दौंड दि 29 -दौंड येथे कोरोनाचा रुग्ण आढळला असल्याने मोठी खळबळ उडाली असता यांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दहिटने येथील काही भाग प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आला असून हा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीस वायरस चे संक्रमण त्याच अनुषंगाने काही भाग प्रतिबंधित व बफर म्हणून घोषित केले असून.कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याने.दहिटने,मिरवाडी, नांदूर,खामगाव,गणेशनगर,देवकरमळा,बैलखिळा,डुबेवाडी,हे मुख्यस्थान धरून ३ किलोमीटर चा परिसर प्रतिबंधित क्षेत्र व मगरवाडी, मेमानवाडी,पिलानवाडी,गाडामोडी,बोराटेवस्ती,व देवकरवाडी. परिसर मुख्यस्थानी धरून ५ किलोमीटर चा परिसर क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून अशी माहिती मा:प्रमोद गायकवाड(उपविभागीय दंडाधिकारी दौंड-पुरंदर) यांनी दिली.
दौंड प्रतिनिधी
कु:पवन साळवे