अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील नगरपालिका प्रशासनने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून या मोहिमे अंतर्गत शहरातील न्यायालया समोरील अतिक्रमण दि 10 जून रोजी काढण्यात आले मात्र शेजारीच असलेल्या खाजगी मालमत्तेच्या मालकाने पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून चक्क रस्ताच खंदून काढला आहे.
शहरात जोरदार सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेत शहरातील विविध भागांतील अतिक्रमण काढले जात आहे मात्र शहर न्यायालयासमोर असलेले अतिक्रमण काढल्या नंतर चक्क खाजगी जागा मालकाने आपल्या जागेसमोरील कंपाऊंड च्या भिंतीच्या बाहेर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी भिंती पासून जवळपास 3 फुटाच्या वर चक्क रस्ताच जेसिबी च्या सहाय्याने खंदून जवळ पास 8 इंचच्यावर भिंतीच्या बाजूला रस्त्यावर गड्डा तयार केला आहे मात्र रास्ता खंदन्या पूर्वी संबंधित प्रशासनाची परवानगी घेतली होती का? अश्या प्रकारे रास्ता खंदने योग्य आहे का? बाजूलाच लहान मुलांची शाळा असून पावसाळा सुरू झाला आहे त्यात पाणी साचून रोगराई पसरल्यास जबाबदार कोण,नेहमी वर्दळ असणाऱ्या या जागेवर त्या खंदलेल्या रस्त्यावर अपघात झाल्यास दोषी कोण असणार अश्या विविध प्रश्न उपस्थित राहतात संबंधित प्रशासन त्या खाजगी जागे मालकावर कारवाई करत तो खंदलेल्या रस्त्याची दुरुस्ती करून घेणार का की कायदा फक्त गरिबांना आहे का अशी चर्चा शहरातून सुरू असून,संबंधित विभाग काय कारवाई करते याकडे जनसामान्यांचे लक्ष लागून आहे.