
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रवाशी बांधवांसाठी व राज्य परिवहनच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रबोधनपर जनजागृती कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव व रा. प. चाळीसगाव आगार यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न
चाळीसगाव(प्रतिनिधी):- दि 20 रोटरी क्लब ऑफ चाळीसगावचे जनजागृतीपर स्तुत्य उपक्रम कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रवाशी बांधवांसाठी व राज्य परिवहनच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रबोधनपर जनजागृती कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव व रा. प. चाळीसगाव आगार यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगार व्यवस्थापक संदिप निकम यांनी केले. ङाॅ.संदीप देशमुख यांनी कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. प्रा. मधुकर कासार यांनी हात धुण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवून सखोल मार्गदर्शन केले. तसेच कॅश आणि इश्यू सेक्शनमध्ये वाहकांसाठी विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी रा.प.कर्मचारीना मास्कचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे रोशन ताथेड, राजेंद्र कटारिया, स्थानक प्रमुख किशोर मगरे, कार्यशाळा अधीक्षक संतोष वाघ,वाहतूक निरीक्षक आनंदा सोनटक्के,नितीन पाठक,भाऊसाहेब हङपे,चालक,वाहक रा.प.कर्मचारी व प्रवासी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

त्यानंतर रोटरी क्लब चाळीसगाव ची आरसीसी शाखा बोरखेडा पिराचे येथे श्री तुषार सूर्यवंशी यांच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली, यावेळी आरसीसी चेअर भास्कर पाटील, डॉक्टर संदीप देशमुख, रोशन तातेड व प्रा मधुकर कासार आदी उपस्थित होते.
बोरखेडा यासारखाच उपक्रम कोदगाव या गावी घेण्यात आला त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सुनील राजपूत यांची विशेष उपस्थिती लाभली.
अध्यक्ष मनोगतात बोलताना डॉक्टर संदीप देशमुख यांनी सांगितले की “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर” या उक्तीप्रमाणे विषाणुजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी वेळीच काळजी घेतल्यास आपण आलेल्या ह्या संकटावर मात करू शकतो.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating