असता ” हे महाविद्यालय माजी मंत्री व विद्यमान आमदारांच् आहे ,कोणीही आमचे काही बिघडू शकत नाही.विद्यार्थ्यांच्या तक्रारी आम्ही उच्च न्यायालयापर्यंत जिंकलो आहोत , असे स्पष्टीकरण दिले .त्यानंतर संघटनेने याबाबतचे निवेदन राज्याचे कृषिमंत्री , कृषी संचालक , कृषी आयुक्त , राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू व विद्यापीठाचे रजिस्टर यांना या सर्व प्रकाराबाबतचे निवेदन पाठवण्यात आले आहे .